Shrawan 2023 : महादेवाच्या या मंदिरात केवळ दर्शनाने टळतो अकाल मृत्यू, काय आहे रहस्य?

18 जुलैपासून श्रावण महिना सुरू होणार आहे. या काळात महादेवाच्या उपासनेला विशेष महत्त्व आहे. यंदाच्या श्रावण महिन्यात तुम्ही तिर्थक्षेत्राला भेट देण्याचा विचार करत असाल तर महादेवाच्या या मंदिरात अवश्य भेट द्या.

Shrawan 2023 : महादेवाच्या या मंदिरात केवळ दर्शनाने टळतो अकाल मृत्यू, काय आहे रहस्य?
रेवा येथील महामृत्यूंजय मंदिरImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Jul 07, 2023 | 6:14 PM

मुंबई : 18 जुलैपासून श्रावण (Shrawan 2023) महिना सुरू होणार आहे. या काळात मंदिरांमध्ये शिवभक्तांची वर्दळ असते. श्रावण महिन्यात भगवान शंकराची पूर्ण भक्तिभावाने पूजा केल्याने माणसाची प्रत्येक इच्छा पूर्ण होते असे म्हणतात. श्रावणाच्या निमीत्याने आपण भोलेनाथांच्या काही खास चमत्कारिक मंदिरांबद्दल जाणून घेणार आहोत. रेवामध्‍ये महादेवाचे एका जागृत मंदिर आहे जेथे दर्शन करून तुम्ही असाध्य रोगापासून मुक्ती मिळवू शकता. या मंदिरात पूजा केल्याने अकाली मृत्यू टळतो असे म्हणतात. जगातील हे एकमेव शिवलिंग आहे ज्याला 1001 छिद्रे आहेत आणि येथे महामृत्युंजय वास करतात अशी धार्मिक श्रद्धा आहे.

 कोणी बांधले हे मंदिर?

असे मानले जाते की सुमारे 500 वर्षांपूर्वी संस्थानाचे महाराजा व्याघ्रदेव सिंह शिकार करताना या ठिकाणी होते. त्याच रात्री महाराजांनी पाहिले की एक सिंह मंदिराच्या आवारात चितळाच्या मागे धावत आहे, पण जेव्हा चितळ ढिगाऱ्याजवळ पोहोचला तेव्हा सिंह शांत झाला. त्याचवेळी महाराजांना येथे असलेल्या शक्तींची जाणीव झाली आणि त्यानंतर त्यांनी येथे मंदिराची स्थापना केली. आणखी एका मान्यतेनुसार, अनेक वर्षांपूर्वी ऋषी, संत आणि भक्त ही मूर्ती घेऊन जात होते, असे मानले जाते. रात्रीच्या विश्रांतीच्या वेळी, शिवाने येथे महामृत्युंजयाची मूर्ती स्थापन करण्याबाबत स्वप्ननात दृष्टांत दिला. यानंतर ही मूर्ती सोडून ऋषी येथून निघून गेले.

फक्त दर्शनानेही दूर होतात समस्या

या मंदिरात महामृत्युंजय मंत्राचा जप करून रुद्राभिषेक केल्यास साथीचे आजार आणि असाध्य रोगांपासून मुक्ती मिळते, असे सांगितले जाते. श्रावण महिन्यात या मंदिरात महामृत्युजय मंत्राचा जप केल्याने भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात, अशी मान्यता आहे. या मंदिरात श्रावण, एकादशी, महाशिवरात्री आणि वसंत पंचमीच्या दिवशी भाविकांची वर्दळ असते. या दरम्यान भक्त जप, तपश्चर्या आणि यज्ञ करतात. यामुळे अकाली मृत्यूही टाळता येतो, असे सांगितले जाते. याशिवाय या मंदिरात महामृत्युंजय मंत्राचा जप केल्याने जुनाट आजारांपासून मुक्ती मिळते.

हे सुद्धा वाचा

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिका डॉ. तारा भवाळकर
साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिका डॉ. तारा भवाळकर.
अलर्ट राहा, कधीही ब्रेकिंग मिळू शकेल, नीलम गोऱ्हेंचं सूचक वक्तव्य
अलर्ट राहा, कधीही ब्रेकिंग मिळू शकेल, नीलम गोऱ्हेंचं सूचक वक्तव्य.
शिंदेंना धक्का, माजी नगरसेवकांसह शेकडो कार्यकर्त्यांच्या हाती 'मशाल'
शिंदेंना धक्का, माजी नगरसेवकांसह शेकडो कार्यकर्त्यांच्या हाती 'मशाल'.
राऊतांचा गुलाबराव पाटलांवर निशाणा, 'रेडे गुवाहाटीलाच मारले, डुक्कर..'
राऊतांचा गुलाबराव पाटलांवर निशाणा, 'रेडे गुवाहाटीलाच मारले, डुक्कर..'.
तुम्ही खुनी; कोणत्या तोंडाने मतं मागणार? सुळेंचा कोणावर हल्लाबोल?
तुम्ही खुनी; कोणत्या तोंडाने मतं मागणार? सुळेंचा कोणावर हल्लाबोल?.
शिवरायांचं स्मारक पाहण्यास मुंबईत संभाजीराजे अन् पोलिसांकडून धरपकड
शिवरायांचं स्मारक पाहण्यास मुंबईत संभाजीराजे अन् पोलिसांकडून धरपकड.
'त्यांची दादागिरी संपली', बच्चू कडू यांचा अजित पवारांवर निशाणा
'त्यांची दादागिरी संपली', बच्चू कडू यांचा अजित पवारांवर निशाणा.
शिंदेंच्या मंत्र्यानं वाटलेल्या साड्यांची संतप्त महिलांनी केली होळी
शिंदेंच्या मंत्र्यानं वाटलेल्या साड्यांची संतप्त महिलांनी केली होळी.
'... तर मी 2 वेळेचं जेवले असते', लाडकी बहीण'चं आशा भोसलेंकडून कौतुक
'... तर मी 2 वेळेचं जेवले असते', लाडकी बहीण'चं आशा भोसलेंकडून कौतुक.
नवनीत राणांचा तुफान गरबा, तरुणींसोबत लुटला गरबा खेळण्याचा आनंद
नवनीत राणांचा तुफान गरबा, तरुणींसोबत लुटला गरबा खेळण्याचा आनंद.