AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Skanda Sashti 2021 : आषाढ महिन्यातील स्कंद षष्ठी, जाणून घ्या शुभ मुहूर्त, पूजेची पद्धत आणि महत्व

हिंदू पंचांगानुसार स्कंद षष्ठी व्रत प्रत्येक महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या सहाव्या दिवशी ठेवला जातो. या दिवशी भगवान शिव यांचा मोठा मुलगा कार्तिकेय यांची पूजा केली जाते. हे व्रत प्रामुख्याने दक्षिण भारतात साजरा केले जाते. आषाढ महिन्यातील स्कंद षष्ठी व्रत आज गुरुवार 15 जुलै 2021 रोजी साजरा केला जाईल.

Skanda Sashti 2021 : आषाढ महिन्यातील स्कंद षष्ठी, जाणून घ्या शुभ मुहूर्त, पूजेची पद्धत आणि महत्व
स्कंद षष्ठी
| Edited By: | Updated on: Jul 15, 2021 | 8:28 AM
Share

मुंबई : हिंदू पंचांगानुसार स्कंद षष्ठी व्रत प्रत्येक महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या सहाव्या दिवशी ठेवला जातो. या दिवशी भगवान शिव यांचा मोठा मुलगा कार्तिकेय यांची पूजा केली जाते. हे व्रत प्रामुख्याने दक्षिण भारतात साजरा केले जाते. आषाढ महिन्यातील स्कंद षष्ठी व्रत आज गुरुवार 15 जुलै 2021 रोजी साजरा केला जाईल. दक्षिण भारतातील लोक मुरुगनच्या नावाने भगवान कार्तिकेयची पूजा करतात. स्कंद पुराणानुसार या दिवशी कार्तिकेय यांची पूजा केल्यास संतान प्राप्ती होते. जाणून घ्या पूजेचा शुभ मुहूर्त आणि या दिवसाचे महत्त्व (Skanda Sashti 2021 in Ashadha month know the shubh muhurat puja vidhi and importance of this day) –

स्कंद षष्ठी शुभ मुहूर्त

हिंदू कॅलेंडरनुसार स्कंद षष्ठीचा उपवास 15 जुलै रोजी ठेवला केला जाईल.

षष्ठी तिथी 15 जुलै रोजी गुरुवारी सकाळी 07वाजून 16 मिनिटांनी प्रारंभ होईल.

16 जुलै रोजी शुक्रवारी संध्याकाळी 06 वाजून 06 मिनिटांनी संपेल.

दुसर्‍या दिवशी उपवास सोडावा.

स्कंद षष्ठी पूजा पद्धत

स्कंद षष्ठीच्या दिवशी पहाटे उठून स्नान करून स्वच्छ कपडे घालून कार्तिके यांना प्रार्थना करावी.

या दिवशी उपवास ठेवणारे भाविक मुरुगन, कांता षष्ठी कवासम आणि सुब्रमण्यम भुजंगम यांचे पठण करतात.

उपवासा दरम्यान काहीही खाऊ-पिऊ नये.

व्रत ठेवणाऱ्याने दिवसातून एकदा फळ खावे.

दक्षिण भारतात हा उत्सव सहा दिवस चालतो. बरेच लोक सहा दिवस नारळाचे पाणी पिऊन या सणाला उपवास करतात. मान्यता आहे की, उपवास करणार्‍याने खोटे बोलू नये. या विशेष दिवशी प्रथम भगवान शिव आणि माता पार्वतीची पूजा केली जाते. यानंतर भगवान कार्तिकेयला उदबत्ती, दिवा, फळे इत्यादींचा नैवेद्य दाखविला जातो.

स्कंद षष्ठीचे महत्त्व

धार्मिक मान्यतेनुसार, स्कंद षष्ठीच्या दिवशी भगवान कार्तिकेय यांनी तारकासुरचा वध केला होता. मान्यता आहे की, या दिवशी कार्तिकेय यांची पूजा केल्याने आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. हे व्रत ठेवल्याने संतान सुखाची प्राप्ती होते. या विशेष दिवशी भगवान कार्तिकेय यांच्या मंदिरात भाविक जमतात. पण, कोरोनामुळे आपण सर्वांनी आपल्या घरी राहून पूजा करावी.

Skanda Sashti 2021 in Ashadha month know the shubh muhurat puja vidhi and importance of this day

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

संबंधित बातम्या :

Chanakya Niti | जर आयुष्यात कुठलीही समस्या नको असेल तर आचार्य चाणक्य यांचे हे 10 सल्ले लक्षात ठेवा

Untold Story | संतोषी मातेचा जन्म कसा झाला, भगवान गणेशासोबत त्यांचं नातं काय?

INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.