AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Success : डर के आगे जीत है, जाणून घ्या कशी करावी भीतीवर मात !

जीवनात तुम्हाला एखाद्या गोष्टीची वाटणारी भीती हीच तुमची कमजोरी ठरत असेल , तर त्यावर विजय मिळवण्यासाठी आणि यशस्वी होण्यासाठी हे 5 मंत्र जाणून घेण्यासाठी, जरूर वाचा हा लेख.

Success : डर के आगे जीत है, जाणून घ्या कशी करावी भीतीवर मात !
Image Credit source: unsplash.com
| Updated on: Aug 25, 2022 | 10:55 AM
Share

जीवनात प्रत्येक लहान-मोठ्या व्यक्तीला कोणत्या ना कोणत्या गोष्टीची भीती (fear) वाटत असते. कोणी अंधाराला (darkness)घाबरतं तर कोणाला परीक्षेची भीती वाटते. खरं सांगायचं तर, भीती वाटणे हा मनुष्याच्या जीवनाचा (fear is part of human’s life) एक भाग आहे. मात्र याच भीतीचे रुपांतर एखाद्या सवयीत झाल्यास ती त्या व्यक्तीची कमजोरी किंवा दुर्बलता ठरते. आणि तीच भीती त्या व्यक्तीच्या अपयशासाठी ( reason for failure) कारणीभूत ठरू शकते. जर तुम्हालाही अशा एखाद्या गोष्टीची भीती वाटत असेल आणि ती तुमच्या यशाच्या आड येत असेल तर ती भीती दूर करण्यासाठी आणि यशस्वी होण्यासाठीचे 5 मंत्र जाणून घ्या. कारण, असं म्हणतात की, ‘ डर के आगे जीत है… ‘

भीतीवर मात करण्यासाठी वाचा हे 5 मंत्र –

  1. आयुष्यात भीती ही अनेकदा आपल्या विचारांमुळे निर्माण होते. उदाहरणार्थ – आपण असा विचार केला किंवा गृहीत धरले की एखादी गोष्ट आपण कधीच करू शकत नाही म्हणजे नाहीच.. हा असा विचार करणे म्हणजेच आपल्या मनातील भीती असते.
  2. जर तुम्हाला तुमच्या मनातील भीतीवर विजय मिळवायचा असे तर घरी बसून सतत त्याबद्दल विचार करू नका. उलट त्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करा आणि तुमच्या कामात पूर्णपणे लक्ष द्या, एकाग्रचित्ताने ते काम करा.
  3. जर तुम्ही तुमच्या मनातील भीतीवर विजय मिळवला नाहीत, तर ती भीती तुमच्या मानगुटीवर बसेल, तुमच्यावर विजय मिळवेल.
  4. आयुष्यात भीतीला कधीही तुमच्या जवळ येऊ देऊ नका. एखाद्या गोष्टीची भीती वाटायला सुरूवात झाली, तर त्याविरुद्ध लढा द्या आणि मनातून ती भीती काढून टाका. तात्पर्य काय तर भीतीपासून दूर पळू नका तर त्याविरोधात उभं राहून खंबीरपणे लढा आणि भीती पळवून लावा.
  5. एखादं संकट किंवा भीतीदायक गोष्ट दूर असेपर्यंत त्याबद्दल भीती वाटणे ठीक आहे. मात्र जेव्हा ती गोष्ट तुमच्या समोर येईल, तेव्हा मनात कोणतीही शंका-कुशंका न ठेवता त्या भीतीवर मात करण्याचा उपाय शोधला पाहिजे. तरच तुम्ही आयुष्यात यशस्वी होऊ शकाल.

Follow Us
स्क्रिप्ट रायटर, समुपदेशनाची गरज... शायना एन.सी. यांचा राऊतांवर पलटवार
Shaina NC : स्क्रिप्ट रायटर, समुपदेशनाची गरज म्हणत... शायना एन.सी. यांचा संजय राऊतांवर पलटवार
Pune : लांबलेल्या गणेश विसर्जन मिरवणुकांमध्ये काय घडतंय?
Video: पुण्यात 28 तासांपासून तुफान गर्दी, डान्स अन् गाणं सुरूच...लांबलेल्या गणेश विसर्जन मिरवणुकांमध्ये काय घडतंय?
आम्ही मरावं की जगावं... दुष्काळी परिस्थितीबाबत सांगताना शेतकऱ्याला...
Jalna : आम्ही मरावं की जगावं... दुष्काळी परिस्थितीबाबत सांगताना शेतकऱ्याला अश्रू अनावर
बाप्पा विसर्जनाच्या प्रतीक्षेत ताटकळला; उपनगरचा राजा काल सकाळपासून...
Ganpati Visarjan 2026 : बाप्पा विसर्जनाच्या प्रतीक्षेत ताटकळला; उपनगरचा राजा काल सकाळपासून मढ जेटीवरच, प्रशासनाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह
राज्यात दुष्काळ जाहीर; दत्ता भरणे नेमकं काय म्हणाले?
Maharashtra Drought Issue : राज्यात दुष्काळ जाहीर; दत्ता भरणे नेमकं काय म्हणाले?
राऊत अचानक राज ठाकरेंच्या भेटीला दोघांमध्ये नेमकी काय चर्चा?
Sanjay Raut Meet Raj Thackeray : संजय राऊत अचानक राज ठाकरेंच्या भेटीला शिवतीर्थवर! दोघांमध्ये नेमकी काय चर्चा? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
मोठी अपडेट समोर! ट्रिगर-1 म्हणजे काय? महाराष्ट्रातील दुष्काळ निवारण...
मोठी अपडेट समोर! ट्रिगर-1 म्हणजे काय? महाराष्ट्रातील दुष्काळ निवारणाचा पहिला टप्पा
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील यांची नवी रणनीती; नेमकं काय ठरवलं?
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील यांची नवी रणनीती; नेमकं काय ठरवलं?
मुख्यमंत्री फडणवीसांमुळे शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार; नेत्याचं...
मुख्यमंत्री फडणवीसांमुळे शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार... बड्या नेत्याचं विधान चर्चेत
राज्यातील 265 तालुक्यात दुष्काळ जाहीर विरोधक काय म्हणतात?
Maharashtra Drought Issue : राज्यातील 265 तालुक्यात दुष्काळ जाहीर विरोधक काय म्हणतात?