Bedroom Vastu Tips : अशा वास्तू दोषामुळे वैवाहिक जीवनात निर्माण होतो दुरावा, जाणून घ्या बेडरूमचा योग्य वास्तू नियम

बेडरुममध्ये बेड नेहमी दक्षिण दिशेला ठेवावा आणि झोपताना डोके उत्तरेकडे असावे. जर हे शक्य नसेल तर तुम्ही तुमचा पलंग पश्चिम दिशेला देखील ठेवू शकता. येथे आपले पाय पूर्वेकडे आणि आपले डोके पश्चिमेकडे असावेत.

Bedroom Vastu Tips : अशा वास्तू दोषामुळे वैवाहिक जीवनात निर्माण होतो दुरावा, जाणून घ्या बेडरूमचा योग्य वास्तू नियम
शांत झोप हवी असेल तर चुकूनही दुर्लक्ष करु नका या वास्तू नियमांकडे
Follow us
| Updated on: Aug 22, 2021 | 5:57 PM

नवी दिल्ली : घर बांधताना आपण पाच घटकांवर आधारित वास्तू नियमांची विशेष काळजी घेतली पाहिजे. जरी आपल्या घराच्या आत बांधलेल्या सर्व खोल्यांना महत्त्व असले तरी तुम्ही बेडरूमची विशेष काळजी घेतली पाहिजे. ज्योतिष शास्त्रानुसार चुकीची दिशा, बेडरूमचा रंग आणि तिथे ठेवलेल्या काही गोष्टी तुमच्या वैवाहिक जीवनात समस्या निर्माण करू शकतात. बेडरुमच्या वास्तु दोषांमुळे, विवाहित जीवनात अनेकदा समस्या दिसतात. (Such architectural defects create distance in married life, know the proper architectural rules)

– वास्तूच्या नियमांनुसार, बेडरूममध्ये एक खिडकी असणे आवश्यक आहे, जेणेकरून सकाळची किरणे बेडरूममध्ये शिरतील आणि त्यांच्या सकारात्मक परिणामामुळे तुमचे आरोग्य चांगले राहील.

– वास्तू नुसार, मुख्य दरवाजाच्या दिशेने पाय ठेवून कधीही झोपू नये आणि अंथरुणासमोर आरसा असू नये. ज्या लोकांच्या पलंगासमोर आरसा असतो, ते अनेकदा अस्वस्थ आणि हैराण असतात.

– पती-पत्नीचे प्रतीक म्हणून बेडरूममध्ये दोन सुंदर सजावट केलेले पॉट ठेवा. हा उपाय केल्यास तुमचे वैवाहिक जीवन सुखी राहील.

– जर तुमच्या आर्थिक दुर्बलतेमुळे तुमचे वैवाहिक जीवन प्रभावित होत असेल तर तुम्ही एका सुंदर बाऊलमध्ये तांदळाच्या दाण्यांसह पवित्र क्रिस्टल मिसळून ठेवा.

– बेडरुममध्ये बेड नेहमी दक्षिण दिशेला ठेवावा आणि झोपताना डोके उत्तरेकडे असावे. जर हे शक्य नसेल तर तुम्ही तुमचा पलंग पश्चिम दिशेला देखील ठेवू शकता. येथे आपले पाय पूर्वेकडे आणि आपले डोके पश्चिमेकडे असावेत.

– बेडरूम नेहमी स्वच्छ आणि सुसज्ज ठेवावे. विसरूनही इथे रद्दी जमा होऊ देऊ नका. तसेच साईड टेबलवर कोणत्याही वस्तू विखुरलेल्या किंवा धुळीने माखलेल्या असू नयेत.

– बेडरूममध्ये ड्रेसिंग टेबल कधीही खिडकीसमोर ठेवू नका कारण खिडकीतून येणाऱ्या प्रकाश परावर्तित झाल्यामुळे त्रास होईल.

– बेडरूममधील फर्निचर धनुषाकार, अर्धचंद्राकार किंवा गोलाकार नसावे कारण यामुळे घरातील सदस्यांच्या आरोग्यावर परिणाम होतो.

– लव्हबर्ड, मँडरेन बदक हे पक्षी प्रेमाचे प्रतीक आहेत. त्यांच्या लहान मूर्तींची एक जोडी तुमच्या बेडरूममध्ये ठेवा. ते वैवाहिक जीवनात आनंद आणतील. (Such architectural defects create distance in married life, know the proper architectural rules)

इतर बातम्या

तालिबानकडून अफगाणिस्तान क्रिकेट संघाबाबत मोठं वक्तव्य, क्रिकेट संघाच्या कर्णधाराची तालिबान अधिकाऱ्यांनी घेतली भेट, म्हणाले…

राज्यात कोणताही पक्ष स्वबळावर सत्ता स्थापन करू शकत नाही; रामदास आठवलेंनी सांगितलं नेमकं कारण

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.