Surya Grahan 2023: ‘या’ दिवशी लागणार वर्षातले पहिले सूर्य ग्रहण, कोणत्या राशींना राहावे लागणार सावध?

यंदा 2023 मध्ये एकूण 4 ग्रहण होतील. यापैकी 2 सूर्यग्रहण (Surya Grahan 2023) आणि 2 चंद्रग्रहणांचा समावेश आहे. पहिले ग्रहण..

Surya Grahan 2023: 'या' दिवशी लागणार वर्षातले पहिले सूर्य ग्रहण, कोणत्या राशींना राहावे लागणार सावध?
सुर्य ग्रहणImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Feb 07, 2023 | 8:35 PM

मुंबई, दरवर्षी होणार्‍या ग्रहणांचा प्रभाव सर्व 12 राशींच्या जातकांच्या जीवनावर दिसून येतो. यंदा 2023 मध्ये एकूण 4 ग्रहण होतील. यापैकी 2 सूर्यग्रहण (Surya Grahan 2023) आणि 2 चंद्रग्रहणांचा समावेश आहे. पहिले ग्रहण 20 एप्रिल रोजी होणार आहे. पहिले सूर्यग्रहण अनेक राशींच्या लोकांच्या जीवनात अडचणी वाढवेल. हे ग्रहण सकाळी 07.04 वाजता होईल आणि दुपारी 12.09 पर्यंत राहील. हे ग्रहण भारतात दिसणार नाही. पण त्याचा वाईट परिणाम या राशीच्या लोकांच्या जीवनावर दिसून येईल.

सूर्यग्रहणाचा या राशींवर होणार वाईट परिणाम होईल

मेष

ज्योतिषशास्त्रानुसार जेव्हा सूर्यग्रहण होईल, त्या वेळी सूर्य मेष राशीत विराजमान होईल. अशा स्थितीत या राशीच्या लोकांना करिअरमध्ये अडचणींचा सामना करावा लागू शकतो. या राशीच्या लोकांच्या जीवनावर सूर्याचा विपरीत परिणाम होईल. या दरम्यान तुमची अनेक महत्त्वाची कामे रखडतील. कुटुंबात अशांततेचे वातावरण राहील. या काळात आरोग्याची विशेष काळजी घ्या. सूर्यग्रहणामुळे मेष राशीच्या लोकांच्या आर्थिक समस्या वाढू शकतात. व्यक्तीला मानसिक तणावाचाही सामना करावा लागू शकतो.

सिंह

सूर्यग्रहणामुळे या राशीच्या राशीच्या लोकांचे काम बिघडेल. या दरम्यान या राशीच्या लोकांना अनेक चढ-उतारांना सामोरे जावे लागू शकते. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना अभ्यासात रस राहणार नाही. पण नंतर परिस्थिती त्यांच्यानुसार होईल.

हे सुद्धा वाचा

कन्या

कन्या राशीच्या लोकांच्या कुंडलीच्या 8 व्या घरात होणारे सूर्यग्रहण मानसिक त्रास देणारे आहे. या दरम्यान तुमचा राग वाढेल आणि तुम्हाला डोकेदुखीच्या समस्येतूनही जावे लागेल. काही गोष्टींची काळजी घेतल्यास फायदा होईल. या दरम्यान बोलण्यावर नियंत्रण ठेवा, अन्यथा समस्या वाढू शकतात. कोणत्याही प्रवासामुळे नुकसान होऊ शकते. शत्रू वाढतील.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Non Stop LIVE Update
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले.
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत.
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.