Surya Grahan 2022 | सूर्यग्रहण आणि शनिश्चरी अमावस्या एकाच दिवशी, या 3 राशींच्या लोकांना राहावे लागणार सावधान…

या सूर्यग्रहणाचा प्रभाव मेष राशीवर पडणार आहे. या राशीच्या लोकांना मानसिक तणावाचा सामना करावा लागू शकतो. या सूर्यग्रहणाचा काळामध्ये आपल्या शत्रूपासून लांबच राहा. कारण यादरम्यान ते तुमच्यावर वर्चस्व गाजवू शकतात. त्यामुळे तुम्ही सावध राहा. यादरम्यान तुमच्यावर अन्याय होण्याची देखील खूप जास्त शक्यता आहे.

Surya Grahan 2022 | सूर्यग्रहण आणि शनिश्चरी अमावस्या एकाच दिवशी, या 3 राशींच्या लोकांना राहावे लागणार सावधान...
Image Credit source: istockphoto.com
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: शितल मुंडे, टीव्ही 9 मराठी डिजीटल

Apr 27, 2022 | 12:15 PM

मुंबई : यंदाच्या वर्षाचे पहिले सूर्यग्रहण (Surya grahan) 30 एप्रिल रोजी होणार आहे. पंचांगानुसार हा दिवस वैशाख कृष्ण पक्षातील अमावास्येचाही दिवस आहे. याशिवाय या दिवशी शनिवार असून 30 एप्रिलला अमावस्या तिथी दुपारी 1 वाजून 57 मिनिटांनी 57 मिनिटांपर्यंत राहील. अमावस्या शनिवारी (Saturday) आहे, त्यामुळे तिला शनिश्चरी अमावस्या असेही म्हणतात. या दिवशी दान करणे आणि स्नान करणे खूप जास्त शुभ मानले जाते. विशेष करून या सूर्यग्रहणाचा प्रभाव 3 राशी जास्त असणार आहे. यामुळे या तीन राशींच्या (3 zodiac signs) लोकांना या सूर्यग्रहणामध्ये विशेष काळजीही घ्यावी लागणार आहेत. या तीन राशी नेमक्या कोणत्या आहेत, याबद्दल सविस्तरपणे जाणून घेऊयात.

मेष

या सूर्यग्रहणाचा प्रभाव मेष राशीवर पडणार आहे. या राशीच्या लोकांना मानसिक तणावाचा सामना करावा लागू शकतो. या सूर्यग्रहणाचा काळामध्ये आपल्या शत्रूपासून लांबच राहा. कारण यादरम्यान ते तुमच्यावर वर्चस्व गाजवू शकतात. त्यामुळे तुम्ही सावध राहा. यादरम्यान तुमच्यावर अन्याय होण्याची देखील खूप जास्त शक्यता आहे. या राशीच्या लोकांनी कोणत्याही कामात घाई करणे टाळावे, सूर्यग्रहणाच्या वेळी प्रवास करणे देखील अशुभ राहील. यामुळे मेष राशींच्या लोकांनी सूर्यग्रहणाच्या वेळी घरामध्येच राहणे चांगले राहिल.

वृश्चिक

वृश्चिक राशींच्या लोकांनी या सूर्यग्रहणाच्या काळामध्ये घराच्या बाहेर जाणे टाळावे. कारण बाहेर पडल्यावर त्यांना अपमानाला सामोरे जाण्याची वेळ निश्चितपणे येऊ शकते. त्यामुळे यावेळी काहीही विचारपूर्वक बोला. आपण काय बोलतो आहे, यावर लक्ष द्या. समोरच्या व्यक्तीला संधी अजिबात देऊ नका. तुमचे शत्रू तुमचे नुकसान करू शकतात. त्याचप्रमाणे या सूर्यग्रहणाचा काळात वाद करणे टाळा.

कर्क

या राशीचा स्वामी चंद्र आहे. यावेळी चंद्र मेष राशीमध्ये राहू सोबत असेल या राशीच्या लोकांना मानसिक तणावाचा सामना करावा लागू शकतो आणि नकारात्मकता राहील. या काळात तुमच्या खर्चात वाढ होऊ शकते. त्यामुळे या राशीच्या लोकांनी संयम राखणे आवश्यक आहे. तसेच आपल्या रागावरही नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करा. अशा परिस्थितीत तुम्ही सतर्क राहणे आवश्यक आहे.

(येथे दिलेली माहिती लोकश्रद्धेवर आधारित आहे, याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही.)

Non Stop LIVE Update

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें