Swastik Importance : स्वस्तिक चिन्हाला हिंदू धर्मात का आहे विशेष महत्त्व? असे आहे उपाय आणि फायदे

हिंदू संस्कृतीतील प्राचीन ऋषीमुनींनी त्यांच्या धर्मातील आध्यात्मिक अनुभवांवर आधारित काही विशेष चिन्हे तयार केली, ही चिन्हे शुभ भावना प्रकट करतात, असेच एक प्रतीक आहे स्वस्तिक.

Swastik Importance : स्वस्तिक चिन्हाला हिंदू धर्मात का आहे विशेष महत्त्व? असे आहे उपाय आणि फायदे
स्वस्तिक Image Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Sep 10, 2023 | 3:00 PM

मुंबई : आपल्या भारतीय संस्कृतीत स्वस्तिकला खूप शुभ मानले जाते. स्वस्तिक हे शुभतेचे प्रतीक मानले जाते. जेव्हा आपण कोणतेही शुभ कार्य करतो किंवा कोणतेही कार्य सुरू करतो तेव्हा आपण स्वस्तिक चिन्ह (Swastik Sign) बनवतो. याशिवा. मंगल प्रसंगी आपण त्याची पूजाही करतो, जेणेकरून आपले कार्य सुख आणि समृद्धीने भरले जाईल. स्वस्तिकचा शाब्दिक अर्थ शुभ किंवा मंगल असा होतो. स्वस्तिक चिन्ह केवळ हिंदू धर्मातच नाही तर सर्व धर्मात पवित्र मानले जाते. हिंदू संस्कृतीतील प्राचीन ऋषीमुनींनी त्यांच्या धर्मातील आध्यात्मिक अनुभवांवर आधारित काही विशेष चिन्हे तयार केली, ही चिन्हे शुभ भावना प्रकट करतात, असेच एक प्रतीक आहे स्वस्तिक. स्वस्तिक हा सकारात्मक ऊर्जेचा स्रोत मानला जातो. ज्या घरात पूजेच्या वेळी स्वस्तिकाचे शुभ चिन्ह बनवले जाते, त्या घरात सुख-समृद्धी राहते आणि कुटुंबात समृद्धी नांदते. या कारणामुळे कोणतेही काम सुरू करण्यापूर्वी स्वस्तिक बनवले जाते.

स्वस्तिक आनंद आणि समृद्धी आणते

वास्तुशास्त्रातही स्वस्तिक अत्यंत शुभ मानण्यात आले आहे.कुठल्याही घरात स्वस्तिक स्थापित केले तर तेथे सुख-समृद्धी वास करते आणि संपत्तीत वृद्धी होते. घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर स्वस्तिक लावणे खूप शुभ मानले जाते. धार्मिक कार्यक्रमात स्वस्तिक बनवणे खूप शुभ मानले जाते. स्वस्तिक काढल्याने देवी-देवता घरात प्रवेश करतात आणि त्यामध्ये सुख-समृद्धी वास करते. गुरु पुष्य योगात केलेले स्वस्तिक तुम्हाला शांती देते. जर तुम्हाला रात्री झोप येत नसेल, तर झोपण्यापूर्वी तुमच्या तर्जनीने स्वस्तिक बनवा आणि झोपायला जा, तर तुम्हाला चांगली झोप लागेल आणि भयानक स्वप्नेही थांबतील.

स्वस्तिकचे चमत्कारिक आणि लाभदायक आहे

तिजोरीवर स्वस्तिक लावल्याने तुम्हाला पैशाची कमतरता भासणार नाही आणि घरात सुख-समृद्धी येईल. जर तुम्ही तुमच्या तिजोरीत काही पैसेही ठेवले तर तुम्हाला फायदा होईल. हे उपाय खूप चमत्कारिक आणि फायदेशीर आहेत. जर तुम्हाला तुमच्या वैवाहिक जीवनात खूप समस्या येत असतील तर पूजा करताना हळदीचे स्वस्तिक बनवा, यामुळे तुम्हाला खूप फायदा होईल. वाईट नजरेपासून घराचे रक्षण करण्यासाठी घराबाहेर शेणाचे स्वस्तिक बनवा, फायदा होईल. घराच्या मुख्य दारावर स्वस्तिक बनवल्यास घरामध्ये नकारात्मक उर्जा प्रवेश करत नाही. आपल्या पूर्वजांचा आशीर्वाद आपल्यावर राहतो.

हे सुद्धा वाचा

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

'कारण टायगर अभी जिंदा है...',अमोल कोल्हेंची फटकेबाजी, बघा काय म्हणाले?
'कारण टायगर अभी जिंदा है...',अमोल कोल्हेंची फटकेबाजी, बघा काय म्हणाले?.
उद्धव ठाकरेंवर अ‍ॅन्जिओप्लास्टी शस्त्रक्रिया, डॉक्टरांचा सल्ला काय?
उद्धव ठाकरेंवर अ‍ॅन्जिओप्लास्टी शस्त्रक्रिया, डॉक्टरांचा सल्ला काय?.
भाजप आमदारासमोर महिलांना वाटलेल्या साड्या मराठा आंदोलकांनी पेटवल्या अन
भाजप आमदारासमोर महिलांना वाटलेल्या साड्या मराठा आंदोलकांनी पेटवल्या अन.
UP च्या बहरइचमध्ये देवी विसर्जनावेळी गोळीबार, संतप्त जमावाकडून जाळपोळ
UP च्या बहरइचमध्ये देवी विसर्जनावेळी गोळीबार, संतप्त जमावाकडून जाळपोळ.
सिद्दीकींच्या हत्येचा कट याच घरात शिजला; बघा एक्सक्ल्युझिव्ह व्हिडीओ
सिद्दीकींच्या हत्येचा कट याच घरात शिजला; बघा एक्सक्ल्युझिव्ह व्हिडीओ.
बाबा सिद्दीकींसह झिशान यांच्याही हत्येचा होता कट, आरोपींची मोठी कबुली
बाबा सिद्दीकींसह झिशान यांच्याही हत्येचा होता कट, आरोपींची मोठी कबुली.
राज ठाकरे राजकीय सस्तन प्राणी, जे साडेचार वर्षे..अंधारेंची बोचरी टीका
राज ठाकरे राजकीय सस्तन प्राणी, जे साडेचार वर्षे..अंधारेंची बोचरी टीका.
आचारसंहितेपूर्वी मंत्रिमंडळ बैठकीत निर्णयाचा धडाका, 19 निर्णय जारी
आचारसंहितेपूर्वी मंत्रिमंडळ बैठकीत निर्णयाचा धडाका, 19 निर्णय जारी.
सरकारकडून टोलमाफी अन् राज ठाकरे म्हणाले, 'ही आनंदाची बाब, पण फक्त...'
सरकारकडून टोलमाफी अन् राज ठाकरे म्हणाले, 'ही आनंदाची बाब, पण फक्त...'.
सरकारकडून टोलमाफी अन् मनसेचा एकच जल्लोष; अविनाश जाधव म्हणाले...
सरकारकडून टोलमाफी अन् मनसेचा एकच जल्लोष; अविनाश जाधव म्हणाले....