AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

या ठिकाणी आहे महादेवाचे सर्वात उंच मंदिर, मंदिराचा महाभारताशी आहे संबंध

यावर्षी महाशिवरात्री हा सण बुधवार २६ फेब्रुवारी रोजी साजरा केला जाणार आहे. शिवभक्तांसाठी हा सण विशेष आहे. या खास प्रसंगी जाणून घेऊ जगातील सर्वात उंच शिव मंदिराबद्दल ज्याचा इतिहास महाभारताशी जोडलेला आहे.

या ठिकाणी आहे महादेवाचे सर्वात उंच मंदिर, मंदिराचा महाभारताशी आहे संबंध
Tungnath Temple
आकांक्षा वाघ
आकांक्षा वाघ | Edited By: | Updated on: Feb 22, 2025 | 11:21 PM
Share

भारताव्यतिरिक्त नेपाळ, भूतान आणि मॉरिशससह जगभरात महादेवाची मंदिरे आहेत. तुम्हाला माहिती असेलच की भारतात महादेवाची12 ज्योतिर्लिंग मंदिरे आहेत. ज्यांना भेट देणे हिंदू कुटुंबांसाठी एक मोठे ध्येय आहे. महाशिवरात्रीला लाखो भाविक या मंदिरात दर्शनासाठी जात असतात. पण तुम्हाला माहित आहे का की भारतात जगातील सर्वात उंच महादेवाचं मंदिर देखील आहे?

हे मंदिर उत्तराखंडच्या रुद्रप्रयाग जिल्ह्यात आहे. ज्याचे नाव तुंगानाथ आहे. तुंगनाथ मंदिर हे जगातील सर्वात उंच शिवमंदिर आहे. हे मंदिर समुद्रसपाटीपासून अंदाजे 3,680 मीटर (12,073 फूट) उंचीवर आहे. महादेवांचे हे मंदिर पंच केदार तीर्थक्षेत्रांमध्ये समाविष्ट आहे. तुंगनाथ मंदिरात जाण्यासाठी तुम्हाला आधी सोनप्रयागला जावे लागेल. यानंतर तुम्ही गुप्तकाशी, उखीमठ, चोपटा मार्गे तुंगानाथ मंदिरात पोहोचू शकता.

महाभारताशी संबंधित आहे या मंदिराचा इतिहास

तुंगानाथचा शाब्दिक अर्थ ‘पर्वतांचा स्वामी’ असा होतो. परंतु जगातील सर्वोच्च महादेव मंदिराचा इतिहास महाभारत काळाशी जोडलेला आहे. स्थानिक लोकांच्या मते या मंदिराचा पाया अर्जुनने घातला होता. महादेवांना प्रसन्न करण्यासाठी पांडवांनी हजारो वर्षांपूर्वी हे मंदिर बांधले होते असेही सांगितले जाते.

अशी मान्यता आहे की महाभारत युद्धात पांडवांनी आपल्या भावांना आणि गुरूंना मारले होते. त्यामुळे ते हत्येच्या पापात दोषी होते. ऋषी व्यासांनी त्यांना सांगितले होते की महादेवांची क्षमा मिळाल्यानंतर ते त्याच्या सर्व पापांपासून मुक्त होतील.

तुंगानाथ येथील मंदिरात महादेवांचे हात सापडल्याचे सांगितले जाते. तुंगनाथ मंदिरा शिवाय पंच केदारमध्ये केदारनाथ, रुद्रनाथ, मध्यमहेश्वर आणि कल्पेश्वर मंदिरे आहेत. महाशिवरात्रीला या मंदिराचे दर्शन घेतल्याने सर्व पापांचा नाश होतो असे सांगितले जाते. त्यामुळे तुम्हीही महाशिवरात्रीला महादेवांचे दर्शन घेणार असाल तर तुंगानाथ मंदिराला अवश्य भेट द्या.

Follow Us
अखेर मुळ शिवसेना कुणाची? सिब्बलांकडून थेट लेखी निवेदनाची प्रत सादर
अखेर मुळ शिवसेना कुणाची? सिब्बलांकडून थेट लेखी निवेदनाची प्रत सादर, चार मुद्यामध्येच... कोर्टात नेमकं काय घडलं?
TET पेपरफुटीचं महाराष्ट्र कनेक्शन उघड! खासगी अकॅडमी चालकाला अटक
TET पेपरफुटीचं महाराष्ट्र कनेक्शन उघड! सोलापुरातून खासगी अकॅडमी चालकाला अटक
रेवती सुळेंच्या रिसेप्शन सोहळ्यातील सर्वात खास व्हिडीओ!
रेवती सुळेंच्या रिसेप्शन सोहळ्यातील सर्वात खास व्हिडीओ! पंतप्रधान आणि रोहित पवारांच्या संवादादरम्यानच...
जरांगेंनी विशिष्ट समाजाच्या भावना दुखावू नये! अभ्यासपूर्ण बोला
Sachin Kharat | विशिष्ट समाजाच्या भावना दुखावू नका! अभ्यासपूर्ण बोला; सचिन खरातांचा जरांगेंना थेट इशारा
उबाठाचा मोठा डाव! शिवसेना पक्षाच्या 2018च्या घटनेनुसार...
उबाठाचा मोठा डाव! शिवसेना पक्षाच्या 2018च्या घटनेनुसार... ठाकरेंचे वकील थेट निवडणुक आयोगालाच घेरणार?
वसई-विरारमध्ये पावसाचा धुमाकूळ! विवा कॉलेज परिसर जलमय, रस्त्यांना...
Vasai-Virar | वसई-विरारमध्ये पावसाचा धुमाकूळ! विवा कॉलेज परिसर जलमय, रस्त्यांना नदीचं स्वरूप
स्वातंत्र्यादिनी लाल किल्ल्यावर घडणार इतिहास! पहिल्यांदाच...
स्वातंत्र्यादिनी लाल किल्ल्यावर घडणार इतिहास! पहिल्यांदाच... एकनाथ शिंदेंनी काय सांगितलं?
राष्ट्रवादीत मोठा भूकंप? तटकरे जाणार, नवा प्रदेशाध्यक्ष कोण?
राष्ट्रवादीत मोठा भूकंप? तटकरे जाणार, नवा प्रदेशाध्यक्ष कोण? अनिल पाटलांनी स्पष्टच सांगितलं!
हा अपघात नाही, निर्दयी व्यवस्थेने केलेला प्रशासकीय खून! पवार संतापले
Rohit Pawar Tweet | हा अपघात नाही, निर्दयी व्यवस्थेने केलेला प्रशासकीय खून! आश्रमशाळेतील विद्यार्थिनींच्या मृत्यूवर रोहित पवार संतापले
मोठी बातमी! मनोज जरांगेंच्या ताफ्यातील वाहनांचा अपघात, 2- 3 वाहनं...
मोठी बातमी! मनोज जरांगेंच्या ताफ्यातील वाहनांचा अपघात, 2- 3 वाहनं एका पाठोपाठ...