Tulsi Vivah 2026 : ना आंबा, ना केळी… तुळशी विवाहात उसाच्याच कांड्यांचा मंडप का असतो? जाणून घ्या कारण

kartitki Ekadashi : आपण दरवर्षी तुळशीच्या लग्नाला अगदी आवडीने जातो. वाजत गाजत लग्नही लावतो. पण कधी विचार केलाय का? तुळशीभोवती मांडला जाणारा मंडप नेहमी उसाचाच का असतो? आंब्याच्या फांदीचा किंवा इतर कोणत्या झाडाचा का नसतो? जाणून घ्या सविस्तर

Tulsi Vivah 2026 :  ना आंबा, ना केळी…  तुळशी विवाहात उसाच्याच कांड्यांचा  मंडप का असतो? जाणून घ्या कारण
tulsi vivah 2026
Image Credit source: SOCIAL MEDIA
| Updated on: Nov 20, 2026 | 5:55 PM

तुळशी विवाह म्हटलं की घराघरात लगबग सुरू होते वृंदावनाचे सजावट केली जाते. तुळशी मातेला साडी नेसवली जाते आणि तिच्या भोवती उसाचा सुंदर मंडप उभारला जातो. पण कधी विचार केलाय का? की तुळशी विवाहात उसाचाच मंडप का घालतात. इतर झाडांच्या फांद्या किंवा लाकडाचा वापर का केला जात नाही? यामागे धार्मिक श्रद्धा शोभत्व आणि समृद्धीची जोडलेली परंपरा आहे.

उसाचा म्हणजे उभारणामागे काय कारण आहेत ?

हिंदू धर्मात ऊस हा गोडवा समृद्धी आणि भरभराटीचा प्रतीक मानला जातो. उसामध्ये गोड रस असतो. त्यामुळे तुळशी माता आणि भगवान विष्णू यांच्या विवाहातून प्रत्येकाच्या आयुष्यातही गोडवा, प्रेम आणि आनंद नांदावा, अशी भावना या परंपरेमागे जोडली जाते. वैवाहिक जीवन सुखी आणि समृद्ध रहावे अशी प्रार्थना करत उसाच्या कांड्यांचा मंडप उभारला जातो.

Loading...

लग्नाच्या मंडपाप्रमाणे असते सजावट

जसं घरातील लग्न सोहळ्यात वधूवरांसाठी सुंदर मंडप तयार केला जातो. अगदी तसाच तुळशी विवाहातही मंडप उभारण्याची परंपरा आहे. यासाठी साधारणपणे उसाच्या 4 कांड्या घेऊन तुळशी वृंदावनाच्या चारही बाजूंना लावल्या जातात. त्यावर फुले आंब्याची पाने आणि इतर सजावटीच्या वस्तू लावल्या जातात. त्यानंतर तुळशीमध्येचा विवाह शाळीग्राम शिळेची लावला जातो

शेतकरी संस्कृतीशीही जोडलेली परंपरा

ऊस हे महत्त्वाचं नगदी पीक आहे त्यापासून गुळ आणि साखर तयार केली जाते. त्यामुळे ग्रामीण भागात ऊसाला विशेष महत्त्व आहे शेतीतून मिळणारा उत्पन्नाबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे आणि घरात धनधान्याची भरभराट व्हावी. अशी इच्छा व्यक्त करणे हा भाग या भावनाही या परंपरेशी जोडलेल्या आहेत.
कार्तिक महिन्यात उसाचे पीक तयार होण्याच्या काळाशी हा सण जोडला जातो. त्यामुळे पूजेमध्ये ऊस आणि हंगामी फळांचा समावेश करून निसर्गाने दिलेला समृद्धी बद्दल कृतज्ञता व्यक्त केली जाते

तुळशी विवाह हा केवळ तुळशीचे रोप आणि शाळीग्राम यांचा विवाह नसून श्रद्धा आणि निसर्गाशी जोडलेला उत्सव आहे. तुळशीला पवित्र मानलं जात तर ऊस गोडवा आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते. त्यामुळे दोन्हींचा समावेश असलेला विवाह सोहळा शुभ असतो.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us