घाणेरड्या हातांनी कधीही ‘या’ गोष्टींना स्पर्श करू नये; आर्थिक प्रगती थांबते
शास्त्रात अनेक चांगल्या-वाईट गोष्टींबद्दल सांगितलं गेलं आहे. तसेच शुभ आणि अशुभ गोष्टींबद्दलही सांगण्यात आलं आहे. शास्त्रानुसार अशा काही वस्तू असतात ज्यांना घाणेरड्या हातांनी कधीही स्पर्श करणे टाळले पाहिजे अन्यथा ही सवय किंवा ही चूक आर्थिक प्रगतीस बाधा आणू शकते.

शास्त्रांमध्ये देवांपासून ते अनेक शुभ-अशुभ गोष्टींबद्दल सांगतिले गेले आहे. तसेच पूजेचे नियम ते कोणत्या पद्धतीने करायचे हे देखील शास्त्रात सांगण्यात आले आहे. तसेच प्रत्येका व्यक्तील आपल्या आयुष्यात सुख, शांती, समृद्धी, पैसा हवा असतो. त्यासाठी प्रत्येकाला वाटते की लक्ष्मी देवीची कृपा आपल्यावर राहिली पाहिजे. याबद्दलही शास्त्रांमध्ये काही गोष्टी सांगितल्या गेल्या आहेत ज्यांचे पालन करणे गरजेचे आहे. जसं की वस्तू आहेत ज्यांनी कधीही अशुद्ध हातांनी किंवा घाणेरड्या हातांनी स्पर्श करू नये . अन्यथा आर्थिक प्रगती होण्यास अडथळे येऊ शकतात. चला तर मग जाणून घेऊयात त्या कोणत्या गोष्टी किंवा वस्तू आहेत ज्यांना घाणेरड्या हातांनी कधीही स्पर्श करू नये
या वस्तूंना घाणेरड्या हातांनी कधीही या गोष्टींना स्पर्श करू नये
पैसे वास्तुशास्त्रानुसार , कधीही पैशाला किंवा अशुद्ध किंवा घाणेरड्या हातांनी पैसे ठेवलेल्या जागेला स्पर्श करू नये. असे करणाऱ्यांच्या घरात लक्ष्मी कधीच वास करत नाही. असे लोकांना बऱ्याचदा आर्थिक अडचणी येत असतात. जेवणानंतर उष्ट्या हातांनी किंवा कोणत्याही अशुद्ध जागेला स्पर्श केल्यानंतर लगेच हात धुवावेत आणि मगच पैशांना हात लावावा. तसेच कधीही घाणेरड्या हातांनी पर्सलाही स्पर्श करू नये.दरम्यान पैसे साठवण्याची जागा, पर्स, लॉकर हे नेहमी स्वच्छ आणि निटनेटके असावे.
लक्ष्मीची मूर्ती किंवा मंदिर
घरातील मंदिराला किंवा लक्ष्मीच्या मूर्तीला कधीही घाणेरड्या हातांनी स्पर्श करू नये ते नक्कीच अशुभ मानले जाते. शरीर आणि मन दोन्हीची शुद्धता आवश्यक आहे. जे लोक घाणेरड्या हातांनी मंदिराला किंवा लक्ष्मीच्या मूर्तीला स्पर्श करणे अशुभ मानले जाते.
तुळस किंवा धार्मिक पुस्तके
शास्त्रांनुसार तुळशीला देवी लक्ष्मीचे रूप म्हणून वर्णन केले आहे. वास्तुनुसार, चुकूनही तुळशीला घाणेरड्या हातांनी किंवा अंघोळ न करता स्पर्श करू नये. तुळशीची पूजा करण्यापूर्वी किंवा तिला पाणी अर्पण करण्यापूर्वी स्नान करणे देखील अनिवार्य आहे. त्याचप्रमाणे, घाणेरड्या हातांनी धार्मिक पुस्तकांनाही स्पर्श करणे टाळले पाहिजे. कारण हा धार्मिक पुस्तकांचा अपमान मानला जातो.
( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आली आहे. तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करत नाही, अंधश्रद्धेला दुजोरा नाही)
