AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vastu Shastra : रविवारच्या दिवशी चुकूनही करू नका ही कामं, सूर्यदेव होतात नाराज, घरात येते गरिबी

हिंदू धर्मशास्त्रामध्ये प्रत्येक वार हा कोणत्या न कोणत्या देवी देवतांना समर्पित आहे, तसेच प्रत्येक वारी कोणती कामं करायची आणि कोणती नाही हे देखील निश्चित करण्यात आलं आहे. वास्तुशास्त्रानुसार अशी काही कामं आहेत, जी रविवारी करणं अशुभ मानलं जातं. त्याबद्दल आज आपण माहिती जाणून घेणार आहोत.

Vastu Shastra : रविवारच्या दिवशी चुकूनही करू नका ही कामं, सूर्यदेव होतात नाराज, घरात येते गरिबी
Vastu ShastraImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Jul 12, 2026 | 8:54 PM
Share

हिंदू धर्मशास्त्रानुसार प्रत्येक वार हा कोणत्या कोणत्या देवतेला समर्पित असतो. जसं की शुक्रवार हा माता लक्ष्मीला समर्पित आहे. शनिवार हा शनि देव आणि हनुमान यांना समर्पित आहे. तर रविवार हा सूर्य देवतेला समर्पित आहे. त्या-त्या वारी त्या -त्या देवी देवतेची उपासना केल्यास आपल्याला इच्छित फळाची प्राप्ती होते, असं वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे. तसेच कोणत्या वारी कोणती कामं करायची आणि कोणती कामं करायची नाहीत? याची देखील माहिती वास्तुशास्त्रामध्ये देण्यात आली आहे. अशी काही विशिष्ट कामं असतात जी रविवारच्या दिवशी करत नाहीत, रविवार हा सूर्य देवतेला समर्पित वार आहे. आज आपण रविवारच्या दिवशी कोणती कामं करू नयेत आणि त्यासंदर्भात वास्तुशास्त्रामध्ये नेमकं काय सांगण्यात आलं आहे? त्याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत.

रविवारी सूर्य देवतेच्या पूजेचं महत्त्व

रविवार हा सूर्य देवतेला समर्पित आहे. त्यामुळे रविवारी सूर्य देवतेची पूजा करणं, उपासना करणं हे अत्यंत शुभ मानलं जातं. सूर्य देवतेला आयुष्यातील अंधाकर दूर करून प्रकाश निर्माण करणाऱ्या देवतेचं प्रतिक मानलं जातं. सूर्य देवतेला तेज, गती आणि आत्मविश्वास यांचं देखील प्रतिक मानलं जातं. त्यामुळे दर रविवारी सूर्य देवतेची पूजा केली पाहिजे असं वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे. सूर्य देवतेच्या कृपेनं तुमच्या आयुष्यातील सर्व संकट दूर होतात. सकाळी लवकर अंघोळ करून सूर्य देवतेला जल अर्पण करा, तसेच एक लाल फूल अर्पण करावं, असं देखील वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे.

रविवारच्या दिवशी कधीही पश्चिम किंवा वायव्य दिशेला प्रवास करू नये, असं वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे. रविवारी या दोन दिशेला प्रवास करणं अशुभ मानलं जातं. यामुळे तुमच्या महत्त्वाच्या कामात अडथळे येऊ शकतात.

तांब्याच्या वस्तू विकू नका – रविवारी कधीही तांब्यांच्या वस्तू विकू नये असा सल्ला वास्तुशास्त्रामध्ये देण्यात आला आहे. कारण तांबा हा धातू सूर्य देवतेशी संबंधित आहे. तुम्ही जेव्हा रविवारी तांब्याच्या धातूच्या वस्तू विकता किंवा तांबं धातू विकता तेव्हा तुमच्या कुंडलीमध्ये सूर्य कमजोर होतो. जेव्हा कुंडलीमध्ये सूर्य कमजोर होतो, तेव्हा तुम्हाला विविध प्रकारच्या आर्थिक अडचणी येतात. तुम्हाला इतरांकडून मान  सन्मान मिळत नाही, असं वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
सुनेत्रा पवार यांना मुख्यमंत्रीपदाची संधी द्या, बड्या नेत्याच्या मागणी
सुनेत्रा पवार यांना मुख्यमंत्रीपदाची संधी द्या, बड्या नेत्याच्या मागणीने राजकीय वर्तुळात खळबळ!
एकच खळबळ! मुंबई लोकलमधील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर; थेट पोलिसांवर
एकच खळबळ! मुंबई लोकलमधील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर; थेट पोलिसांवरच उगारला चाकू, पुढे...
आगामी मुख्यमंत्री कोण होणार? चर्चांदरम्यानच राष्ट्रवादीतील नेत्याचं
आगामी मुख्यमंत्री कोण होणार? चर्चांदरम्यानच राष्ट्रवादीतील नेत्याचं फडणवीसांबाबत मोठं विधान, थेट...
पावसाने दिला दगा! 50 हजार खर्च करूनही परळीत सोयाबीनने टाकल्या माना
Beed | पावसाने दिला दगा! 50 हजार खर्च करूनही परळीत सोयाबीनने टाकल्या माना; शेतकरी हवालदिल
बुलढाण्याने पांघरला हिरवा शालू! पर्वतरांगांचं मनमोहक रूप पहाच
Buldhana | बुलढाण्याने पांघरला हिरवा शालू! सह्याद्री-अजिंठा पर्वतरांगांचं मनमोहक रूप पहाच
शरद पवारांचे फोटो पुन्हा राष्ट्रवादीच्या बॅनरवर झळकणार? परवानगी
NCP Banner | शरद पवारांचे फोटो पुन्हा राष्ट्रवादीच्या बॅनरवर झळकणार? परवानगी अन्... राजकीय चर्चांना उधाण
आधी मकोका, मगच अंत्यसंस्कार! युवकाच्या मृत्यूनंतर श्रीरामपूरमध्ये....
Shrirampur Crime Case | आधी मकोका, मगच अंत्यसंस्कार! युवकाच्या मृत्यूनंतर श्रीरामपूरमध्ये मृतदेहासह पोलिस ठाण्यात ठिय्या आंदोलन
मध्य रेल्वेचा खोळंबा! मालगाडीच्या इंजिनमध्ये बिघाड; लोकलसह....
Asangaon to Vasind | मध्य रेल्वेचा खोळंबा! मालगाडीच्या इंजिनमध्ये बिघाड; लोकलसह एक्स्प्रेस गाड्या अर्धा तास रांगेत
री-डेव्हलपमेंटचा बेफिकीर खेळ! भर रस्त्यात कोसळली इमारत; खिडकीतून...
Kalyan Collapsed Building | री-डेव्हलपमेंटचा बेफिकीर खेळ! भर रस्त्यात कोसळली इमारत; खिडकीतून उडी मारून...
मोठी बातमी! ठाकरेंच्या गटातील नगरसेविका शिंदे सेनेच्या वाटेवर? राजकीय
मोठी बातमी! ठाकरेंच्या गटातील नगरसेविका शिंदे सेनेच्या वाटेवर? राजकीय घडामोडींना वेग