
वास्तुशास्त्र हे एक असं शास्त्र आहे, ते आपल्याला आपलं घर कसं असावं याबद्दल तर मार्गदर्शन करतच, मात्र आपल्याकडून अनेकदा काही छोट्या-छोट्या चुका होतात, त्या चुका कशा टाळाव्यात? त्याचे भविष्यात काय परिणाम होऊ शकतात? हे देखील वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे. अनेक लोकांना बाहेरून आलं की चपला -बूट घालून थेट घरात प्रवेश करण्याची सवय असते, मात्र ही सवय आरोग्याच्या दृष्टीकोनातून तर चुकीची आहेच, मात्र वास्तुशास्त्रात देखील या सवयीला अयोग्य मानण्यात आलं आहे. वास्तुशास्त्रानुसार ज्या लोकांना चपला बूट घालून थेट घरात प्रवेश करण्याची सवय असते, अशा लोकांकडे पैसा कधीच टिकत नाही, घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होते, असं वास्तुशास्त्र सांगतं. चला तर मग जाणून घेऊयात, वास्तुशास्त्रामध्ये नेमकं काय सांगितलं आहे त्याबद्दल.
वास्तुशास्त्रानुसार तुम्हालाही जर तुमच्या घरात चपला बूट घालून थेट प्रवेश करायची सवय असेल तर आरोग्याच्या दृष्टीकोनातून ही सवय अत्यंत चुकीची आहे, कारण तुम्ही जेव्हा बाहेरून येता, तेव्हा तुमच्या चपलेला किंवा बूटामध्ये शेकडो प्रकारचे सूक्ष्मजीव असतात जे तुमच्या डोळ्याला दिसत पण नाहीत, मात्र जेव्हा तुम्ही चपला किंवा बूट घरामध्ये काढता तेव्हा हे सूक्ष्मजीव तुमच्या घरामध्ये सर्वत्र पसरू शकातात, त्यामुळे तुम्ही आजारी पडण्याचा देखील धोका, असतो. एवढंच नाही तर वास्तुशास्त्रामध्ये देखील बाहेरून आल्यानंतर चपला थेट घरात घेऊन जाऊ नये असं म्हटलं आहे.
वास्तुशास्त्रानुसार तुम्ही जेव्हा बाहेरून आल्यानंतर चपला किंवा बूट घेऊन थेट घरात प्रवेश करता, तेव्हा घरात एक प्रकारची नकारात्मक ऊर्जा निर्माण होते, ज्याचा परिणाम हा तुमच्या आर्थिक स्थितीसह आरोग्यावर देखील होतो. लक्ष्मी माता नाराज होते. घरात पैसा टिकत नाही, त्यामुळे कधीही चप्पल किंवा बूट घालून घरात प्रवेश करू नये, चप्पल व बूट नेहमी घराच्या बाहेरच काढावेत असा सल्ला वास्तुशास्त्रामध्ये देण्यात आला आहे.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)