AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vastu Shastra : तुम्हालाही वाहनाची चावी दारामागे अडकून ठेवण्याची सवय आहे का? जाणून घ्या शुभ की अशुभ? वास्तुशास्त्र काय सांगतं?

आपण आपल्या दैनंदिन जीवनात ज्या काही कृती करत असतो, त्यामुळे आपल्या घरात सकारात्मक किंवा नकारात्मक ऊर्जा निर्माण होत असते. घरात नकारात्मक ऊर्जा वाढली तर वास्तुदोष निर्माण होतो. वाहानांच्या चाव्या या दरवाजामागे अडकवणं योग्य आहे का? वास्तुशास्त्र त्याबद्दल काय सांगतं? हे आज आपण जाणून घेणार आहोत.

Vastu Shastra : तुम्हालाही वाहनाची चावी दारामागे अडकून ठेवण्याची सवय आहे का? जाणून घ्या शुभ की अशुभ? वास्तुशास्त्र काय सांगतं?
vastushtra Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Jun 14, 2026 | 7:48 PM
Share

हिंदू धर्मामध्ये वास्तुशास्त्राला प्रचंड महत्त्व आहे. वास्तुशास्त्रानुसार आपण आपल्या दैनंदिन जीवनात ज्या काही अशा गोष्टी करत असतो, त्यामुळे घरात नकारात्मक किंवा सकारात्मक ऊर्जा तयार होत असते. अनेकदा आपल्या नकळत वास्तुशास्त्राच्या दुष्टिकोणातून काही चुकीच्या गोष्टी घडतात, त्यामुळे तुमच्या घरात नकारात्मक ऊर्जा वाढते, नकारात्मक ऊर्जा वाढल्याने घरात विविध प्रकारचे वास्तुदोष निर्माण होतात, ज्याचा परिणाम हा आपल्या आयुष्यावर होतं असतो. अगदी चावी कुठे ठेवावी आणि कुठे ठेवू नये? याबद्दल देखील काही नियम वास्तुशास्त्रात सांगण्यात आले आहेत, त्यातीलच काही नियमांबद्दल आज आपण माहिती जाणून घेणार आहोत.

अनेकांना आपल्या घरात कुठेही वाहन किंवा इतर गोष्टींच्या चाव्या ठेवण्याची सवय असते, मात्र वास्तुशास्त्रानुसार ही अतिशय चुकीची पद्धत आहे. या गोष्टींमुळे घरात वास्तुदोष निर्माण होतो. घरातील चाव्या या योग्य ठिकाणीच ठेवल्या गेल्या पाहिजेत असं वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे. वास्तुशास्त्रानुसार अनेकांना किचनमध्ये डायनिंग टेबलवर चाव्यांचा गुच्छा ठेवण्याची सवय असते, मात्र ही सवय चुकीची आहे, असं वास्तुशास्त्र सांगतं. यामुळे घरात पती-पत्नीमधील वाद वाढतात, त्यामुळे वातावरण तणावपूर्ण बनतं. मनामध्ये अस्वस्थता वाढते असं वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे.

त्याचप्रमाणे कधीही मुख्य दरवाजाजवळ चाव्या लावू नये, असं देखील वास्तुशास्त्रामध्ये सांगितलं आहे. अनेकांना मुख्य दरवाजामागे चाव्या अडकून ठेवण्याची सवय असते, आपल्याला चावी लगेच मिळावी हा त्यामागचा विचार असतो. पंरतु ही सवय चुकीची असल्याचं वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे, यामुळे घरातील सकारात्मक ऊर्जा घरातून बाहेर पडते, त्यामुळे घरात विविध समस्या निर्माण होतात.

चावी अडकवण्यासाठी योग्य दिशा कोणती? वास्तुशास्त्रानुसार घरातील चाव्या या नेहमी पूर्व किंवा उत्तर दिशेच्या भिंतीलाच अडकून ठेवाव्यात. तसेच त्या कधीही किचनमध्ये किंवा घराच्या मुख्य दरवाजाच्या मागे अडकवू नयेत, असं वास्तुशास्त्रात सांगण्यात आलं आहे.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार...
आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब
Chandrashekhar Bawankule : आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब, बावनकुळेंनी दिली महायुती बैठकीची माहिती
विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
'विद्यार्थी भीक नाही हक्क मागतायत', पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
Dharashiv | धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
निधीवरुन मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा काढला जाणार
महायुतीच्या समन्वय समितीची बैठक: निधीवरून मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा, फडणवीस-शिंदेंकडे अंतिम निर्णय
पुण्यात राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीने मांडले आदिवासींचे प्रश्न
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोर विद्यार्थीनीनं आदिवासींच्या समस्यांचा पाढा वाचला
नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
खान्देशात कानबाई विसर्जन २०२४; उत्साही सोहळा
खान्देशात कानबाई मातेचं विसर्जन: लोकसंस्कृतीचा उत्साही सोहळा