Vastu Shastra : तुमच्या घरातही असतील हे 4 वास्तुदोष तर आजच व्हा सावध, घरात कधीच पैसा टिकणार नाही
वास्तुशास्त्रामध्ये वास्तुदोष आणि त्यामुळे निर्माण होणाऱ्या परिणामांबद्दल माहिती देण्यात आली आहे, तसेच घरात जर वास्तुदोष निर्माण झाला तर तो दूर कसा करायचा? याबद्दल देखील अनेक उपाय वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आले आहेत. घरात काही असे वास्तुदोष असतात ज्यामुळे पैसा घरात टिकत नाही, त्याबद्दल आज आपण माहिती जाणून घेणार आहोत.

वास्तुशास्त्र हे एक असं शास्त्र आहे, जे सकारात्मक ऊर्जा आणि नकारात्मक ऊर्जा अशा दोन गोष्टींवर प्रामुख्यानं कम करते. वास्तुशास्त्रानुसार जेव्हा तुमच्या घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होते, तेव्हा त्याचा परिणाम हा तुमच्या एकट्यावरच होत नाही, तर तुमच्या संपूर्ण कुटुंबावर होतो. ज्या घरात नकारात्मक ऊर्जा असते, त्या घरात सतत काहीही कारण नसताना भांडण होतात. तुम्ही कितीही कष्ट केले तरी पैसा हातात टिकत नाही, सातत्यानं आर्थिक अडचणी येतात. आरोग्याचे प्रश्न निर्माण होतात. त्यामुळे अशा घरातील वास्तूदोष दूर करणं गरजेचं असतं. तर ज्या घरात सकारात्मक ऊर्जेचा संचार असतो, त्या घरात याच्या उलट परिस्थिती पहायला मिळते. त्या घरात नेहमी आनंदाचं आणि सुख समाधानाचं वातावरण असतं. घरात कधीही आर्थिक ताण तणाव जाणवत नाहीत, असे काही वास्तुदोष असतात ते जर तुमच्या घरात असतील तर त्याचा मोठा फटका हा तुम्हाला बसू शकतो, त्यामुळे असे वास्तुदोष वेळेत दूर केले पाहिजेत, हे नेमके कोणते वास्तुदोष आहेत? आणि वास्तुशास्त्र काय सांगतं? याबद्दल आज आपण माहिती जाणून घेणार आहोत.
घराचा दरवाजा – तुमच्या घराचा दरवाजा हा नेहमी पूर्व किंवा पश्चिम दिशेलाच असावा, उत्तर दिशेला असेल तरी देखील चालतं, मात्र तुमच्या घराचा मुख्य दरवाजा हा कधीही दक्षिण दिशेला असू नये, त्यामुळे अनेक प्रकारचे वास्तुदोष घरात निर्माण होतात. घरात बरकत राहत नाही, कायम आर्थिक प्रश्न निर्माण होतात, असं वास्तुशास्त्र सांगतं.
तुटलेले, गळके नळ – वास्तुशास्त्रानुसार जर तुमच्या घराच्या नळातून कायम पाणी गळत असेल तर असे नळ आजच बदला, त्यामुळे घरात वास्तुदोष निर्माण होतो. जर घरात गळके नळ असतील तर त्या घराला कधीही आर्थिक स्थैर्य लाभत नाही. पैसा पाण्यासारखा वाहत राहतो, असं वास्तुशास्त्र सांगतं.
घराची पश्चिम दिशा – वास्तुशास्त्रानुसार घराची पश्चिम दिशा ही नेहमी स्वच्छ असावी, कारण ही दिशा शनी देवांची दिशा आहे. ही दिशा जर अस्वच्छ असेल किंवा या दिशेला काही भंगार सामान किंवा टाकावू वस्तू ठेवल्या असतील तर घरात शनीदोष निर्माण होतो, तुम्हाला विविध अडचणी येऊ शकतात.
तिजोरी – तुमच्या घराची तिजोरी ही कधीच अंधाऱ्या ठिकाणी किंवा कोपऱ्यात असू नये, त्यामुळे वास्तूदोष निर्माण होतो. पैसा हातात टिकत नाही. जर तुमची तिजोरी ही उजेडात असेल आणि योग्य दिशेला असेल तर त्याचा तुम्हाला फायदा होतो.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)
