AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vastushastra : देवपूजा करताना कधीच करू नका या चुका; अन्यथा घरात भांडणाला सुरुवात झालीच म्हणून समजा

देवघर हा तुमच्या घरातील सकारात्मक ऊर्जेचा सर्वात मोठा स्त्रोत असतो. मात्र अनेकदा देवपूजा करताना शास्त्र माहीत नसल्यामुळे आपल्या हातून कळत, नकळत काही चुका होतात. ज्यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होते, ज्याचा परिणाम हा कुटुंबप्रमुखासह घरातील सदस्यांवर देखील होतो. घर अस्थिर बनतं.

Vastushastra : देवपूजा करताना कधीच करू नका या चुका; अन्यथा घरात भांडणाला सुरुवात झालीच म्हणून समजा
dev poojaImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: May 10, 2026 | 8:44 PM
Share

वास्तुशास्त्रानुसार तुमचं देवघर हा सकारात्मक ऊर्जेचा सर्वात मोठा स्त्रोत असतो. देवघरातून नेहमी सकारात्मक ऊर्जा प्रवाहीत होत असते, या ऊर्जेमुळे नकारात्मक ऊर्जेचा नाश होतो. त्याचप्रमाणे ऊर्जा संतुलन देखील साधले जाते. देवघरातून जी ऊर्जा प्रवाहीत होते, त्या ऊर्जेमुळे सर्व प्रकारच्या वाईट नजरेपासून तुमच्या घराचं संरक्षण होतं. मात्र अनेकदा आपण देवपूजा करताना काही चुका अशा करतो, ज्यामुळे या सकारात्मक ऊर्जेच्या मार्गात बाधा उत्पन्न होते. त्यामुळे आपल्याला आपलं इच्छित फळ मिळत नाही. तसेच घरात नकारात्मक ऊर्जा वाढल्यामुळे घर आर्थिक दृष्ट्या अस्थिर बनतं. एखादं मोठं आर्थिक संकट येतं. व्यवसायामध्ये तोटा होतो. अनेकदा घरात काहीही कारण नसताना पती-पत्नीमधील वाद देखील वाढतात. त्यामुळे पूजा करताना नेहमी या चुका टाळल्या पाहिजेत, असा सल्ला वास्तुशास्त्रात देण्यात आला आहे. चला तर मग जाणून घेऊयात वास्तुशास्त्रात नेमकं काय सांगण्यात आलं आहे? त्याबद्द.

गणपतीला तुळस अर्पण करू नका – देवाची पूजा करताना नेहमी एक गोष्ट लक्षात घ्यावी. हिंदू धर्मशास्त्र आणि वास्तुशास्त्रानुसार कधीही गणपतीला तुळस अर्पण करू नये. यामुळे तुम्ही केलेल्या पुजेचं अपेक्षित फळ तुम्हाला मिळत नाही. गणपतीला तुळशीऐवजी दुर्वा आणि लाल फूल अर्पण करावं. गणपती भक्तांवर प्रसन्न होतात, तसेच त्यांचा आशीर्वाद तुम्हाला मिळतो. घराला गणपतीच्या आशीर्वादने बरकत प्राप्त होते.

महादेवांना लाल फुल अर्पण करू नका – वास्तुशास्त्रानुसार महादेवांना लाल फूल कधीही अर्पण करू नये, तसेच तुळस देखील अर्पण करू नये. महादेवांना बेलाची पानं अत्यंत प्रिय असतात. त्यामुळे महादेवांना पांढर फूल आणि बेलाची पान अर्पण करावीत यामुळे महादेवांचा आशीर्वाद मिळतो आणि घरातील सर्व प्रकारचे वास्तुदोष दूर होतात. महादेवांच्या कृपेनं घरावर येणारी सर्व संकट टळतात, असं वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे.

एकादशीला तुळशीचे पान तोडू नका- अनेकांना सवय असते की सकाळी भगवान विष्णू आणि लक्ष्मी मातेला अर्पण करण्यासाठी सकाळी तुळशीचे पानं आणि मंजुळा तोडल्या जातात. मात्र या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवा कधीही एकादशीच्या दिवशी तुळशीचे पानं तोडू नका.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
मोठी बातमी! रायगडचे नवे पालकमंत्री कोण? बंद दाराआड चर्चा होताच…
मोठी बातमी! रायगडचे नवे पालकमंत्री कोण? बंद दाराआड चर्चा होताच…
राणा जगजीतसिंह पाटलांचा मैत्रीचा प्रस्ताव, ओमराजेंचं थेट विधान; म्हणाल
राणा जगजीतसिंह पाटलांचा मैत्रीचा प्रस्ताव, ओमराजेंचं थेट विधान; म्हणाले मला त्यांचे...
2029 मध्ये सर्व खासदारांना... अखेर शिंदेंची संपूर्ण मास्टर प्लॅन
DCM Eknath Shinde | 2029 मध्ये सर्व खासदारांना... अखेर शिंदेंची संपूर्ण मास्टर प्लॅन सांगितलाच
मुंबईकरांनो पुढील 24 तास महत्त्वाचे! दादरसह मुंबईच्या उपनगरीय भागात
मुंबईकरांनो पुढील 24 तास महत्त्वाचे! दादरसह मुंबईच्या उपनगरीय भागात पावसाच्या सरीवर सरी; पहा व्हिडीओ...
कल्याणमध्ये भयंकर घडलं, झाडाच्या फांदीने केला घात, पाऊस येताच...
कल्याणमध्ये भयंकर घडलं, झाडाच्या फांदीने केला घात, पाऊस येताच...
प्राजक्त तनपुरे, अरुण लखानी, अनिकेत तटकरेंसह 6 आमदारांचा शपथविधी सोहळा
प्राजक्त तनपुरे, अरुण लखानी, अनिकेत तटकरेंसह 6 आमदारांचा शपथविधी सोहळा संपन्न
मी उद्धव ठाकरेंबद्दल बोललो, बाळासाहेबांबद्दल नाही; पावसकरांचा खुलासा
Kiran Pawaskar | मी उद्धव ठाकरेंबद्दल बोललो, बाळासाहेबांबद्दल नाही; पावसकरांचा खुलासा, म्हणाले...
विधानभवनाबाबत चकित करणारी माहिती! थेट प्रसाधनगृहाबाहेर ठेवलाय शिपाई; अ
विधानभवनाबाबत चकित करणारी माहिती! थेट प्रसाधनगृहाबाहेर ठेवलाय शिपाई; अधिकाऱ्यांनाही...
अखेर मुंबईनंतर नवी मुंबईत पावसाची दमदार एंट्री!
Navi Mumbai Rain | अखेर मुंबईनंतर नवी मुंबईत पावसाची दमदार एंट्री! उकाड्याने हैराण नागरिकांना मोठा दिलासा
एसटी कर्मचाऱ्यांना मोठी भेट! महागाई भत्ता 53 टक्क्यांवरून थेट एवढ्या
Pratap Sarnaik On ST Bus | एसटी कर्मचाऱ्यांना मोठी भेट! महागाई भत्ता 53 टक्क्यांवरून थेट एवढ्या टक्क्यांनी वाढणार; पगारात होणार मोठी वाढ