Vastu Shastra: पूर्व दिशेच्या दरवाजाला लावा ही छोटीशी गोष्ट, घरात येईल पैसाच पैसा

अनेकदा घरात अस्थिरता निर्माण होते. हातात आलेला पैसा टिकत नाही, अशावेळी वास्तुशास्त्रामधील काही खास उपाय हे आपल्या उपयोगी पडू शकतात, अशाच काही सोप्या उपायांबद्दल आज आपण माहिती जाणून घेणार आहोत. ज्यामुळे तुमच्या घरातील वास्तुदोष दूर होतील.

Vastu Shastra: पूर्व दिशेच्या दरवाजाला लावा ही छोटीशी गोष्ट, घरात येईल पैसाच पैसा
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Jan 28, 2026 | 11:14 PM

अनेकदा आपल्या काही छोट्या-छोट्या चुकांमुळे घरात वास्तुदोष निर्माण होतो. आपल्या घरात वास्तुदोष निर्माण झाला आहे, याची आपल्याला कल्पना देखील नसते. मात्र जेव्हा घरात वास्तुदोष निर्माण होतो, तेव्हा आपल्याला अनेक प्रकारच्या अडचणी येण्यास सुरुवात होते. जसं की जर आपला व्यवसाय चांगला चाललेला असेल तर त्यामध्ये अचानक मोठं नुकसान होतं, नोकरीमध्ये देखील अपेक्षित यश मिळत नाही. आपल्याला दोन पैसे मिळतील या अपेक्षेने आपण प्रचंड कष्ट करतो, मात्र हातात आलेला पैसा टिकत नाही. घरात काहीही कारण नसताना भांडणं होतात, वादविवाद होतात, पती-पत्नीमध्ये पटत नाही, यामागे इतरही काही कारणं असू शकतात. मात्र त्यामागे अनेकदा वास्तुदोष देखील कारणीभूत असतो, वास्तुदोष कसा दूर करायचा? याबाबत वास्तुशास्त्रामध्ये काही सोपे उपाय सांगण्यात आले आहेत, त्याबद्दल आज आपण माहिती जाणून घेणार आहोत.

वास्तुदोष दूर करण्यासंदर्भात वास्तुशास्त्रामध्ये अनेक उपाय सांगण्यात आले आहेत. सामान्यपणे वास्तुशास्त्र हे सकारात्मक ऊर्जा आणि नकरात्मक ऊर्जा या दोन तत्वावर कार्य करते, वास्तुशास्त्रानुसार जेव्हा तुमच्या घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होते, तेव्हा तुमच्या घरात वास्तुदोष निर्माण होतात, या ऊर्जेचा फक्त तुमच्यावरच नाही तर तुमच्या कुटुंबातील इतर सदस्यांवर देखील मोठा परिणाम होतो. जेव्हा घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होते, तेव्हा हातात पैसा टिकत नाही, घरात स्थिरता राहत नाही. मात्र या उलट सकारात्मक ऊर्जेचं असतं, जेव्हा तुमच्या घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते, तेव्हा तुमच्या घराला आर्थिक स्थैर्य प्राप्त होतं, तुमच्या घरातील तिजोरी सतत धनाने भरलेली राहते, आज आपण अशाच एका सोप्या उपायाबद्दल जाणून घेणार आहेत.

वास्तुशास्त्रानुसार घराचा मुख्य दरवाजा हा पूर्व दिशेला असणं अतिशय शुभ मानलं जातं. वास्तुशास्त्रानुसार जर तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या नकारात्मक उर्जेने घरात प्रवेश करू नये, असं वाटत असेल तर त्यासाठी वास्तुशास्त्रात एक सोपा उपाय सांगण्यात आला आहे. जर तुमच्या घराचा मुख्य दरवाजा हा पूर्वेला असेल तर घराच्या दरवाजावर सूर्याचं चिन्ह असलेली प्रतिकृती लावावी, ज्यामुळे सर्व प्रकारच्या नकारात्मक ऊर्जेचा नाश होऊन, घरात सकारात्मक ऊर्जेचा प्रवेश होईल. तसेच जर समजा तुमच्या घराचा दरवाजा हा पूर्व दिशेला नसेल तर तुम्ही तुमच्या घराच्या पूर्व दिशेच्या भिंतीवर देखील सूर्याची प्रतिकृती लावू शकतात,ज्यामुळे सर्व प्रकारच्या वाईट गोष्टींपासून तुमच्या घराचं संरक्षण होईल.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)