AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vastu Shastra : घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर या 3 वस्तू असाव्यातच, तिजोरी पैशांनी भरून जाईल

वास्तुशास्त्रामध्ये घराच्या मुख्य दरवाजाला अत्यंत महत्त्व आहे, कारण या दरवाजामधूनच ऊर्जा घरात येत असते, ही ऊर्जा कोणतीही असू शकते, सकारात्मक किंवा नकारात्मक, घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होण्यासाठी वास्तुशास्त्रात काही उपाय सांगण्यात आले आहेत, त्याबद्दल आज आपण माहिती जाणून घेणार आहोत.

Vastu Shastra : घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर या 3 वस्तू असाव्यातच, तिजोरी पैशांनी भरून जाईल
vastu shastra Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Feb 25, 2026 | 8:56 PM
Share

तुमच्या घराचा मुख्य दरवाजा हा ऊर्जेचा सर्वात मोठा स्त्रोत असतो, असं वास्तुशास्त्र सागतं. वास्तुशास्त्रानुसार तुम्ही जेव्हा घराच्या बाहेर फिरण्यासाठी जातात आणि त्यानंतर जेव्हा घरी येतात, तेव्हा तुम्ही एकटेच नसतात तर तुम्ही तुमच्यासोबत एक ऊर्जा देखील घेऊ आलेले असतात. ही ऊर्जा सकारात्मक किंवा नकारात्मक अशी कोणतीही असू शकते. समजा तुम्ही एखाद्या मंदिरामध्ये देवाच्या पाया पडण्यासाठी गेलात तर तुम्ही तुमच्या सोबत घरी सकारात्मक ऊर्जा घेऊन येतात, मात्र तेच जर तुम्ही एखादं असं ठिकाणं आहे, जे नकारात्मक ऊर्जेनं भरलेलं आहे, अशा ठिकाणी गेलात तर आपोआपच तुमच्यासोबत देखील नकारात्मक ऊर्जा येते. जेव्हा घरात सकारात्मक ऊर्जा येते, तेव्हा घरात पैशांची कमी राहत नाही, घरास सुख, समृद्धी आणि शांती असते, परंतु जर घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण झाली असेल तर अशावेळी या उलट परिणाम होतात. त्यामुळे नकारात्मक ऊर्जेला घराच्या बाहेरच अटकाव करणं गरजेचं असतं. त्यासाठी वास्तुशास्त्रात काही नियम सांगण्यात आले आहेत, त्याबद्दलच आज आपण माहिती जाणून घेणार आहोत.

स्वस्तिक – वास्तुशास्त्रामध्ये स्वस्तिकच्या चिन्हाला अतिशय शुभ माण्यात आलं आहे, जेव्हा -जेव्हा आपण देवाची पूजा करतो, तेव्हा -तेव्हा तिथे स्वस्तिक हे चिन्ह काढलं जातं. वास्तुशास्त्रानुसार ज्या घरावर स्वस्तिक चिन्ह आहे. त्या घरामध्ये कधीही नकारात्मक ऊर्जा प्रवेश करत नाही, नकारात्मक ऊर्जेला घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरच नष्ट करण्याची शक्ती या चिन्हात असते, त्यामुळे घराच्या मुख्य दरवाजावर स्वस्तिक चिन्ह लावण्याचा सल्ला वास्तुशास्त्रामध्ये देण्यात आला आहे.

तोरण – हिंदू धर्मशास्त्रामध्ये विविध सण उत्सव काळात घराच्या मुख्य दरवाजाला तोरण लावण्याची प्रथा आहे. वास्तुशास्त्रानुसार हे तोरणं खूपच शुभ असतं, यामुळे कोणत्याही प्रकारची नकारात्मक ऊर्जा तुमच्या घरात प्रवेश करत नाही. तुम्ही तुमच्या घरावर फुलं किंवा अंब्याच्या पानांचं तोरण लावू शकतात. मात्र एक गोष्ट लक्षात ठेवावी, जर या तोरणामधील फूलं किंवा पानं वाळली की लगेच हे तोरण काढून नवं तोरण लावावं, तसेच घराच्या मुख्य द्वाराला कधीही कृत्रिम फुलांचं तोरण लावू नये, तोरण हे नेहमी खऱ्या फुलांपासूनच तयार करावं.

पायपुसणी – वास्तुशास्त्रानुसार घराच्या मुख्य दरवाजाजवळ नेहमी पायपुसणी ठेवावी, यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा प्रवेश करत नाही. अनेक जण आपल्या वास्तुच्या डेकोरेशननुसार विविध आकाराची पायपुसणी ठेवतात. मात्र वास्तुशास्त्रानुसार घरात नेहमी आयात आकाराचीच पायपुसणी असावी, यामुळे नकारात्मक ऊर्जा नष्ट होऊन, घरात नेहमी सकारात्मक ऊर्जा राहते.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
उदय सामंत: 'एमआयडीसीच्या समस्यांवर लक्ष, मराठी भाषेला प्राधान्य'
उदय सामंत: एमआयडीसीच्या समस्यांवर लक्ष, मराठी भाषेला प्राधान्य
मराठीची सक्ती नाही मराठीची भक्ती आहे
'मराठीची सक्ती नाही मराठीची भक्ती आहे', रिक्षाचालकांच्या मराठी सक्तीवरून शिंदेंची प्रतिक्रिया
मराठी न बोलल्यास परवाना रद्द करण्याच्या धमक्यांवरचा दुबेंचा इशारा
संजय दुबे यांचा प्रताप सरनाईक यांच्या मराठी भाषेच्या सक्तीला थेट विरोध
प्रवीण दरेकर यांचा नवनाथ वाघमारे यांच्या वक्तव्यावर हल्लाबोल
प्रवीण दरेकर यांचा नवनाथ वाघमारे यांच्या वक्तव्यावर हल्लाबोल:
शरद पवार एनडीएमध्ये जाणार नाहीत, विरोधातच राहणार
पवारांकडून एनडीएमध्ये जाण्याच्या चर्चा फेटाळल्या; पक्ष कार्यकर्त्यांना दिले स्पष्ट निर्देश
देशमुखांचं कारागृह महानिरीक्षकांना पत्र; गैरप्रकारांच्या चौकशीची मागणी
धनंजय देशमुखांचे बीड कारागृह महानिरीक्षकांना पत्र: गैरप्रकार चौकशी आणि आरोपी स्थलांतराची मागणी
भाजप-शिवसेनेतील सुप्त संघर्ष पुन्हा चव्हाट्यावर
भाजप-शिवसेनेतील सुप्त संघर्ष पुन्हा चव्हाट्यावर? ठाण्यातील कार्यक्रमात भाजप नेत्यांची अनुपस्थिती
बेस्ट कामगारांचा बेमुदत संप; प्रलंबित मागण्यांसाठी कर्मचारी आक्रमक
बेस्ट कामगारांचा मंगळवारपासून बेमुदत संप: प्रलंबित मागण्यांसाठी कर्मचारी आक्रमक
पालकमंत्री महाजनांच्याविरोधात पहिल्याच दिवशी ठाकरे गटाचे आंदोलन
नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्याविरोधात पहिल्याच दिवशी ठाकरे गटाचे आंदोलन
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून गरजू रुग्णांना मदत
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून गरजू रुग्णांना अवयव प्रत्यारोपणासाठी मदत