
वास्तुशास्त्रामध्ये काही प्राणी पक्षी हे खूप शुभ माण्यात आले आहेत, जर हे प्राणी किंवा पक्षी तुमच्या घरात असतील किंवा जर तुम्हाला दिसले तर त्यामुळे तुम्हाला काही तरी आनंदाची बातमी मिळणार आहे, किंवा तुमचा काही तरी फायदा होणार आहे, तुम्हाला यश प्राप्त होणार आहे, असं मानलं जातं. मात्र काही प्राणी आणि पक्षी हे अशुभ मानण्यात आले आहेत, हे प्राणी किंवा पक्षी जर तुम्हाला दिसले तर त्यामुळे तुम्हाला अपयश प्राप्त होणार आहे, असं मानलं जातं. पूर्वेचे लोक जर कुठेही गावाला किंवा महत्त्वाच्या कामाला जायचं असेल आणि असा प्राणी किंवा पक्षी दिसला तरी सुद्धा आपला त्या दिवशीचा दौरा रद्द करत होते. मात्र मांजर हा एकमेव असा प्राणी आहे, ज्याला काही लोक हे शुभ मानतात, तर काही लोक मात्र अशुभ मानतात, आज आपण मांजरीबद्दल कोणत्या गोष्टी या शुभ आहेत आणि कोणत्या अशुभ आहेत? याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत.
मांजर पाळणं शुभ की अशुभ?
काही लोकांच्या मते घरात मांजर पाळणं हे शुभ आहे, घरात मांजर असेल तर वाईट शक्तींपासून घराचं संरक्षण होतं, मात्र काही लोकांच्या मते, घरात मांजर पाळल्यास घरात राहू योग तयार होतो, ज्यामुळे तुम्हाला विविध प्रकारच्या अडचणी निर्माण होतात, धन हाणी होते, घरात आर्थिक समस्या निर्माण होतात.
घरात मांजरीने पिल्ल देणं शुभ की अशुभ?
घरात मांजरीने पिल्ल देणं हे शुभ मानलं जातं, ज्या घरात मांजर पिल्ल देते त्या घराचा लवकरच कायपालट होतो, असं मानलं जातं, त्या घरात सुख शांती नांदते, घरात समृद्धी येते असं वास्तुशास्त्रात सांगण्यात आलं आहे.
मांजर आडवं जाणं
जर तुम्ही महत्त्वाच्या कामाला जात असाल आणि तुम्हाला मांजर आडवं गेलं तर ते मात्र अशुभ मानलं जातं, पूर्वीचे लोक मांजर आडवं गेल्यास त्याला अशुभ मानत होते.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)