Vastu Shastra : देवघरात ही मूर्ती कधीच नसावी, …तर घरावर येतील संकटच संकटं

आपल्या देवघरात अनेक प्रकारच्या देवी, देवतांच्या मूर्ती असतात. मात्र देवघरात किती मूर्ती असाव्यात? कोणत्या मूर्ती असाव्यात? आणि कोणत्या मूर्ती असू नयेत? याचे देखील काही नियम वास्तूशास्त्रामध्ये सांगण्यात आले आहेत. त्याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.

Vastu Shastra : देवघरात ही मूर्ती कधीच नसावी, ...तर घरावर येतील संकटच संकटं
वास्तुशास्त्र
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Dec 08, 2025 | 8:03 PM

वास्तुशास्त्रानुसार देवघर हे तुमच्या घरातील सर्वात महत्त्वाची जागा असते, कारण देवघरातून सतत सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह घरात वाहत असतो. त्यामुळे घरातील सर्व प्रकारची नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. वास्तुदोष दूर होतात. घरात सतत आनंदी आणि शांत वातावरण राहातं. आपल्यावर येणारी सर्व प्रकारची संकट दूर होतात, घरात सुख समृद्धी येते. परंतु आपल्या काही छोट्या चुकांमुळे याच्या उलट देखील परिणाम होऊ शकतात, असं वास्तुशास्त्रात म्हटलं आहे. वास्तुशास्त्रानुसार देवघराचे देखील काही विशिष्ट नियम असतात, जसं की देवघर कोणत्या दिशेला असावं? देवघरात किती देव असावेत? कोणत्या देवाच्या मूर्ती किंवा प्रतिमा असू नयेत? एकाच देवाच्या दोन मूर्ती असाव्यात का? असे अनेक नियम आहेत. जेव्हा आपण या सर्व नियमांचं पालन करतो, तेव्हा त्याचा आपल्या आयुष्यावर सकारात्मक परिणाम झाल्याचं पहायला मिळतं, मात्र आपल्या हातून नकळत अशा काही चुका देखील होतात ज्यामुळे घरात वास्तूदोष निर्माण होतो.

वास्तुशास्त्रानुसार अशा काही मूर्ती असतात ज्या देवघरात किंवा घरात असू नये, त्यातीलच एक मूर्ती म्हणजे उजव्या सोंडेचा गणपती, गणपती ही बुद्धीची देवता आहे. प्रत्येक घरामध्ये गणपतीची मूर्ती किंवा फोटो असावाच कारण कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात ही गणपती पूजनानेच होते. गणपतीला विघ्नहर्ता म्हटलं गेले आहे, म्हणजे ज्या घरात गणपतीची मूर्ती किंवा प्रतिमा आहे, त्या घरावर कधीही कोणतंही संकट येत नाही. मात्र घरात नेहमी डाव्या सोंडेच्या गणपतीचीच मूर्ती असावी. त्यामागील शास्त्र असं आहे की, उजव्या सोंडेच्या गणपतीचे नियम हे अत्यंत कडक असतात, या मूर्तीची दररोज पूजा केली गेलीच पाहिजे, उजव्या सोंडेच्या गणपतीला दररोज नैवेद्य दाखवला गेलाच पाहिजे, आणि ते देखील कडक सोवळ्यामध्ये जर या नियमांचं पालन नाही झालं तर मात्र घरात वास्तुदोष निर्माण होतो. घरात उजव्या सोंडेचा गणपती असणं हे शुभ मानलं गेलं आहे. मात्र या गणपतीच्या पूजा विधीचे नियम हे अत्यंत कडक असल्यामुळे ही मूर्ती घरात ठेवू नये असा सल्ला वास्तुशास्त्रात देण्यात आला आहे.

देवघराची दिशा – वास्तुशास्त्रात देवघराच्या दिशेला देखील महत्त्व आहे, वास्तुशास्त्रानुसार ईशान्य ही देवाची दिशा असते. त्यामुळे तुमचं देवघर हे नेहमी ईशान्य दिशेलाच असावे, आणि देवांचं तोडं हे पूर्व किंवा पश्चिम दिशेला असावं.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)