AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vastu Shastra : घरात कोणत्या रंगाचे शिवलिंग ठेवणं शुभ, पहा वास्तुशास्त्र काय सांगतं?

घरात कोणत्या देवाच्या मूर्ती असाव्यात आणि कोणत्या देवाच्या मूर्ती असू नयेत, घरात कोणत्या रंगाचे शिवलिंग ठेवावं? याचे नियम देखील वास्तुशास्त्रात सांगण्यात आले आहेत. वास्तुशास्त्रानुसार तुमचं देवघर हे तुमच्या घरातील सकारात्मक ऊर्जेचा सर्वात मोठा स्त्रोत असतो. परंतु अशाही काही गोष्टी असतात त्यांची विशेष काळजी घेणं गरजेचं असतं, अन्यथा सकारात्मक ऊर्जेमध्ये बाधा निर्माण होते.

Vastu Shastra : घरात कोणत्या रंगाचे शिवलिंग ठेवणं शुभ, पहा वास्तुशास्त्र काय सांगतं?
वास्तुशास्त्र Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Jun 27, 2026 | 9:51 PM
Share

वास्तुशास्त्रानुसार तुमचं देवघर हे तुमच्या घरातील सकारात्मक ऊर्जेचा सर्वात मोठा स्त्रोत आहे. मात्र आपण अशा काही चुका करतो, ज्यामुळे देवघरातून निघणाऱ्या सकारात्मक ऊर्जेत देखील बाधा निर्माण होऊ शकते, या चुका टाळल्या गेल्या पाहिजेत तरच आपल्याला त्या सकारात्मक ऊर्जेचा लाभ मिळून घरातील सर्व प्रकारचे वास्तुदोष दूर होतील. वास्तुशास्त्रानुसार कुठल्याही देवघरात एकाच देवाच्या दोन मूर्ती असू नयेत, जसं की दोन गणपती, दोन शिवलिंग किंवा दोन एकाच देवी देवतांचे फोटो. यामुळे घरात वास्तुदोष निर्माण होतो. तुमच्या देवघरात नेहमी एका देवतेचा एकच फोटो असावा. तसेच घरात कधीही शनि महाराज किंवा नटराज यांची मूर्ती देखील असू नये, असं वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे. तुमच्या देवघराचं तोंड हे नेहमी ईशान्य दिशेला असावं कारण ही दिशा देवतांची दिशा असते, असे अनेक देवघरासंबंधीचे नियम वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आले आहेत. आज आपण देवघरात कोणत्या रंगाचे शिवलिंग ठेवावं आणि त्याच्या पूजेचे नियम काय आहेत? याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत.

घरात शिवलिंग ठेवण्याचे नियम – वास्तुशास्त्रानुसार घरात नेहमी एकच शिवलिंग ठेवावं, एका पेक्षा अधिक शिवलिंग घरात असू नये. त्याचप्रमाणे तुम्ही जर घरात शिवलिंग ठेवणार असाल तर त्याची दररोज नित्यनियमाने पूजा झालीच पाहिजे. घरात शिवलिंग ठेवताना ते अंगठ्याच्या आकारापेक्षा जास्त मोठं असू नये, याची काळजी घ्यावी, घरातमध्ये शिवलिंग ठेवताना ते छोटं असावं, तर मंदिरामध्ये शिवलिंगाची स्थापना करताना ते मोठं असावं असं वास्तुशास्त्रात सांगण्यात आलं आहे. ज्या घरात दररोज शिवलिंगाची पूजा होते, अशा घरावर सदैव भगवान महादेव यांचा आशीर्वाद असतो.

घरात कोणत्या रंगाचे शिवलिंग ठेवावं? तुम्ही घरात पांढऱ्या किंवा काळ्या रंगाचे शिवलिंग ठेवू शकता. पांढऱ्या रंगामध्ये स्फटिकापासून बनवलेलं शिवलिंग किंवा चांदीपासून बनवलेलं शिवलिंग घरात ठेवणं हे शुभ मानलं जातो. ज्या घरात शिवलिंग आहे, त्या घरातील सर्व प्रकारचे वास्तुदोष दूर होतात. अशा घरावर कधीही चुकूनही संकट येत नाही, असं वास्तुशास्त्रात सांगण्यात आलं आहे.

ही काळजी घ्यावी – शिवलिंगाची नियमित पूजा करावी, तसेच कधीही शिवलिंगाला लाल फूल अर्पण करू नये, शिवलिंगाला नेहमी बेलपत्र किंवा पांढरं फूल अर्पण करावं. तसेच शिवलिंगाला जल अर्पण केल्यानंतर गंध लावून नैवेद्य अर्पण करावा, त्यानंतर शिवलिंगावर पांढर फूल किंवा बेल पत्र अर्पण करावं असं वास्तुशास्त्रता सांगण्यात आलं आहे. यामुळे घरावर सदैव महादेवांची कृपा राहते.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
75 कोटींच्या सोन्याची तस्करी उघड; DRI ची मोठी कारवाई, 11 जण अटकेत
75 कोटींच्या सोन्याची तस्करी उघड; DRI ची मोठी कारवाई, 11 जण अटकेत
इंद्रावती नदीने धोक्याची पातळी ओलांडली; छत्तीसगडमध्ये महापुराचा कहर
इंद्रावती नदीने धोक्याची पातळी ओलांडली; छत्तीसगडमध्ये महापुराचा कहर
मराठा आंदोलनातून धक्कादायक दावा; ललित तारख यांचा जरांगेंवर गंभीर...
मराठा आंदोलनातून धक्कादायक दावा; ललित तारख यांचा जरांगेंवर गंभीर आरोप
जनतेची माफी मागा; एकनाथ शिंदेंचा राहुल गांधी आणि इंडिया आघाडीवर...
जनतेची माफी मागा; एकनाथ शिंदेंचा राहुल गांधी आणि इंडिया आघाडीवर हल्लाबोल
लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; प्रसंगावधानामुळे जीव वाचला
Kalyan : लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता धाव घेतली, प्रसंगावधानामुळे जीव वाचला
मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
SIR : महाराष्ट्रासाठी मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ, निवडणूक आयोगाचं महत्त्वाचं स्पष्टीकरण ऐकाच...
ह्यांना परवानगीचा मिजास...; बापटांचा विसर्जन मिरवणुकीवर घणाघात
Vidyanand Bapat : ह्यांना परवानगीचा मिजास...त्यामुळे अशा खुळचट...; बापटांचा विसर्जन मिरवणुकांच्या परवानगीवरच घणाघात
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक
Election Commission : मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक, काय महत्वाचे निर्णय घेतले?
दुष्काळ जाहीर केलाय पण...चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
Maharashtra Draught : सरकारने दुष्काळ जाहीर केलाय पण... शेतकऱ्यांच्या चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
Pune Ganesh Visarjan : पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल