Vastu Shastra : घरातील आर्थिक अडचणी संपता संपत नाहीयेत? मग पावसाच्या पाण्याचे करा हे सोपे उपाय
आपण खूप कष्ट करतो परंतु अनेकदा असं होतं की आपल्या हातात आलेला पैसा टिकत नाही. कायम आर्थिक अडचणी जाणवतात, त्यावर वास्तुशास्त्रामध्ये काही सोपे उपाय सांगण्यात आले आहेत, त्याबद्दल आज आपण माहिती जाणून घेणार आहोत.

आपली आर्थिक परिस्थिती चांगली असावी, हातामध्ये पैसा असावा, आपल्यावर कोणत्याही प्रकारचं कर्ज नसावं. घरात बरकत असावी, तिजोरी नेहमी धनाने भरलेली राहावी आणि आपल्याला कोणत्याही प्रकारच्या आर्थिक अडचणी येऊ नये, अशी प्रत्येकाची इच्छा असते, परंतु अनेकदा आपण खूप कष्ट करून देखील आपल्याला म्हणावं तेवढं यश मिळत नाही. आपण पैसे कमावण्यासाठी प्रचंड कष्ट करतो. परंतु हातात पैसा टिकत नाही, अशा परिस्थितीमध्ये वास्तुशास्त्रात काही सोपे उपाय सांगण्यात आले आहेत. तुम्ही जर हे उपाय केले तर तुमच्या आर्थिक अडचणी दूर होण्यास मदत होते असं वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे. घरात जेव्हा वास्तुदोष निर्माण होतो, तेव्हा त्याचा नकारात्मक परिणाम हा आपल्यासह आपल्या कुटुंबावर होत असतो. घरात काहीही कारण नसताना अचानक गृहकलह वाढणं, अचानक एखादं मोठं आर्थिक संकट ओढावणं, विविध आरोग्याच्या समस्या ही वास्तुदोषाची सामान्य लक्षणं आहेत. आज आपण पावसाच्या पाण्याशी संबंधित काही सोपे उपाय जाणून घेणार आहोत, ज्यामुळे तुमच्या घराला स्थिरता येईल, आणि सर्व प्रकारच्या कर्जातून तुमची मुक्ती होईल.
भगवान विष्णू आणि लक्ष्मी मातेला अभिषेक – ढगातून पडणार पावसाचं पाणी एका भांड्यामध्ये जमा करून ठेवा, आणि एकादशीच्या दिवशी भगवान विष्णू आणि लक्ष्मी मातेला त्या पावसाच्या पाण्यानं अभिषेक करा. यामुळे तुमच्यावर सदैव भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांचा आशीर्वाद राहील तुमच्या पाठीमागे असलेल्या सर्व आर्थिक अडचणी दूर होतील, एवढंच नाही तर कर्जातून देखील तुमची मुक्ती होईल.
जर तुमच्या घरात वास्तुदोष निर्माण झाला असेल, नकारात्मक ऊर्जेमुळे तुम्ही कर्जबाजारी झाला असाल तर काळजी करू नका, एक सोपा उपाय आहे, संपूर्ण श्रावण महिन्यात पावसाचं पाणी एका भांड्यामध्ये गोळा करा, ते पाणी भगवान हनुमानापुढे ठेवा आणि 51 वेळा हनुमान चालीसाचा पाठ करा, त्यानंतर हे पाणी तुमच्या संपूर्ण घरात शिंपडला, सर्व प्रकारची नकारात्मक ऊर्जा नष्ट होऊन तुमची कर्जातून मुक्ती होईल.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)
