Vastu Tips : ही 5 लक्षणं दिसल्यास सावधान, तुमच्याही घरात असू शकतो वास्तुदोष
जर तुमच्या घरात वास्तुदोष असेल तर त्याची काही लक्षण देखील दिसतात, याच लक्षणांबाबत आज आपण माहिती घेणार आहोत. ही लक्षण लक्षात आल्यास वास्तुदोष दूर करण्यास मदत होऊ शकते.

हिंदू धर्मात वास्तुशास्त्राला खूप महत्त्व आहे, जर तुमचं घर हे वास्तुशास्त्राप्रमाणे नसेल तर घरात अनेक अडी अडचणी निर्माण होतात, प्रचंड प्रमाणात धन हानी होते, कामात अडथळे निर्माण होतात अशा अनेक गोष्टी आपल्यासोबत घडू शकतात असं मानलं जातं. वास्तुशास्त्र हे केवळ तुमचं घर कसं असावं घराची रचना कशी असवी याबाबतच मार्गदर्शन करत नाही, तर तुमच्या घरात असलेल्या वस्तुंची दिशा कोणती असावी? घरातील तिजोरी कोणत्या दिशेला असावी? किचन कोणत्या दिशेला असावं? याबाबत देखील मार्गदर्शन करते.
दरम्यान जर चुकीच्या वास्तुरचनेमुळे तुमच्या घरात वास्तुदोष निर्माण झाला असेल तर तो कसा ओळखायचा, त्याची काही लक्षण दिसतात का? याबाबत आज आपण माहिती घेणार आहोत. घरात वास्तुदोष निर्माण झाल्यास त्याची काही लक्षण नक्कीच दिसतात, तसे आपल्याला संकेत मिळतात असं मानलं जातं, चला तर मग जाणून घेऊयात काय आहेत ते संकेत?
घरात नेहमी भांडण होतं – वास्तुदोषाचं हे एक मोठं लक्षण आहे, जर तुमच्या घरात वास्तुदोष असेल तर घरात नेमही छोट्या-छोट्या कारणांवरून देखील मोठी भांडणं होतात. घरात शांतता राहात नाही.
आर्थिक अडचणी – जर तुमच्या घरात वास्तुदोष असेल तर तुम्हाला नेहमी आर्थिक अडचणी येणारच, कोणत्यानं कोणत्या कारणामुळे हातातील पैसे खर्च होणार, पैसा कितीही आला तरी तो हातात टिकणार नाही.
आजरपण – जर तुमच्या घरात वास्तुदोष असेल तर घरातील एखादी व्यक्ती किंवा संपूर्ण कुटुंबच नेहमी आजारी राहाते, त्यामुळे प्रचंड प्रमाणात पैसा खर्च होतो.
दुर्घटना – जर तुमच्याही घरात वारंवार काही दुर्घटना घडत असतील, घरातील एखाद्या व्यक्तीसोबत काही अपघात वगैरे घडत असतील तर त्याचा अर्थ तुमच्या घरात वास्तुदोष असू शकतो.
मानसिक तणाव – जर तुम्ही सारखं तणावाखाली राहात असाल तर तुमच्या घरात वास्तूदोष असल्याची शक्यता असते.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)
