Vastu Tips : ‘ही’ पाच झाडं घरात लावा, कधीच भासणार नाही पैशांची कमी
अशी काही झाडं असतात ज्यांना वास्तुशास्त्रामध्ये शुभ मानलं गेलं आहे, ही झाडं घरामध्ये लावल्यास घराची भरभराट होते, सर्व प्रकारच्या आर्थिक अडचणी दूर होतात, असं वास्तुशास्त्रामध्ये म्हटलं आहे.

हिंदू धर्मशास्त्रामध्ये वास्तुशास्त्राला अनन्यसाधारण महत्त्व आहे, तुम्ही जेव्हा तुमचं घर बांधता किंवा एखादं घर विकत घेता तेव्हा त्या घराला सर्व बाजुंनी वास्तुशास्त्राच्या कसोटीवर तपासून पाहिलं जातं, म्हणजे त्या घराच्या मुख्य दरवाजाचं तोडं कोणत्या दिशेला आहे? स्वयंपाक घर कोणत्या दिशेला आहे? बेडरूम कोणत्या दिशेला आहे, या सारख्या अनेक गोष्टी लक्षात घेतल्या जातात. घर घेतानाच नाही तर घरात तुम्ही ज्या वस्तू ठेवता, त्या वस्तुंची दिशा कोणती असावी याचं मार्गदर्शन देखील वास्तुशास्त्र आपल्याला करतं, जर तुमच्या घरात असलेली एखादी वस्तु तुम्ही चुकीच्या दिशेला ठेवलेली असेल तर ती तुमच्या प्रगतीमध्ये अडथळा ठरू शकते असं वास्तुशास्त्र सांगतं.
दरम्यान वास्तुशास्त्रामध्ये असे काही झाडं सांगण्यात आले आहेत, ते तुमच्या घरामध्ये असणं शुभ मानलं गेलं आहे, ही झाडं जर तुमच्या घरात असतील तर त्या घरावर नेहमी देवी लक्ष्मी मातेची कृपा राहाते, त्या घरात कधीही पैशांची कमी नसते, तसेच घरात कधीही भांडणं, वादविवाद होत नाहीत, असं वास्तुशास्त्रामध्ये म्हटलं आहे. चल तर जाणून घेऊयात अशाच काही झाडांबाबत
तुळस – तुळशीला हिंदू धर्मामध्ये अत्यंत पवित्र मानलं गेलं आहे, ज्या घरात तुळस असेल त्या घरावर सदैव देवी लक्ष्मीची कृपा राहाते, पैशांची कधीही कमी भासत नाही, तसेच घरात सदैव सकारात्मक ऊर्जा राहाते.
मनी प्लांट – मनी प्लांटच रोप घरात असणं खूप शुभ मानलं जातं, मनी प्लांटचा संबंध हा पैशांशी जोडला जातो. ज्या घरामध्ये मनी प्लांट आहे, अशा घरात आर्थिक अडचण येत नाही, असं वास्तुशास्त्र सांगतं.
बांबू प्लांट – बांबू प्लांटला देखील शुभ मानलं गेलं आहे, बांबू प्लांट हे वाढीचं प्रतिक आहे, तुमच्या घरात जर बांबू प्लांट असेल तर तुमच्या प्रगतीमधील अडथळे दूर होतात असं मानलं जातं.
शमिचं झाडं – शमि या वृक्षाला देखील हिंदू धर्मात खूप महत्त्व आहे, या वृक्षाला पवित्र मानलं गेलं आहे. हे झाडं घराच्या परिसरात असणं शुभ मानलं जातं.
केळीचं झाडं – केळीच्या वृक्षाला हिंदू धर्मामध्ये पवित्र मानलं गेलं आहे, विविध धार्मिक कार्यक्रमामध्ये केळीचा आणि त्याच्या पानाचा उपयोग होतो. हे केळीचं झाड घराच्या परिसरात असणं शुभ मानलं गेलं आहे.
( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)
