Vastu Tips : या 3 वनस्पती आहेत खूपच लकी, घराकडे चुंबकाप्रमाणे पैसा आकर्षित होतो, वास्तुशास्त्र काय सांगतं?
वास्तुशास्त्रामध्ये अशा वनस्पतींचा देखील उल्लेख करण्यात आला आहे, ज्या वनस्पती तुमच्या घरामध्ये असणं शुभ मानलं गेलं आहे. वास्तुशास्त्रानुसार अशा वनस्पती या सौभाग्य आणि धन व संपत्तीच्या प्रतिक आहेत.

वास्तुशास्त्र हे एक असं शास्त्र आहे, ज्यामध्ये तुमचं घर कसं असावं? त्याची रचना कशी असावी? इथपासून ते घरात ठेवण्यात येणाऱ्या वस्तुंची योग्य जागा कोणती? कोणती वस्तु कोणत्या दिशेला ठेवावी? इथपर्यंत मार्गदर्शन करण्यात आलं आहे. हिंदू धर्मशास्त्रामध्ये वास्तुशास्त्राला अत्यंत महत्त्व आहे. जर तुमच्या घराची रचना ही वास्तुशास्त्राप्रमाणे असेल तर तुमची प्रगती होते, करिअर आणि नोकरीमध्ये वेगवेगळ्या संधी निर्माण होतात, घरात पैशांची कमतरता राहात नाही, घरात समृद्धी येते, वादविवाद होत नाहीत असं मानलं जातं.
सोबतच वास्तुशास्त्रामध्ये अशा वनस्पतींचा देखील उल्लेख करण्यात आला आहे, ज्या वनस्पती तुमच्या घरामध्ये असणं शुभ मानलं गेलं आहे. वास्तुशास्त्रानुसार अशा वनस्पती या सौभाग्य आणि धन व संपत्तीच्या प्रतिक आहेत. वास्तुशास्त्रानुसार जर तुम्ही या वनस्पती तुमच्या घरामध्ये लावल्या तर तुमचं भाग्य नेहमी तुमची साथ देत, घरातील सर्व प्रकारची नकारात्मक शक्ती नष्ट होते, तिची जागा सकारात्मक शक्ती घेते, एवढंच नाही तर तुम्हाला तुमच्या आयुष्यात कधीच पैशांची कमतरता भासत नाही, पैसा चुंबकासारखा तुमच्याकडे आकर्षित होतो, जाणून घेऊयात नेमक्या कोणत्या आहेत त्या वनस्पती आणि वास्तुशास्त्र काय सांगतं? त्याबद्दल.
तुळस – हिंदू धर्मामध्ये तुळशीला अत्यंत पवित्र मानलं गेलं आहे. प्रत्येक हिंदू कुटुंबाच्या घरामध्ये तुम्हाला तुळस पाहायला मिळते. असं म्हणतात की ज्या घरात तुळस असते त्या घरावर सदैव माता लक्ष्मीचा आशीर्वाद असतो. तसेच तुळशीचे अनेक औषधी गुणधर्म देखील आहेत. ज्या घरात तुळस असते त्या घरातील वातावरण नेहमी सकारात्मक राहातं.
मनी प्लांट – मनी प्लांटला वास्तुशास्त्रामध्ये अत्यंत शुभ मानलं गेलं आहे. मनी प्लांट पैसे, धन संपत्तीला आकर्षित करतो, अशी मान्यता आहे. त्यामुळे वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये मनी प्लांट असणं शुभ मानलं जातं.
लकी बांबू – लकी बांबूला देखील वास्तुशास्त्रामध्ये शुभ मानलं गेलं आहे, लकी बांबूमुळे घरातील नकारात्माक ऊर्जा नष्ट होते आणि घरात सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते. ज्या घरात लकी बांबू आहे, त्या घरात पैशांची कधीही कमी राहात नाही, असं मानलं जातं.
( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)