Vastu Tips | तुमच्या या सवयी ठरु शकतात वास्तुदोषाचे कारण, आर्थिक समस्याही उद्भवू शकते

वास्तुशास्त्राबद्दल बहुतेक लोकांना माहिती नसते. कदाचित तुमचा विश्वास बसणार नाही की घराच्या सुईपासून भिंतीवरील पेंटिंगपर्यंत सर्वांमध्ये वास्तुशास्त्र आहे. वास्तुशास्त्राचे व्यक्तीच्या जीवनात सकारात्मक आणि नकारात्मक दोन्ही परिणाम होतात.

Vastu Tips | तुमच्या या सवयी ठरु शकतात वास्तुदोषाचे कारण, आर्थिक समस्याही उद्भवू शकते
Vastu dosh

मुंबई : वास्तुशास्त्राबद्दल बहुतेक लोकांना माहिती नसते. कदाचित तुमचा विश्वास बसणार नाही की घराच्या सुईपासून भिंतीवरील पेंटिंगपर्यंत सर्वांमध्ये वास्तुशास्त्र आहे. वास्तुशास्त्राचे व्यक्तीच्या जीवनात सकारात्मक आणि नकारात्मक दोन्ही परिणाम होतात.

आपण आपल्या दैनंदिन जीवनात अशा अनेक लहान-मोठ्या चुका करतो, ज्यामुळे वास्तु दोष निर्माण होतो. वास्तु दोषांमुळे यश, आनंद आणि समृद्धीच्या मार्गात अडथळा येऊ शकतो. तुमच्या कोणत्या सवयीमुळे वास्तु दोष निर्माण होतात हे जाणून घ्या –

🔶 अनेकांना अंथरुणावर खाण्याची सवय असते. वास्तुशास्त्रात ही सवय चुकीची मानली जाते. असे मानले जाते की अशा व्यक्तीच्या घरात समृद्धी राहत नाही. अंथरुणावर खाण्याच्या सवयीमुळे, त्यांच्या यशाच्या मार्गात अडथळे येतात. हे लोक लवकर कर्जात बुडतात आणि व्यक्ती अस्वस्थ राहते.

🔷 वास्तुशास्त्रानुसार रात्री स्वयंपाकघरात खरकटी भांडी ठेवणे योग्य नाही. असे मानले जाते की खरकटी भांडी ठेवल्याने आर्थिक समस्या येतात. म्हणूनच रात्री भांडी स्वच्छ केल्यानंतरच झोपावे. असे केल्याने नकारात्मकता दूर होते. त्याचबरोबर तुमच्या समस्याही कमी होऊ लागतात.

🔶 याशिवाय, रात्री बाथरुमच्या बादलीत पाणी ठेवल्याने नकारात्मकता दूर होते. असे मानले जाते की बाथरुमच्या बादलीत पाणी ठेवल्याने आर्थिक समस्याही दूर होतात. यासह, देवी लक्ष्मीच्या कृपेचा वर्षाव होतो.

🔷 बरेच लोक घरातील कचरा फेकतात किंवा बाहेर डस्टबिन ठेवतात. वास्तुशास्त्रानुसार असे केल्याने शेजारी तुमचे शत्रू बनतात.

🔶 वास्तुशास्त्रानुसार, कोणत्याही व्यक्तीने संध्याकाळच्या वेळी दान करु नये. याशिवाय दूध, दही आणि मीठ मागू नये. असे केल्याने तुमची आर्थिक स्थिती बिघडू शकते.

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

संबंधित बातम्या :

Vastu rules for home temple : घरात देवघर बनवताना हे वास्तू नियम नेहमी लक्षात ठेवा

Study Room Vastu : आपल्या मुलांचे अभ्यासात मन लागत नसेल तर त्वरीत करा हे उपाय

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI