
वास्तुशास्त्र हे असं शास्त्र आहे, ज्यामध्ये तुमच्या आयुष्यात ज्या काही समस्या आहेत, त्या प्रत्येक समस्येवर काही न काही तरी उपाय सांगितलेले आहेत. हे सर्व उपाय तुमचं घर आणि घरातील निगडीत वस्तुंवर आधारीत आहेत. म्हणजे जर तुम्हाला काही आर्थिक, आरोग्य किंवा इतर समस्या येत असतील तर त्यासाठी तुमच्या घराची वास्तु रचना किंवा घरात असलेली एखादी वस्तू देखील जबबदार असू शकते असं वास्तुशास्त्र सांगतं.
थोडक्यात वास्तुशास्त्रामध्ये तुमचं घर कसं असावं? घराच्या मुख्य दरवाजापासून ते घराच्या बेडरूमपर्यंतची योग्य दिशा सांगण्यात आली आहे. तसेच अशा काही वस्तू असतात, ज्या घरात ठेवल्यामुळे एक प्रकारची नकारात्मक ऊर्जा तुमच्या घरामध्ये प्रवेश करते, तिचा प्रचंड त्रास तुम्हाला सहन करावा लागतो, घरात काहीही कारण नसताना वादावादी, भांडणं होतं. आरोग्याच्या समस्या, अचानक एखादी मोठी आर्थिक समस्या ही सर्व वास्तुदोषाची लक्षणं आहेत, वास्तुदोष कसा दूर करावा? हे वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे.
दरम्यान वास्तुशास्त्रामध्ये तुमच्या घरात पैसा टिकून राहण्यासाठी काय करावे? कोणत्या उपाय योजना कराव्यात? ज्यामुळे तुम्हाला आर्थिक समस्या येणार नाही, हे देखील सांगितलं आहे. अशा तीन वस्तू आहेत, ज्यामुळे तुमच्या घरावर लक्ष्मी मातेचा आशीर्वाद राहाते, आयुष्यात तुम्हाला कधीच पैशांची कमी भासत नहाी, त्या गोष्टींबद्दल आज आपण माहिती घेणार आहेत.
नारळ – नारळाला हिंदू धर्मशास्त्रामध्ये अत्यंत शुभ मानलं जातं. कोणत्याही शुभ कामाची सुरुवात ही नारळ फोडूनच होते. नारळामध्ये सकारात्मक ऊर्जा ओढून घेण्याची ताकद आहे. त्यामुळे घरात एक नारळ ठेवावंच असं वास्तुशास्त्र सांगतं. नारळामुळे लक्ष्मी मातेचा आशीर्वाद सदैव तुमच्यावर राहातो.
शंख – शंखाला देखील वास्तुशास्त्रात अत्यंत महत्त्व आहे. झोपेतून उठल्यानंतर पहिल्यांदा जर तुम्ही शंखाचा आवाज ऐकला तर थे खूपच शुभ मानलं जातं. शंख घरात असल्यामुळे आर्थिक अडचणी येत नाहीत.
घराच्या मुख्य दरवाजावर गणपतीची मूर्ती – हिंदू धर्मामध्ये कोणत्याही शुभ कामाची सुरुवात करायची असेल तर ती गणपती पुजनाने करतात. ज्या घरात गणपतीची मूर्ती किंवा प्रतिमा आहे, त्या घरावर कधीच कोणतं संकट येत नाही.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)