AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vastu Tips : बेडखाली या वस्तू नकोच..कमी होऊ शकते घरातली सुख शांती; काय सांगतं वास्तूशास्त्र ?

वास्तूशास्त्रात घरातील प्रत्येक दिशेचं आणि जागेचं खास महत्व सांगण्यात आलं आहे. बेडखाली काही वस्तू ठेवल्याने नकारात्मकता वाढू शकते आणि घरातील शांत वातावरणावर परिणाम होऊ शकतो, असं वास्तूशास्त्रात सांगण्यात आलं आहे.

Vastu Tips : बेडखाली या वस्तू नकोच..कमी होऊ शकते घरातली सुख शांती; काय सांगतं वास्तूशास्त्र ?
Avoid keeping these things under Bed
| Updated on: Sep 07, 2026 | 9:05 PM
Share

Vastu Tips For Home : घरात जर जागा कमी असेल तर बरेच लोक कपाटाच्या वर किंवा बेडच्या खाली रिकाम्या असलेल्या जागेचा स्टोरेज म्हणून वापर करतात. तिथे कपडे, चपला, जुन्या गोष्टींपासून बरंच सामान ठेवलं जातं. मात्र, वास्तूशास्त्रात बेडच्या खाली असलेल्या जागेबद्दल काही काळजी घेण्यास सांगण्यात आलं आहे. असं मानलं जातं की बेडच्या खाली सामान ठेवल्यामुळे घरातला वातावरण प्रभावित होऊ शकतं. विशेषत: बराच काळ न वापरलेल्या गोष्टी या बेडखाली ठेवू नयेत, असं सांगण्यात येतं. त्या वस्तू कोणत्या ते जाणून घेऊया.

जुनं, भंगार सामान

वास्तूशास्त्रानुसार, बेडच्या खाली बराच काळ जुनं, तुटलेलं , भंगाप सामान ठेवू नये. अशा गोष्टी घराक जमा करून ठेवल्याने नकारात्मक उर्जा वाढू शकते. त्यामुळे जे सामान काही उपयोगाचं नसेल ते लगेच हटवलेलं चांगलं मानलं जातं.

चपला-बूट बेडखाली ठेवू नये

जागा वाचवण्यासाठी अनेक घरांमध्ये चप्पल-बूट बेडखाली ठेवले जातात. वास्तुशास्त्राच्या मान्यतेनुसार असं करणं योग्य मानलं जात नाही. झोपण्याच्या जागेखाली चप्पल-बूट ठेवल्याने खोलीतील सकारात्मक वातावरणावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे त्यासाठी स्वतंत्र जागा निश्चित करणं हेच योग्य मानलं जातं.

लोखंडी सामान ठेवू नका

बेडखाली जड किंवा लोखंडी अथवा धातूचं सामान ठेवू नये, असंही वास्तूशास्त्रात सांगण्यात आलं आहे. विशेषत: ज्या गोष्टी रोज वापरल्या जात नाही, त्या जमा करून ठेवणं योग्य मानलं जात नाही. बेडच्या खाली असलेली जागा शक्यतो साफ ठेवावी.

जुने बूट ठेवू नका

बेडखाली जुने बूट किंवा वापरल्यानंतर बराच काळ पडून असलेल्या वस्तू ठेवणंही वास्तूच्या दृष्टीने योग्य मानलं जात नाही. त्यामुळे या वस्तू दुसऱ्या स्वतंत्र जागी ठेवण्याचा सल्ला दिला जातो.

तुटलेलं सामान ठेवणं टाळा

तुटलेलं घड्याळ, खराब इलेक्ट्रॉनिक वस्तू, तुटलेली खेळणी किंवा आता वापरण्यायोग्य नसलेल्या वस्तू बेडखाली साठवून ठेवणं टाळावं. वास्तुशास्त्रातील मान्यतेनुसार घरातील तुटलेल्या वस्तूंचा संबंध नकारात्मकतेशी जोडला जातो.

हे गरजेचं का ?

वास्तुशास्त्रात बेडरूम ही आरामाची आणि मानसिक शांततेशी निगडीत जागा मानली जाते. त्यामुळेच या जागेत स्वच्छता, साफ-सफाई ठेवणं खूप गरजेचं मानलं जातं. बेडखाली ठेवलेल्या वस्तू दिसत नसल्या तरी त्या खोलीच्या वातावरणावर परिणाम करू शकतात, असंही वास्त्रूशास्त्रात मानलं जातं.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
डान्समध्ये गौतमीला टक्कर देणाऱ्या ऐश्वर्याला मोठा धक्का, पोलिसांनी थेट
Aishwarya Jadhav Dancer | डान्समध्ये गौतमीला टक्कर देणाऱ्या ऐश्वर्याला मोठा धक्का, पोलिसांनी थेट...
दहीहंडीतील लावणी भोवली! नृत्यांगणा राधा पाटीलसह आयोजकांवर गुन्हा दाखल
Dancer Radha Patil News | पुण्यात दहीहंडीतील लावणी भोवली! नृत्यांगणा राधा पाटीलसह आयोजकांवर गुन्हा दाखल
बारामतीत पवार विरुद्ध पवार! सुनेत्रा पवारांसमोर युगेंद्र पवारांचं...
Baramati | बारामतीत पवार विरुद्ध पवार! सुनेत्रा पवारांसमोर युगेंद्र पवारांचं स्वतंत्र पॅनल; सोमेश्वर कारखान्याची निवडणूक रंगणार
विशाखा राऊतांचं नगरसेवकपद रद्द! कारवाईनंतर पहिली प्रतिक्रिया आली समोर
Vishakha Raut | विशाखा राऊतांचं नगरसेवकपद रद्द! कारवाईनंतर पहिली प्रतिक्रिया आली समोर
...तर 10 मिनिटांत महाराष्ट्र बंद पाडला पाहिजे! जरांगेंचा सरकारला इशारा
...तर 10 मिनिटांत महाराष्ट्र बंद पाडला पाहिजे! जरांगेंचा सरकारला कडक इशारा
20-22 दिवसांपासून पाऊस गायब, सोयाबीनवर येलो मोझॅकचा कहर!
Nanded | 20-22 दिवसांपासून पाऊस गायब, सोयाबीनवर येलो मोझॅकचा कहर! नांदेडमध्ये हजारो एकर पीक धोक्यात
तू तुझं तुझं बघ ना! सदावर्तेंच्या मागणीला अंबादास दानवेंचं परखड उत्तर
Ambadas Danve On Gunaratna Sadavarte | तू तुझं तुझं बघ ना! बाळासाहेब ठाकरेंच्या फोटोवरून सदावर्तेंच्या मागणीला अंबादास दानवेंचं परखड उत्तर, पुढे म्हणाले...
ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार! विकासकामांसाठी... त्या बड्या नेत्याने...
ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार! विकासकामांसाठी अनेक जण आमच्याशी संपर्कात, त्या बड्या नेत्याने सगळंच सांगितलं
अजित दादांचं काय झालं? जरांगे पाटलांनी उपस्थित केला थेट सवाल...
Manoj Jarange | अजित दादांचं काय झालं? जरांगे पाटलांनी उपस्थित केला थेट सवाल, पुढे म्हणाले...
सप्टेंबरमध्ये पावसाऐवजी सूर्य आग ओकतोय! सोयाबीन माना टाकू लागलं
Amravati | सप्टेंबरमध्ये पावसाऐवजी सूर्य आग ओकतोय! अमरावतीत सोयाबीन माना टाकू लागलं; शेतकरी संकटात