AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तुम्ही तर ही चूक केली नाही ना? वास्तुशास्त्रात सांगितलेत महाभयंकर परिणाम

तुमचं घर जर वास्तुशास्त्राप्रमाणे असेल, त्यातील वस्तू या वास्त्रुशास्त्राप्रमाणे असतील तर तुम्हाला कोणत्याही अडचणी येत नाहीत, घरावर लक्ष्मी मातेची कृपा सदैव राहाते. आर्थिक अडचणी येत नाहीत, घरात सुख शांती नांदते, असं वास्तुशास्त्रामध्ये सांगितलेलं आहे.

तुम्ही तर ही चूक केली नाही ना? वास्तुशास्त्रात सांगितलेत महाभयंकर परिणाम
| Updated on: May 18, 2025 | 8:07 PM
Share

हिंदू धर्मशास्त्रामध्ये वास्तुशास्त्राला अनन्यसाधारण महत्त्व आहे, जेव्हा तुम्ही एखादं नवं घर बांधत असतात किंवा खरेदी करत असतात तेव्हा तुम्ही ते घर वास्तुशास्त्रानुसार बांधलेलं आहे किंवा नाही हे पाहाता, केवळ घरच नाही तर घरातील वस्तू देखील वास्तुशास्त्राच्या नियमानुसार असायला हव्यात असं मानलं जातं. अन्यथा तुम्हाला अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. घरामध्ये काहीही कारण नसताना वाद होतात. तुम्ही कितीही प्रयत्न करा तुमच्या हातात पैसा टीकत नाही, अनेक अडचणींचा सामना करावा लागतो.

मात्र तुमचं घर जर वास्तुशास्त्राप्रमाणे असेल, त्यातील वस्तू या वास्त्रुशास्त्राप्रमाणे असतील तर तुम्हाला कोणत्याही अडचणी येत नाहीत, घरावर लक्ष्मी मातेची कृपा सदैव राहाते. आर्थिक अडचणी येत नाहीत, घरात सुख शांती नांदते, आरोग्य लाभते असं मानलं जातं. तुमच्या घरामध्ये जिन्याखाली असलेल्या जागेला देखील वास्तुशास्त्रामध्ये विशेष महत्त्व आहे.काही गोष्टी या जिन्याच्या खाली असलेल्या मोकळ्या जागेत चुकूनही ठेवू नका, त्या अशुभ परिणाम देतात असं वास्तुशास्त्र सांगतं. त्यामुळे या घरात राहणाऱ्या व्यक्तींना वेगवेगळ्या संकटांचा सामान करावा लागतो.

जिन्याच्या खाली कधीही टॉयलेट नसावं

तुमच्याही घरामध्ये जिन्याच्या खाली टॉयलेट आहे का? वास्तुशास्त्रामध्ये याला खुपच अशुभ मानलं गेलं आहे. टॉयलेटमध्ये नकारात्मक ऊर्जा असते, जर तुमच्या जिन्याखाली टॉयलेट असेल तर त्याचा मोठा नकारात्मक परिणाम तुमच्यावर होतो. यामुळे आयुष्यात अनेक अडचणी येऊ शकतात, आर्थिक संकट येते, आरोग्याच्या विविध समस्या निर्माण होतात असं वास्तुशास्त्रामध्ये सांगितलेलं आहे.

तसेच तुमच्या घराच्या छतावर देखील काही गोष्टी ठेवणं वास्तुशास्त्रात अशुभ मानलं जातं. ज्यामध्ये तुम्ही तुमच्या घराच्या गच्चीवर चुकनही गंज लागलेलं सामान ठेवू नका, असं वासुशास्त्र सांगतं. त्याचप्रमाणे मोडलेल्या वस्तू  आणि घरातील रद्दी छतावर ठेवू नका असं वास्तुशास्त्रात म्हटलं आहे. या सर्व वस्तू नकारात्मक ऊर्जेच्या प्रतिक असतात. त्याचा परिणाम तुमच्यावर होतो.

डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

पवारांच्या राष्ट्रवादीची सत्तेकडे वाटचाल? दादांबरोबर युती पहिली पायरी?
पवारांच्या राष्ट्रवादीची सत्तेकडे वाटचाल? दादांबरोबर युती पहिली पायरी?.
आदित्य-अमित ठाकरे महापालिका निवडणुकांसाठी सज्ज, कशी असणार रणनीती?
आदित्य-अमित ठाकरे महापालिका निवडणुकांसाठी सज्ज, कशी असणार रणनीती?.
निलेश राणे-रविंद्र चव्हाण यांच्यात भेट, मालवण निवडणुकीतील वादावर पडदा
निलेश राणे-रविंद्र चव्हाण यांच्यात भेट, मालवण निवडणुकीतील वादावर पडदा.
तेजस्वी घोसाळकरांच्या पोस्टर दिवंगत पतीचा फोटो अन् ठाकरे सेनेचा विरोध
तेजस्वी घोसाळकरांच्या पोस्टर दिवंगत पतीचा फोटो अन् ठाकरे सेनेचा विरोध.
दोन्ही NCP च्या विलीनीकरणाची सुरुवात? निवडणुकीच्या निमित्ताने एकत्र!
दोन्ही NCP च्या विलीनीकरणाची सुरुवात? निवडणुकीच्या निमित्ताने एकत्र!.
आशिष शेलार यांच्या बडवे टीकेवरुन वादंग, थेट पंढरपुरातनं फोन अन् ...
आशिष शेलार यांच्या बडवे टीकेवरुन वादंग, थेट पंढरपुरातनं फोन अन् ....
नाशिक भाजपात इनकमिंगवरून राडा, भाजपन देवयानी फरांदे यांचा विरोध डावलला
नाशिक भाजपात इनकमिंगवरून राडा, भाजपन देवयानी फरांदे यांचा विरोध डावलला.
पुण्यातही मविआत फूट, NCP च्या एकत्रीकरणाला ठाकरेंनंतर काँग्रेसचा विरोध
पुण्यातही मविआत फूट, NCP च्या एकत्रीकरणाला ठाकरेंनंतर काँग्रेसचा विरोध.
ठाण्याच्या माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांचा शिंदे सेनेला रामराम
ठाण्याच्या माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांचा शिंदे सेनेला रामराम.
नगरसेवक बनायचं असेल तर... इच्छुक उमेदवारांवर गडकरींचं खास शैलीत सल्ला
नगरसेवक बनायचं असेल तर... इच्छुक उमेदवारांवर गडकरींचं खास शैलीत सल्ला.