Vastushastra : घराच्या उत्तर दिशेला कधीच ठेवू नका या वस्तू; घरात कधीच पैसा टिकणार नाही
वास्तुशास्त्रानुसार घराची उत्तर दिशा ही धनाची देवता कुबेर यांची दिशा असते, त्यामुळे काही विशिष्ट गोष्टी या दिशेला कधीच ठेवू नये. जर तुम्ही या गोष्टी उत्तर दिशेला ठेवल्या तर त्यामुळे तुमच्या घरात नकारात्मक ऊर्जा तयार होते, घराला आर्थिक स्थैर्य प्राप्त होत नाही, तुम्ही कितीही पैसा कमावला तरी देखील तो हातात टिकत नाही. जाणून घेऊयात वास्तुशास्त्रात नेमकं काय सांगण्यात आलं आहे? त्याबद्दल.

तुमच्यासोबत देखील असं घडतंय का? तुम्ही प्रचंड कष्ट करतात, मेहनत करून भरपूर पैसा कमवतात, मात्र तो तुमच्या हातात टिकत नाही? हातात पैसा आला की कोणत्या न कोणत्या कारणामुळे तो लगेच खर्च होतो? घराला आर्थिक स्थैर्य लाभत नाही? अकस्मात खर्चामध्ये मोठी वाढ होते, हे सर्व तुमच्यासोबत घडत असेल तर कधी तुम्हाला असा प्रश्न पडला आहे का की हे नेमकं कशामुळे घडून येत असेल? तर यामागे तुमच्या घरात निर्माण झालेली नकारात्मक ऊर्जा असते. जेव्हा तुमच्या घरात नकारात्म ऊर्जेचा प्रभाव वाढतो, तेव्हा तुमच्या आयुष्यात आर्थिक समस्या येण्यास सुरुवात होते. त्यामुळे ऊर्जा संतुलन साधलं गेलं पाहिजे. आपण आपल्या आयुष्यात अशा काही चुका करतो, ज्यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होते, त्यातील काही गोष्टींबद्दल आज आपण जाणून घेणार आहेत. वास्तुशास्त्रानुसार तुमच्या घरातील उत्तर दिशा ही अत्यंत महत्त्वाची असते, या दिशेला काही दोष निर्माण झाल्यास तुमच्या आयुष्यात अडचणी निर्माण होऊ शकतात. त्यामुळे अशा काही वस्तू असतात ज्या वस्तू जाणीवपूर्व उत्तर दिशेला ठेवणं टाळलं पाहिजे, असं वास्तुशास्त्रात सांगण्यात आलं आहे.
अवजड सामान, फर्निचर: वास्तुशास्त्रानुसार घराच्या उत्तर दिशेला कधीही अवजड सामान, किंवा फर्निचर ठेवू नका. याचा नकारात्मक प्रभाव तुमच्या आयुष्यावर पडतो. उत्तर दिशा ही धनाची देवता कुबेर यांची दिशा मानली जाते. त्यामुळे कधीही या दिशेला अवजड सामान ठेवू नये, असं वास्तुशास्त्रात सांगण्यात आलं आहे. जेव्हा तुम्ही या दिशेला अवजड सामान ठेवता, किंवा कही अनावश्यक गोष्टी ठेवता, तेव्हा तुमच्या घरात वास्तुदोष निर्माण होतो, नकारात्मक ऊर्जा निर्माण होते, या ऊर्जेचा थेट परिणाम हा तुमच्या आर्थिक स्थितीवर होतो, तुम्ही कितीही पैसा कमावला तरी देखील तो तुमच्या हातात टिकत नाही, तुमची तिजोरी नेहमी रिकामी राहते, त्यामुळे घरात उत्तर दिशेला कधीही अवजड सामान ठेवू नये, असा सल्ला वास्तुशास्त्रात देण्यात आला आहे,
टाकाऊ वस्तू, भंगार सामान – जसं उत्तर दिशेला अवजड सामान ठेवू नये, तसंच उत्तर दिशेला टाकाऊ वस्तू ज्या उपयोगात नाही अशा वस्तू तसेच भंगार सामान देखील ठेवू नये, तुमच्या घराची उत्तर दिशा ही नेहमी मोकळी आणि स्वच्छ असावी असं वास्तुशास्त्रात सांगण्यात आलं आहे. जर तुमच्या घराची उत्तर दिशा ही स्वच्छ असेल तर धनाची देवता कुबेर यांचा आशीर्वाद नेहमी तुमच्यावर राहतो, आणि तुमच्या आयुष्यातील सर्व प्रकारचे अडथळे दूर होतात, असं वास्तुशास्त्रात सांगण्यात आलं आहे.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)