AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vastushastra : अशा ठिकाणी चुकूनही घेऊ नका घर, आयुष्य उद्ध्वस्त होईल

वास्तुशास्त्र हे एक असं शास्त्र आहे, ज्यामध्ये तुमचं घर कसं असावं? आणि कसं असू नये? याबाबत अनेक नियम सांगण्यात आले आहेत. तुम्ही नवीन घर खरेदी करत असाल किंवा घर बांधत असाल तेव्हा जर वास्तुशास्त्राच्या नियमांचं पालन झालं नाही तर घरात वास्तुदोष निर्माण होण्याची शक्यता असते, त्यामुळे आजही अनेकजण वास्तुशास्त्रातील नियमांप्रमाणेच घराची खरेदी करताना दिसतात.

Vastushastra : अशा ठिकाणी चुकूनही घेऊ नका घर, आयुष्य उद्ध्वस्त होईल
VastushastraImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: May 21, 2026 | 8:14 PM
Share

वास्तुशास्त्र हे एक असं शास्त्र आहे, ज्यामध्ये तुमचं घर कसं असावं? आणि कसं नसावं? याबद्दल अनेक गोष्टी सांगण्यात आल्या आहेत. वास्तुशास्त्रामध्ये केवळ तुमचं घर कसं असावं? आणि कसं असू नये? याबद्दलच माहिती सांगण्यात आलेली नाही, तर घरात तुम्ही ज्या वस्तू ठेवता, त्यातील कोणत्या वस्तू तुमच्यासाठी शुभ आहेत, कोणत्या वस्तू अशुभ आहेत? तसेच त्या वस्तू घरात ठेवण्याची योग्य दिशा कोणती? याबद्दल देखील मार्गदर्शन करण्यात आलं आहे. वास्तुशास्त्रानुसार तुमच्या घरात जेवढ्या काही वस्तू असतात, त्याचा सकारात्मक किंवा नकारात्मक प्रभाव तुमच्यावर पडत असतो. मात्र आज आपण जाणून घेणार आहोत, ते म्हणजे घर बांधताना किंवा खरेदी करताना काय काळजी घेतली पाहिजे? कोणत्या चुका टाळल्या पाहिजेत? कोणतं घर हे खरेदीसाठी उत्तम असतं, या सर्व प्रश्नांची उत्तर वास्तुशास्त्रात देण्यात आली आहेत. जर घर खरेदी करताना वास्तुशास्त्रात सांगितल्या नियमांचं पालन न झाल्यास तुमच्या घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होऊ शकते, जेव्हा घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होते, तेव्हा तुमच्या आयुष्यात काही समस्या निर्माण होतात, असं वास्तुशास्त्रात सांगण्यात आलं आहे.

पूर्वेला डोंगर – वास्तुशास्त्रानुसार ज्या घराच्या पूर्वेला डोंगर असतो, असं घर कधीही खरेदी करू नये, कारण ज्या घराच्या पूर्वेला डोंगर असतो, त्या घरामध्ये सूर्यप्रकाश पुरेसा पडत नाही. घरात सूर्यप्रकाश पुरेसा नसणं हे वास्तुशास्त्र तसेच विज्ञानाच्या दृष्टीने देखील अयोग्य आहे. घरामध्ये पुरेसा सूर्य प्रकाश असावं असं वास्तुशास्त्रात सांगण्यात आलं आहे, त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे जर तुमच्या घरात अंधार असेल तर तिथे नकारात्मक ऊर्जा तयार होते, ज्यामुळे तुमच्या घरात आजार पण वाढू शकतं, तसेच तुम्हाला तुमच्या आयुष्यात आर्थिक अडचणींचा सामना देखील करावा लागू शकतो.

दक्षिणेला घराचं तोंड – वास्तुशास्त्रानुसार तुमच्या घराचा मुख्य दरवाजा हा कधीही दक्षिणेकडे नसावा. घराचा दरवाजा हा नेहमी पूर्व किंवा पश्चिम दिशेला असावा. मात्र जर तसं घर नसेल तर घराचा दरवाजा हा नेहमी उत्तर दिशेला असावा, असं वास्तुशास्त्रात सांगण्यात आलं आहे. जर घराचा दरवाजा हा दक्षिण दिशेला असेल तर तुमच्या घरामध्ये वास्तुदोष निर्माण होऊ शकतो.

घराभोवती उंच उंच इमारती – जर तुमच्या घराभोवती उंच उंच इमारती असतील तर अशा परिस्थितीमध्ये त्या परिसरात घरं घेणं टाळलं पाहिजे, कारण या इमारतींची सावली तुमच्या घरावर पडते, वास्तुशास्त्रामध्ये हे अत्यंत अशुभ माण्यात येतं, यामुळे तुमची आर्थिक स्थिती कमकुवत होत जाते, असं वास्तुशास्त्रात सांगण्यात आलं आहे.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
ठाण्यातील प्रदीप पूर्णकर प्रकरणावर प्रताप सरनाईक आक्रमक; म्हणाले भर...
ठाण्यातील प्रदीप पूर्णकर प्रकरणावर प्रताप सरनाईक आक्रमक; म्हणाले, भर चौकात...
मोठी बातमी! प्रदीप पुर्णेकर यांच्यानंतर आता पुतणी खुशबू पुर्णेकर...
मोठी बातमी! प्रदीप पुर्णेकर यांच्यानंतर आता पुतणी खुशबू पुर्णेकर टार्गेटवर? धमकीच्या मेसेजने खळबळ
दिल्लीतील पोलीस ठाण्याबाहेर तणाव! अभिजीत दिपके यांना भेटण्यापासून...
दिल्लीतील पोलीस ठाण्याबाहेर तणाव! अभिजीत दिपके यांना भेटण्यापासून वकिलांना रोखलं, बाचाबाची...
अर्थखातं राष्ट्रवादीला मिळेल... छगन भुजबळांचे रोहित पवारांना थेट उत्तर
Chhagan Bhujbal : अर्थखातं राष्ट्रवादीला मिळेल... छगन भुजबळांचे रोहित पवारांना थेट उत्तर
सतीश चव्हाणांच्या प्रचारासाठी सुनेत्रा पवार मैदानात; बीडमध्ये राजकीय..
सतीश चव्हाणांच्या प्रचारासाठी सुनेत्रा पवार मैदानात; बीडमध्ये राजकीय हालचालींना वेग
मोठी बातमी! युट्युबर ध्रुव राठींच्या अडचणी वाढल्या; थेट वॉरंट जारी,
मोठी बातमी! युट्युबर ध्रुव राठींच्या अडचणी वाढल्या; थेट वॉरंट जारी, आता...
जामीनाच्या अटींचं उल्लंघन भोवलं! अभिजीत दिपके अटकेत, तर नेहा बोरा...
जामीनाच्या अटींचं उल्लंघन भोवलं! अभिजीत दिपके अटकेत, तर नेहा बोराची 12 तसांसनंतर सुटका
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत मोठे फेरबदल होणार? मंत्र्यांना डच्चू, तरुण..
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत मोठे फेरबदल होणार? मंत्र्यांना डच्चू, तरुण आमदारांना संधी
प्रदीप पुरणेकर प्रकरणात संजय राऊतांचा मोठा इशारा; दसऱ्यानंतर ठाण्यात..
प्रदीप पुरणेकर प्रकरणात संजय राऊतांचा मोठा इशारा; दसऱ्यानंतर ठाण्यात जाऊन उघड करणार नवी माहिती!
राजकीय घडामोडींना वेग! लातूर जिल्हा बँक निवडणुकीमध्ये महायुतीत फूट
राजकीय घडामोडींना वेग! लातूर जिल्हा बँक निवडणुकीमध्ये महायुतीत फूट