घरात या दिशेला लावा सापाचा फोटो, आयुष्यच बदलून जाईल, आहेत अनेक चमत्कारीक फायदे

वास्तुशास्त्रानुसार असे काही फोटो किंवा मूर्ती असतात, ज्याचा आपल्या आयुष्यावर सकारात्मक प्रभाव पडत असतो. यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. आज आपण अशाच एका फोटोबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. चला तर मग जाणून घेऊयात घरात सापाचा फोटो लावण्याचे नेमके काय -काय फायदे आहेत?

घरात या दिशेला लावा सापाचा फोटो, आयुष्यच बदलून जाईल, आहेत अनेक चमत्कारीक फायदे
snake
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: May 14, 2026 | 9:06 PM

हिंदू धर्मामध्ये सापाला देव मानलं जातं. भगवान महादेव यांच्या गळ्यात साप आहे, तसेच भगवान विष्णू हे देखील शेषनागावरच बसलेले आहेत. आपण नागपंचमीला सापांची पूजा करतो. हिंदू महिला या सणाच्या दिवशी आपला पाठिराखा भाऊ म्हणून सापाची पूजा करतात, तसेच आपल्या कुटुंबावर कोणतंही संकट येऊ देऊ नकोस, संकटाच्या काळात माझं रक्षण कर म्हणून प्रार्थना करतात. वास्तुशास्त्रात सापांसदर्भात अनेक गोष्टी सांगण्यात आल्या आहेत. वास्तुशास्त्रानुसार तुमच्या घरात काही अशा खास जागा असतात, तिथे जर तुम्ही सापाचं पेंटिग किंवा फोटो लावला तर तुम्हाला तुमच्या आयुष्यात कधीहीच पौसा कमी पडत नाही. मात्र घरात सापाचा फोटो लावताना काही गोष्टींची विशेष काळजी घेणं गरजेचं असतं.

घरात सापाचा फोटो लावण्याचे फायदे

वास्तुशास्त्रानुसार तुम्ही जर तुमच्या घरात सापाचा फोटो लावला तर तुमच्या घराचं सर्व प्रकारच्या वाईट नजरेपासून संरक्षण होतं. तुमच्या सुख समृद्धीला कोणाचीही नजर लागत नाही. घरात असलेली सर्व प्रकारची नकारात्मक ऊर्जा नष्ट होते, आणि घराला आर्थिक समृद्धी प्राप्त होते. जे लोक घरात सापाचा फोटो लावतात त्यांना अनेक प्रकारे लाभ होतात. जर तुमचा व्यावसाय असेल तर व्यवसायामध्ये तुम्हाला मोठा नफा होतो. तसेच करिअरमध्ये देखील प्रगतीच्या संधी मिळतात असं वास्तुशास्त्रात सांगण्यात आलं आहे. तसेच जर तुमच्या महत्त्वाच्या कामात अडथळे येत असतील तर तुम्ही तुमच्या घरात नक्की सापाचा फोटो लावा असा सल्ला देखील वास्तुशास्त्रात देण्यात आला आहे.

कोणत्या दिशेला फोटो लावावा?

वास्तुशास्त्रानुसार घरात सापाचा फोटो नेहमी उत्तर किंवा पूर्व दिशेला लावावा, यामुळे घरातील सर्व प्रकराची नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि सकारात्मक ऊर्जा वाढते. घराला आर्थिक स्थैर्य प्राप्त होते. परंतु या ठिकाणी एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवावी, उत्तर किंवा पूर्व दिशा सोडून इतर कोणत्याही दिशेला सापाचा फोटो लावू नये, असं वास्तुशास्त्रात सांगण्यात आलं आहे.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

 

Follow Us