AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vastushastra : प्रचंड कष्ट करूनही अपेक्षित फळ मिळत नाहीये? मग घरामध्ये करा हे छोटे बदल, यश धावत येईल

अनेकदा आपल्या सोबत असं घडतं की एखादी गोष्ट प्राप्त करण्यासाठी आपण प्रचंड कष्ट करतो, परंतु त्यामध्ये आपल्याला अपेक्षित यश मिळत नाही. हा तुमच्या घरात निर्माण झालेल्या नकारात्मक ऊर्जेचा परिणाम देखील असू शकतो. त्यासाठी वास्तुशास्त्रात काही सोपे उपाय सांगण्यात आले आहेत.

Vastushastra : प्रचंड कष्ट करूनही अपेक्षित फळ मिळत नाहीये? मग घरामध्ये करा हे छोटे बदल, यश धावत येईल
vastu shastraImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: May 14, 2026 | 8:39 PM
Share

अनेकदा आपल्यासोबत असं घडतं की आपण एखादी गोष्ट मिळवण्यासाठी खूप प्रयत्न करतो, दिवस -रात्र कष्ट करतो. परंतु त्यामध्ये आपल्याला अपेक्षित यश मिळत नाही. अनेकदा यशाच्या मार्गात अडथळे निर्माण होतात. असं का होतं? याचा कधी तुम्ही विचार केला आहे का? तर वास्तुशास्त्रानुसार हा तुमच्या घरात निर्माण झालेल्या नकारात्मक ऊर्जेचा देखील परिणाम असू शकतो. जेव्हा तुमच्या घरात वास्तुदोष निर्माण होतो, तेव्हा तुम्हाला अशा समस्या येऊ शकतात. वास्तुशास्त्रात वास्तुदोष दूर करण्याचे काही सोपे उपाय सांगण्यात आले आहेत. त्यातीलच काही उपायांबद्दल आज आपण माहिती जाणून घेणार आहेत. वास्तुशास्त्रात दिशांना खूप महत्त्व असतं, आपल्या घरात ज्या काही वस्तू आहेत, त्या योग्य दिशांनाच ठेवल्या गेल्या पाहिजेत, असं वास्तुशास्त्र सांगतं, अन्यथा घरात वास्तुदोष निर्माण होतो.

दक्षिण दिशा – वास्तुशास्त्रामध्ये दक्षिण दिशेला यश आणि किर्तीचं प्रतिक मानलं गेलं आहे. जर तुमच्या घराच्या दक्षिण दिशेला काही वास्तुदोष असेल तर तुम्ही कितीही कष्ट केले तरी तुम्हाला त्याचं अपेक्षित यश मिळत नाही. दक्षिण दिशेला जर वास्तुदोष असेल तर त्याचा फटका हा तुम्हाला आर्थिक आघाडीवर देखील होतो. अचानक काही आर्थिक संकट निर्माण होऊ शकतात. तसेच समाजात तुम्हाला तुमची वेगळी ओळख निर्माण करायला देखील वेळ लागतो, असं वास्तुशास्त्र सांगतं.

उपाय – वास्तुशास्त्रानुसार तुमच्या घराच्या दक्षिण भिंतीला नेहमी लाल किंवा गुलाबी कलर द्यावा, हा कलर शुभ माण्यात येतो. लाल आणि गुलाबी रंग हा ऊर्जा आणि यशाचं प्रतिक आहे. यामुळे दक्षिण दिशेला असणारे वास्तुदोष दूर होतात. तसचे जर तुम्हाला एखाद्या विशिष्ट कामात यश पाहिजे असेल तर तुम्ही दक्षिण दिशेच्या भिंतीला पिवळा रंग देखील देऊ शकतात. परंतु इथे एक गोष्ट लक्षात ठेवा की दक्षिण दिशेला पाण्याशी संबंधित कोणतीही वस्तू जसं की फाउंटन असता कामा नये.

तुम्ही जर वर्क फॉर्म होम करत असाल तर तुम्ही तुमचा कामाचा टेबल हा तुमचं तोंड दक्षिण दिशेला येईल अशा पद्धतीने ठेवू शकता. यामुळे एकाग्रता वाढते, ज्यामुळे तुमची कामातील गती वाढते, त्याचा फायदा तुम्हाला ऑफिसचं काम करताना होतो. तसेच ऑफीसमध्ये प्रमोशन मिळण्याच्या संधी देखील निर्माण होतात, असं वास्तुशास्त्रात सांगण्यात आलं आहे.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका...
MPSC Student Protest : विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका, नेमकं काय म्हणालं कोर्ट?
आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; फडणवीसांचा थेट निशाणा
Devendra Fadnavis on MPSC : आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; MPSC आंदोलनावर फडणवीसांचा थेट निशाणा
दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट..
Devendra Fadnavis : दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट, केंद्राचं पथक 8 ऑक्टोबरपासून पाहणी करणार
रस्त्यावर प्रियंका गांधी; पोलिसांनी उचलून बसमध्ये नेलं, राहुल गांधीही
Congress Protest : हातात संविधान, रस्त्यावर प्रियंका गांधी; पोलिसांनी उचलून बसमध्ये नेलं, राहुल गांधीही ताब्यात
जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस....
Delhi Congress Protest : जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस कार्यकर्त्यांचा संताप, नेमकं काय घडलं?
ही काय पद्धत आहे? प्रियांका गांधी थेट रस्त्यावरच झोपल्या, दिल्लीतील...
Congress Protest : ही काय पद्धत आहे? आम्हाला मारहाण केली, खाली ढकललं; प्रियांका गांधी थेट रस्त्यावरच झोपल्या, दिल्लीतील वातावरण तापलं
जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका...
Delhi Congress Protest : जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका गांधी खाली उतरले, रस्त्यावरच ठिय्या आंदोलन सुरू
मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा
Rahul Gandhi : मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा थेट घणाघात, राहुल गांधी काय म्हणाले?
कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा
Shivsena Supreme Court Hearing : कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा सुप्रीम कोर्टात मोठा युक्तिवाद, पुढे म्हणाले...
आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या
Shivsena Supreme Court Hearing : आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीत नीरज कौलांनी मांडले मोठे मुद्दे, थेट...