Vastushastra : गॅस सिलिंडरच्या पाठिमागे ठेवलेल्या या तीन वस्तू आजच काढून टाका, अन्यथा बँक खातं रिकामं झालंच म्हणून समजा

हिंदू धर्मशास्त्रामध्ये वास्तुशास्त्राला प्रचंड महत्त्व आहे. अनेक कारणं अशी असतात ज्यामुळे आपल्या घरात वास्तुदोष निर्माण होतो. घरात जेव्हा वास्तुदोष निर्माण होतो, तेव्हा तुमच्या आयुष्यात अडचणी येण्यास सुरुवात होते. वस्तुदोष कसा दूर करायचा? यासाठी वास्तुशास्त्रात काही सोपे उपाय सांगण्यात आले आहेत, त्यातीलच एका उपायाबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.

Vastushastra : गॅस सिलिंडरच्या पाठिमागे ठेवलेल्या या तीन वस्तू आजच काढून टाका, अन्यथा बँक खातं रिकामं झालंच म्हणून समजा
VASTUSHTRA
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: May 12, 2026 | 10:03 PM

तुम्हाला माहीत आहे का? तुमचं स्वयंपाक घर हे तुमच्या घरातील ऊर्जेचा सर्वात मोठा स्त्रोत असतो, कारण स्वयंपाक घरामध्ये तुम्ही स्वयंपाक करतात. तुम्ही तुमच्या स्वयंपाक घरात बनवलेले जे अन्न खातात, त्यातूनच तुम्हाला ऊर्जा मिळत असते. त्यामुळे तुमचं स्वयंपाक घर हा तुमच्या घरातील सर्वात मोठा ऊर्जा स्त्रोत मानला जातो. मात्र काही चुकांमुळे सकारात्मक ऊर्जा नष्ट होऊन तुमच्या घरात नकारात्मक ऊर्जेचं प्राबल्य देखील वाढू शकतं, त्यामुळे घरात वास्तुदोष निर्माण होतो. आपल्यापैकी अनेकांना सवय असते की आपण आपलं स्वयंपाक घर खूप स्वच्छ ठवतो. मात्र सिलिंडरच्या पाठिमागे जी मोकळी जागा असते तिला अनेकजण स्टोअर रूम समजतात. सिलिंडर मागे जी मोकळी जागा असते तिचा उपयोग अनेकजण निरपयोगी वस्तू आणि प्लॅस्टिकच्या बाटल्या साचवण्यासाठी करतात. मात्र यामुळे तुमच्या घरात वास्तुदोष निर्माण होऊ शकतो. चला तर मग जाणून घेऊयात वास्तुशास्त्र नेमकं काय सांगतं त्याबद्दल.

प्लॅस्टिकच्या बाटल्या – अनेकदा आपण मोठी चूक करतो, अनेकांना सवय असते की ते घरातील प्लॅस्टिकच्या बाटल्या या सिलिंडरच्या मागे टाकतात. परंतु त्यामुळे घरात वास्तूदोष निर्माण होतो. घरातील टाकावू वस्तुंचा संबंध हा राहु ग्रहाशी असतो. जर तुमच्या घरात टाकाऊ किंवा उपयोग नसलेल्या वस्तुंची संख्या अधिक असेल तर त्यामुळे घरात राहुदोष निर्माण होतो. त्यातच तुम्ही जर टाकावू वस्तू किंवा प्लॅस्टिकच्या बाटल्या या गॅस सिलिंडरच्या पाठिमागे टाकल्या तर सिलिंडर म्हणजे अग्नी, अग्नी म्हणजे मंगळ त्यामुळे एकाचवेळी मंगळ आणि राहुदोष घरात निर्माण होतो. याचा मोठा परिणाम हा तुमच्या आर्थिक स्थितीवर होतो, असं वास्तुशास्त्रात सांगण्यात आलं आहे.

फरशी पुसण्याचे कपडे – अनेकजण फरशी फुसण्याचे कापड देखील काम झाल्यानंतर सिलिंडर मागे टाकून देतात मात्र त्यामुळे घरात वास्तुदोष निर्माण होतो, असं वास्तुशास्त्रात सांगण्यात आलं आहे.

भंगार सामान – स्वयंपाक घरात कधीही भंगार सामान असू नये, असं वास्तुशास्त्रात सांगण्यात आलं आहे.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

 

 

Follow Us