काय आहे पितृदोष लागण्याची कारणे? जाणून घ्या पितृदोषापासून मुक्ती मिळवण्याचे उपाय
पितृदोषापासून मुक्ती मिळावी म्हणून अनेकदा लोक तर्पण, पिंडदान, श्राद्धविधी करतात. परंतु पितृदोष का होतो यामागचे कारण अनेकदा समजत नाही. एखाद्या व्यक्तीच्या छोट्या चुकीमुळे ही पितृदोष होतो अशी धार्मिक धारणा आहे. जाणून घेऊ काय आहे पितृदोषाची कारणे आणि पितृदोषापासून मुक्त होण्याचे उपाय.

जर एखाद्या व्यक्तीला पितृदोष असेल तर त्याला अनेक समस्या आणि आजारांना सामोरे जावे लागते. तसेच कठोर परिश्रम करूनही त्या व्यक्तीला त्याच्या करिअरमध्ये यश मिळत नाही. पौराणिक मान्यतेनुसार ज्याप्रमाणे देवाच्या कृपे शिवाय एखाद्या व्यक्तीच्या जीवनात प्रगती होऊ शकत नाही त्याचप्रमाणे एखाद्या व्यक्तीचे पूर्वज त्याच्यावर रागावले तर त्याच्या कामातही अडथळे निर्माण होतात.
पितृदोष असल्यास त्यापासून सुटका होणे आवश्यक आहे. पितृदोष असल्यास त्यातून मुक्ती मिळवण्यासाठी अनेकदा लोक तर्पण, पिंडदान असे धार्मिक विधी करतात.परंतु पितृदोष का होतो यामागचे कारण जाणून घेणे गरजेचे असते. एखाद्या व्यक्तीच्या छोट्या छोट्या चुकांमुळे सुद्धा पितृदोष निर्माण होतो अशी धारणा आहे. पितृदोषाची कारणे आणि त्यापासून मुक्ती मिळवण्याचे काय उपाय आहे ते जाणून घेऊ.
काय आहे पितृदोषाची कारणे?
पितृदोषाचे पहिले कारण म्हणजे एखाद्याच्या घरातील सदस्याचा अकाली मृत्यू झाला आणि त्याचे अंतिम संस्कार किंवा तर्पण विधीप्रमाणे झाले नाही तर त्या व्यक्तीचा आत्मा भटकत राहतो आणि मृत व्यक्तीचा आत्म्याला दुःख भोगावे लागतात. त्यामुळे घराच्या प्रमुखाला पितृदोषाचा सामना करावा लागतो.
पितृदोष असण्याचे आणखीन एक मुख्य कारण म्हणजे कोणत्याही व्यक्तीच्या जन्मपत्रिकेत दुसऱ्या स्थानी, आठव्या स्थानी आणि दहाव्या स्थानी केतू सूर्यासोबत आल्यास पितृदोष निर्माण होतो. पितृदोष दूर करण्यासाठी उपाय केले नाही तर पिढ्यानपिढ्या ते चालू राहतात. त्यामुळे सर्व पितरांना शांत करण्यासाठी श्राद्ध, तर्पण, हवन, पूजा असे धार्मिक विधी करणे गरजेचे असते.
याशिवाय इतर काही चुकांमुळे ही व्यक्ती पितृदोषाने पीडित होतो. जाणून घेऊ कोणत्या आहेत त्या चुका
- घरातील पूर्वजांचा किंवा मोठ्यांचा अपमान केल्याने पितृदोष होऊ शकतो.
- पिंपळ, कडूलिंब आणि वडाची झाडे तोडल्याने पितृदोष होऊ शकतो.
- घरात रोज भांडणे होत आल्यास आणि कलह असल्यास तरीही पितृदोष होतो.
- कोणताही प्राणी किंवा साप मारल्यास पितृदोष होऊ शकतो.
पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी काही उपाय
- पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी पितृपक्षात पितरांचे श्राद्ध करावे. यावेळी त्यांचे श्राद्ध आणि तर्पण विधी केल्याने पितरांचा आत्मा मुक्त होतो आणि पितृदोषांपासूनही मुक्ती मिळते.
- नाराज पितरांना शांत करण्यासाठी पितृपक्षात काळे तीळ मिसळलेले दूध पिंपळाच्या झाडाला अर्पण करा. तसेच अक्षता आणि फुलेसुद्धा अर्पण करून पितरांच्या आत्म्याच्या शांतीसाठी प्रार्थना करा.
- अमावस्येच्या दिवशी संध्याकाळी घराच्या दक्षिण दिशेला तिळाच्या तेलाचा दिवा लावा. असे केल्याने पितृदोष दूर होतो आणि तुमच्या जीवनातील सर्व अडथळे दूर होतात.
( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)
