अस्थि विसर्जन न केल्याने काय होतं? काय सांगतं हिंदू धर्मशास्त्र
हिंदू धर्मानुसार, एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतात. अंत्यसंस्काराबाबत साधू-संत आणि आखाड्यांचे नियम वेगळे आहेत. पण सामान्य हिंदू बांधवांचे मृत्यूनंतर अंत्यसंस्कार होतात. तसेच पवित्र नदीत अस्थि विसर्जन करण्याची प्रथा आहे. जर तसं केलं नाही तर काय होतं ते जाणून घ्या.

हिंदू धर्मात मृत्यू हे अंतिम सत्य मानलं गेलं आहे. पृथ्वीतलावर जन्म घेतलेली प्रत्येक व्यक्तीचा मृत्यू होणार हे अटल आहे. त्यामुळे पृथ्वीवरील जीवनाला मृत्यूलोक असं संबोधलं गेलं आहे. हिंदू धर्मात एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर त्याचं शव चितेवर ठेवून मुखाग्नी दिला जातो. शव पूर्णपणे आगीत भस्म झाल्यानंतर उरलेल्या अस्थि जमा करून पवित्र नदी सोडण्याची प्रथा आहे. ही परंपरा प्राचीन काळापासून सुरु आहे. अंत्यसंस्कारानंतर अस्थि विसर्जन करणं खूपच महत्त्वाचं मानलं गेलं आहे. अंत्यसंस्कार झाल्यानंतर मृत व्यक्तीच्या अस्थि जमा केल्या जातात. त्यानंतर दहा दिवसांच्या आता पवित्र नदीत विसर्जित केल्या जातात. धर्मशास्त्रानुसार, अमावस्येला अस्थि विसर्जन करणं वर्जित आहे. पण तुम्ही कधी असा विचार केला आहे का? जर अस्थि विसर्जन करता आलं नाही तर काय होतं? चला जाणून घेऊयात..
गरुड पुराणानुसार अस्थि विसर्जन करणं खूपच महत्त्वाचं आहे. पवित्र नदीत अस्थि विसर्जन केलं तर मृत व्यक्तीच्या आत्म्याला शांती मिळते. तसेच मोक्ष मिळण्यास मदत होते. अशा स्थितीत मृत्यूनंतर अस्थिविसर्जन करणं खूपच आवश्यक आहे. जर अस्थिचं विसर्जन केलं नाही तर मृत आत्म्याला मुक्ती मिळत नाही. तसेच त्याला पुढच्या प्रवासात अनेक वेदना सहन कराव्या लागतात.
गरुड पुराणानुसार, अंत्यसंस्कारानंतर जर अस्थि विसर्जन केलं नाही तर मृत व्यक्तीच्या आत्म्याला शांती मिळत नाही. मोक्ष मिळवण्यात अडचणी येतात आणि आत्मा इकडे तिकडे भटकत राहतो. आत्मा मृत्यूनंतरही पृथ्वी तलावरच वास करतो. त्यामुळे मोक्ष मिळवण्यासाठी त्याला असंच भटकत राहावं लागतं.
अस्थि विसर्जन केल्याने मृत व्यक्तीला आत्म्याला शांती लाभते. गरुड पुराणानुसार, अस्थि विसर्जित न केल्यास पितृदोष लागू शकतो. त्यामुळे मृत व्यक्तीच्या आत्म्याला मुक्ती मिळावी यासाठी अस्थि पवित्र नदीत विसर्जित केल्या जातात.
( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)
