Vastu Tips: अधम आणि सिंहमुखी जमीन कशी असते? घर बांधणीसाठी अशुभ असण्याचं कारण काय? जाणून घ्या

वास्तुशास्त्र मानणाऱ्यांना आपलं घर हे शास्त्रशुद्ध बांधलेलं असावं अशी इच्छा असते. त्यामुळे घर बांधताना जमिनीच निवडही तितकीच महत्त्वाची असते. घर बांधणीसाठी काीह जागा अशुभ मानल्या जातात. अधम आणि सिंहमुखी भूमी योग्य मानल्या जात नाहीत. कसं काय ते समजून घ्या

Vastu Tips: अधम आणि सिंहमुखी जमीन कशी असते? घर बांधणीसाठी अशुभ असण्याचं कारण काय? जाणून घ्या
Vastu Tips: अधम आणि सिंहमुखी जमीन कशी असते? घर बांधणीसाठी अशुभ असण्याचं कारण काय? जाणून घ्या
Image Credit source: TV9 Network/Hindi
| Updated on: Jun 03, 2026 | 10:08 PM

वास्तुशास्त्रानुसार घर बांधलं तर भरभराट होते आणि आर्थिक स्थैर्य लाभतं असं शास्त्र मानणाऱ्यांना वाटतं. त्यामुळे मुहूर्त बघण्यापासून जमिनीची निवडही तितकीच महत्त्वाची असते. कारण आयुष्यभराची पुंजी लावून घरं बांधलं जातं. घर एकदाच बांधलं जातं आणि त्यासाठी काळजी घेणं तितकंच महत्त्वाचं आहे. वास्तुशास्त्रानुसार, घर बांधण्यासाठी आणि त्यात राहण्यासाठी काही नियम सांगितले गेले आहेत. पण घर बांधताना जागेची निवड करणंही तितकंच महत्त्वाचं आहे. कारण घर बांधायचं तर योग्य जागा असणं आवश्यक आहे. नवीन घर बांधण्यासाठी जमिनीचा दर्जा काय आहे? त्याचं स्वरूप आणि आकार कसा आहे? भविष्यात वास्तूदोष निर्माण होणार नाही ना? अधम आणि सिंहमुखी जमीन घर बांधण्यासाठी अशुभ असण्याचं कारण काय? चला जाणून घेऊयात सविस्तर

अधम आणि सिंहमुखी जमीन

वास्तुशास्त्रानुसार, अधम म्हणजे खड्डा असलेली जागा.. या ठिकाणी माती अपुरी असते. त्यात खड्डा भरण्यासाठी मातीही अपुरी पडते. त्यामुळे अशा ठिकाणी घर बांधण्यासाठी उत्तर दिशेला एक ते दीड फूट खड्डा खणला जातो. खणलेली माती नंतर पुन्हा भरली जाते. जर खड्डा भरल्यानंतर माती शिल्लक राहिल्यास शुभ मानली जाते. पण खड्डा भरण्यास माती अपुरी पडते. त्यामुळे ही जमीन अशुभ मानली जाते.

वास्तुशास्त्रात जमिनीच्या आकारालाही महत्त्व आहे. वास्तुशास्त्रानुसार, समोरून रूंद आणि मागे प्लॉट अरूंद होत गेला असेल तर या जमिनीला सिंहमुखा जमीन म्हणतात. वास्तुशास्त्रानुसार ही जमीन घर बांधण्यासाठी अशुभ मानली गेली आहे. अशा जमिनीवर घर बांधल्यास अस्थिरता निर्माण होते आणि मानसिक आरोग्य ढासळतं. या उलट गौमुखी भूमी म्हणजे पुढून अरुंद, मागून रुंद असलेली जमीन शुभ मानली जाते. या जमिनीची निवड केल्याने घरात सुख आणि शांती नांदते.

या ठिकाणी घर बांधू नका

वास्तुशास्त्रानुसार, स्मशानभूमि, ओसाड जागा किंवा जुन्या पडक्या इमारतीजवळ घर बांधू नये. ही जागा अशुभ मानली जाते. अशा ठिकाणी घर बांधल्याने नकारात्मक उर्जेचा प्रवाह वाढतो.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us