AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Shani Vakri: 27 जुलैपासून शनी वक्री होणार, या राशीसाठी असेल अडचणीचा काळ

ज्योतिषशास्त्रात, ग्रहांच्या घडामोडी घडत असतात आणि त्याचा परिणाम होत असतो. 27 जुलैपासून शनि वक्री होणार आहे आणि त्याचा सर्वाधिक प्रभाव एका राशीवर पडणार आहे. त्यामुळे या काळात काळजीपूर्वक पावलं टाकणं गरजेचं आहे.

Shani Vakri: 27 जुलैपासून शनी वक्री होणार, या राशीसाठी असेल अडचणीचा काळ
Shani Vakri: 27 जुलैपासून शनी वक्री होणार, या राशीसाठी असेल अडचणीचा काळImage Credit source: TV9 Network
| Updated on: Jun 03, 2026 | 6:18 PM
Share

ज्योतिषशास्त्रानुसार, एकदा का राशीत शनी महाराज आले की हिशेब चुकता करतात. आपल्या कर्मानुसार शनी महाराज फळं देतात. शनी महाराज हा हा सर्वात धीम्या गतीने मार्गक्रमण करणारा ग्रह आहे. त्यामुळे एखाद्यावर वक्रदृष्टी पडली तर जगणं कठीण होतं. शनी महाराज 27 जुलैपासून वक्री होणार आहे. त्यामुळे साडेसाती सुरू असलेल्या राशींना काळजी घेणं आवश्यक आहे. सध्या मेष राशीसाठी साडेसातीचा पहिला टप्पा सुरू आहे. त्यामुळे राशीच्या जातकांना सर्वाधिक काळजी घेण्याची गरज आहे. 27 जुलैपासून या राशीच्या जातकांना करिअर, धन, लव्ह लाईफ आणि आरोग्यविषयक तक्रारी जाणवू शकतात.

करिअरमध्ये अडचणी

मेष राशीला साडेसातीचा सुरूवातीचा टप्पा सुरू असल्याने करिअरमध्ये काही अडचणी येऊ शकतात. या दरम्यान नोकरी, प्रमोशन यात त्रास जाणवू शकतो. त्यामुळे या काळात धीर धरण्याशिवाय पर्याय नाही. इतकंच काय ऑफिसमध्ये अतिरिक्त जबाबदारी पडू शकते. त्याचा मानसिक आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. या काळात तुमच्या शिस्तीची आणि मेहनतीची परीक्षा घेतली जाईल. त्यामुळे नवं काम सुरू करण्याऐवजी अडकलेली कामं मार्गी लावा.

आर्थिक स्थिती बिघडू शकते

शनिचा साडेसातीचा कालावधी अडचणीचा असतो. त्यामुळे या काळात आर्थिक स्थितीत चढउतार दिसून येतो. त्यात शनि वक्री झाल्याने अचानक खर्चात वाढ होऊ शकते. त्यामुळे तुमच्या बचतीवर परिणाम होऊ शकतो. पैसे उधार देण्यापूर्वी दहावेळा विचार करा. अन्यथा घेताना नाकी नऊ येऊ शकतात.

आरोग्यविषयक तक्रारी

शनिच्या गोचरामुळ आरोग्यविषयक तक्रारी वाढू शकतात. या काळात थकवा, चिंता आणि मानसिक ताण जाणवू शकतो. इतकंच काय तर जुने आजारही डोकं वर काढू शकतात. त्यामुळे आरोग्यकडे दुर्लक्ष करू नका. तसेच नियमित व्यायाम करा आणि योग्य आहार घ्या.

प्रेमसंबंधात अडचणी

शनिच्या वक्री अवस्थेत नातेसंबंधात अडचणींचा डोंगर उभा राहू शकतो. या काळात स्वभाव चिडचिडा होईल. त्यामुळे कौटुंबिक आयुष्यावर परिणाम दिसून येईल. प्रेम प्रकरणात नकळत भांडणं होतील आणि दुरावा निर्माण होऊ शकतो.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
लाठ्या-बंदुका आणा... मी तिरंगा घेऊन येतो! सरकारला ठाकरेंचा थेट इशारा
Uddhav Thackeray | लाठ्या-बंदुका आणा... मी तिरंगा घेऊन येतो! सरकारला उद्धव ठाकरेंचा थेट इशारा
दिल्लीच्या आंदोलनाची धग मुंबईत! आदित्य -अमित एकाच मंचावर
Dadar | दिल्लीच्या आंदोलनाची धग मुंबईत! शिवाजी पार्कवर विद्यार्थ्यांचा महासागर; आदित्य ठाकरे-अमित ठाकरे एकाच मंचावर
पंतप्रधान मोदींचा अचानक Gen Z अवतार! सेल्फी व्हिडिओमागचं गुपित काय?
Pm Narendra Modi | पंतप्रधान मोदींचा अचानक Gen Z अवतार! सेल्फी व्हिडिओमागचं गुपित काय?
विद्यार्थ्यांवर पॅलेट गन का चालवली? जखमी आंदोलकाला समोर आणत....
Rahul Gandhi | विद्यार्थ्यांवर पॅलेट गन का चालवली? जखमी आंदोलकाला समोर आणत राहुल गांधींचा सरकारला थेट सवाल
CJP च्या दोन मागण्या मान्य, मात्र प्रधानांच्या राजीनाम्याचं काय?
CJP च्या दोन मागण्या मान्य, मात्र धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याचं काय? काय म्हणालं सरकार?
पेपर फोडणाऱ्यांचं आता काय खरं नाही; दोषींना इतकी मोठी शिक्षा...
NEET Paper Leak Update | पेपर फोडणाऱ्यांचं आता काय खरं नाही; दोषींना इतकी मोठी शिक्षा, सरकारचा मोठा निर्णय
CJP-सरकारची निर्णायक बैठक सुरू; प्रधानांच्या राजीनाम्यावर CJP ठाम
मोठी बातमी! CJP-सरकारची निर्णायक बैठक सुरू; धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर CJP ठाम
आज आम्हाला अटक होऊ शकते, पण.... अभिजित दिपके नेमकं काय म्हणाले?
Abhijeet Dipke | आज आम्हाला अटक होऊ शकते, पण.... अभिजित दिपके नेमकं काय म्हणाले?
आंदोलनाने सरकारची चिंता वाढली; दिल्ली पोलिसांच्या सुट्ट्याच रद्द?
Delhi Police News | विद्यार्थी आंदोलनाने सरकारची चिंता वाढली; दिल्ली पोलिसांच्या सुट्ट्याच केल्या रद्द, नवा आदेश काय?
हा शिवरायांचा महाराष्ट्र नाही! वर्षा गायकवाड यांचा संताप
Varsha Gaikwad | मुंबई पोलिसाकडून महिला आंदोलकाशी गैरवर्तन? हा शिवरायांचा महाराष्ट्र नाही! वर्षा गायकवाड यांचा संताप