AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राज्यातील मुसळधार पावसामुळे धरणांमध्ये पाणीसाठा वाढला; कोणत्या जिल्ह्यात किती पाणीसाठा? जाणून घ्या

महाराष्ट्राच्या विविध भागात पाऊस सुरु आहे. याचा सकारात्मक परिणाम पाणीसाठ्यावर झाला आहे. राज्यातील जलाशयातील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ झाली आहे.

राज्यातील मुसळधार पावसामुळे धरणांमध्ये पाणीसाठा वाढला; कोणत्या जिल्ह्यात किती पाणीसाठा? जाणून घ्या
| Updated on: Jul 25, 2026 | 9:54 AM
Share

राज्यातील गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. मुसळधार पावसामुळे रस्ते आणि रेल्वे वाहतुकीवर परिणाम होताना दिसत आहे. वादळी वाऱ्यासह सुरू असलेल्या पावसामुळे काही ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाल्याचं पाहायला मिळत आहे. नाशिकमध्ये गोदावरी पात्रातील दुतोंड्या मारुती पाण्याखाली गेला आहे. या मुसळधार पावसादरम्यान एक दिलासादायक बाब देखील समोर आली आहे. राज्यातील जलाशयांचा पाणीसाठा झपाट्याने वाढल्याचे समोर आलं आहे. राज्यात कोणत्या जिल्ह्यात किती पाणीसाठा आहे, जाणून घेऊयात.

राज्यातील विविध भागात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जलाशयांतील पाणीसाठा वाढू लागला आहे. राज्यातील एकूण 3029 धरणांत एकूण साठवण क्षमतेच्या 53.38 टक्के इतका पाणीसाठा जमा झाला आहे. परंतु गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा उशिरा पाऊस सुरू झाला. त्याचा परिणाम यंदाच्या पाणीसाठ्यावर पाहायला मिळत आहे. मागच्या वर्षी आजच्या तारखेपर्यंत सर्व जलाशयांमध्ये एकूण साठवण क्षमतेच्या 63.42 टक्के इतका पाणीसाठा जमा झाला होता. मागच्या वर्षीच्या तुलनेत आजच्या तारखेपर्यंत पाणीसाठ्यामध्ये 10.04 टक्क्यांचा फरक पाहायला मिळत आहे.

कोकणात सर्वाधिक जास्त पाणीसाठा 

कोकण विभागातील जलशयांत आजच्या तारखेपर्यंत सर्वाधिक पाणीसाठा जमा झाला आहे. कोकणातील जलाशयांमध्ये 76.54 टक्के पाणीसाठा झाला आहे. त्यानंतर पुण्यात 65.27 टक्के इतका पाणीसाठा झाला आहे. नाशिकमध्ये 55.11 टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. तर नागपूर आणि अमरावतीत अनुक्रमे 46.71 टक्के आणि 42.91 टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. परंतु यंदा मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगरमध्ये कमी प्रमाणात पाऊस झाला आहे. छत्रपती संभाजीनगरमधील जलाशयात केवळ 25.44 टक्के पाणीसाठा झाला आहे.

मराठवाड्यात सर्वाधिक कमी पाणीसाठा 

कोकण आणि पुण्यातील धरणांत अनुक्रमे 77.19 टक्के आणि 70.15 पाणीसाठा झाला आहे. कोकणातील मध्य श्रेणीच्या धरणांत 77.06 टक्के इतका पाणीसाठा झाला आहे. तर छोट्या श्रेणीच्या धरणात 73.06 टक्के इतका पाणीसाठा जमा झाला आहे . छत्रपती संभाजीनगरमध्ये 32.70 टक्के इतका पाणीसाठा जमा झाला आहे. तर छोट्या धरणांत 13.86 टक्के पाणीसाठा जमा झालाय. काही दिवसांपूर्वी पाऊस पडूनही मराठवाड्यातील जलाशयांमध्ये पाणीसाठा कमी जमा झाला आहे.

Follow Us
पुण्यात गणेशोत्सवात 12 दिवस Dry Day का? हायकोर्टाने काय निकाल दिला?
Pune Dry Day : पुण्यात गणेशोत्सवात 12 दिवस Dry Day का? हायकोर्टाने काय निकाल दिला?
मला चांगली मराठी येते, भावना दुखावल्या असतील तर... संजय दत्तला उपरती
Sanjay Dutt | मला चांगली मराठी येते, कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर... संजय दत्तला उपरती
ही शान कोणाची? लालबागच्या राजाची, राजाच्या प्रथम दर्शनाचा व्हिडिओ बघाच
Lalbaugcha Raja First Look 2026 | ही शान कोणाची? लालबागच्या राजाची, राजाच्या प्रथम दर्शनाचा संपूर्ण व्हिडिओ बघाच
ब्रिक्स बिझनेस फोरममध्ये मोदींचं मोठं वक्तव्य; स्टार्टअपपासून UPI...
PM Modi | ब्रिक्स बिझनेस फोरममध्ये PM मोदींचं मोठं वक्तव्य; स्टार्टअपपासून UPIपर्यंत भारताच्या प्रगतीचा पाढाच वाचला
विराट कोहली आणि एकनाथ शिंदेंची लंडनमध्ये भेट! व्हिडिओ होतोय व्हायरल
Virat Kohli Meets Eknath Shinde | विराट कोहली आणि एकनाथ शिंदेंची लंडनमध्ये भेट! क्रिकेट अन् राजकारणातील दोन दिग्गज एकाच फ्रेममध्ये; व्हिडिओ होतोय व्हायरल
एकनाथ शिंदे यांचा एकेरी उल्लेख सहन करणार नाही! योगेश कदम संतापले
Yogesh Kadam | एकनाथ शिंदे यांचा एकेरी उल्लेख सहन करणार नाही! योगेश कदम संतापले; मनोज जरांगेंना केलं आवाहन
जरांगेंच्या मुंबई चलोवर हायकोर्टात सुनावणी! आंदोलनाला परवानगी....
Manoj Jarange | जरांगेंच्या मुंबई चलोवर हायकोर्टात सुनावणी! आंदोलनाला परवानगी मिळणार की ब्रेक लागणार?
छत्रपती शिवरायांना मानणारे लोक हिंदू सणांमध्ये विघ्न आणणार नाहीत
CM Devendra Fadnavis | छत्रपती शिवरायांना मानणारे लोक हिंदू सणांमध्ये विघ्न आणणार नाहीत; मुख्यमंत्री फडणवीसांचा नेमका कोणाला टोला?
सरकारने, पाळलेला श्वान! अंबादास दानवेंचा सदावर्तेंवर पुन्हा घणाघात
Ambadas Danve vs Gunaratna Sadavarte | सरकारने, पाळलेला श्वान! अंबादास दानवेंचा गुणरत्न सदावर्तेंवर पुन्हा घणाघात; पुढे म्हणाले...
आदित्य ठाकरेंनी मुस्लिमांसाठी मातोश्रीवर गरबा ठेवावा; भाजप नेता...
Atul Bhatkhalkar On Aaditya | आदित्य ठाकरेंनी मुस्लिमांसाठी मातोश्रीवर गरबा ठेवावा; भाजप नेता संतापलाच