AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

किती तारखेला आहे लक्ष्मी जयंती? माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी अशा प्रकारे करा आराधना

शास्त्रानुसार, देवी लक्ष्मीचा जन्म समुद्रमंथनाच्या वेळी झाला होता. तेव्हापासून ती भगवान विष्णूच्या सेवेत मग्न आहेत. असे म्हणतात की देवी लक्ष्मी चंचल स्वभावाची आहे, ती एका स्थानी जास्त काळ स्थिरावत नाही.

किती तारखेला आहे लक्ष्मी जयंती? माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी अशा प्रकारे करा आराधना
माता लक्ष्मी Image Credit source: Social Media
| Updated on: Mar 04, 2023 | 4:50 PM
Share

मुंबई :  समुद्रमंथनादरम्यान फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेला लक्ष्मी माता प्रकट झाली (Lakshmi Jayanti 2023) होती. दरवर्षी हा दिवस लक्ष्मी प्रकट दिन किंवा मक्ष्मी जयंती म्हणून साजरा केला जातो. यावर्षी त्यांचा प्रकट दिन 7 मार्च रोजी साजरा होणार आहे. या दिवशी देवी लक्ष्मीची पूर्ण भक्तिभावाने पूजा केल्याने ती प्रसन्न होते आणि भक्तांच्या मनोकामना पूर्ण होतात. फाल्गुन पौर्णिमा तिथी 6 मार्च रोजी दुपारी 2.47 वाजता सुरू होईल जी 7 मार्च रोजी 4.39 वाजता समाप्त होईल. जाणून घेऊया कशा प्रकारे आराधना केल्याने माता लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होईल.

या उपायांनी होईल माता लक्ष्मी प्रसन्न

  1.  दक्षिणावर्ती शंखात जल भरुन देवीचा अभिषेक करा. देवीला शंख अतिप्रिय आहे. मान्यता आहे की शंख देवी लक्ष्मीचा भाऊ आहे कारण त्याचीही उत्पत्ती समुद्र मंथना दरम्यान झाली होती.
  2.  लक्ष्मी पूजनादरम्यान घरातील ईशान्यकोपऱ्यात गायाच्या दुधाने बनलेल्या तुपाचा दिला लावा आणि त्यामध्ये कलाव्याने तयार झालेली वात लावा आणि थोडं केशर टाका.
  3. पूजेनंतर पाच किंवा सात कन्यांना देवीच्या प्रसादाची खीर प्रेमभावनेने खाऊ घाला आणि त्यांना दक्षिणा आणि सामर्थ्यानुसार वस्त्र इत्यादी दान करा. यामुळे देवी अत्यंत प्रसन्न होईल.
  4. पूजेवेळी कौडी, केशर, हळकुंड आणि चांदीचे शिक्के सोबत ठेवून पूजा करा. त्यानंतर एका पिवळ्या वस्त्रात याला बांधून त्या स्थानी ठेवा जिथे धन ठेवलं जातं. याने मोठा फायदा होईल.
  5.  लक्ष्मी जयंतीच्या दिवशी पूजेनंतर शक्य असल्यास गरजुंना दान द्या. यामुळे देवी अत्यंत प्रसन्न होईल.
  6. लक्ष्मीची पूजा करण्यासोबतच लक्ष्मी सहस्रनाम स्तोत्रमचा पाठ करा. लक्ष्मीजींच्या 1008 नामांसह हवन करा.
  7. या दिवशी श्री सूक्तमचे पठण करा किंवा ऐका, लक्ष्मीजींना मिठाई अर्पण करा आणि कमळाचे फूल अर्पण करा.
  8. लक्ष्मी जी दक्षिण दिशेकडून येते असे मानले जाते, त्यामुळे लक्ष्मी प्रकटोत्सवाच्या दिवशी दक्षिणेकडे दिवा ठेवावा.
  9. आदि शंकराचार्यांनी रचलेल्या कनकधारा स्तोत्राचे पठण करूनही माता लक्ष्मी लवकर प्रसन्न होते आणि भक्ताच्या मनोकामना पूर्ण करते.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.