Goddess Lakshmi | लक्ष्मी मातेला प्रसन्न करण्यासाठी हे विशेष उपाय करा, वैभव-संपत्ती वाढेल

देवी लक्ष्मीचा निवास नेहमी आपल्या घरात असावा अशी प्रत्येकाची इच्छा असते, परंतु काही वेळा काही कारणाने देवी लक्ष्मी नाराज होते आणि घरातून निघून जाते. अशा परिस्थितीत देवी लक्ष्मी ज्या घरातून जाते, तेथे दुःख आणि गरिबी वाढते. यामुळेच प्रत्येकाची इच्छा असते की त्यांच्या घरात नेहमी देवी लक्ष्मी निवास करो आणि पैशांचा पाऊस पडो.

Goddess Lakshmi | लक्ष्मी मातेला प्रसन्न करण्यासाठी हे विशेष उपाय करा, वैभव-संपत्ती वाढेल
goddess lakshami

मुंबई : देवी लक्ष्मीचा निवास नेहमी आपल्या घरात असावा अशी प्रत्येकाची इच्छा असते, परंतु काही वेळा काही कारणाने देवी लक्ष्मी नाराज होते आणि घरातून निघून जाते. अशा परिस्थितीत देवी लक्ष्मी ज्या घरातून जाते, तेथे दुःख आणि गरिबी वाढते. यामुळेच प्रत्येकाची इच्छा असते की त्यांच्या घरात नेहमी देवी लक्ष्मी निवास करो आणि पैशांचा पाऊस पडो.

शास्त्रानुसार, देवी लक्ष्मीचा जन्म समुद्रमंथनाच्या वेळी झाला होता. तेव्हापासून ती भगवान विष्णूच्या सेवेत मग्न आहेत. असे म्हणतात की देवी लक्ष्मी चंचल स्वभावाची आहे, ती एका स्थानी जास्त काळ स्थिरावत नाही. पण, ज्याच्यावर देवी लक्ष्मीचा आशीर्वाद असतो, त्याच्याकडे कोणत्याही प्रकारे धन-वैभवची कमतरता नसते.

अशा परिस्थितीत जर तुम्हालाही देवी लक्ष्मीला प्रसन्न करायचे असेल तर त्यासाठी ज्योतिषशास्त्रात काही निश्चित उपाय सांगण्यात आले आहेत, ज्याद्वारे तुम्हाला देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त होऊ शकते. चला जाणून घेऊया ते उपाय –

कुशमूलचा वापर

जर तुम्ही आर्थिक संकटाचा सामना करत असाल आणि खूप प्रयत्न करुनही पैसा थांबत नसेल किंवा घरात पैसा जमा होत नसेल तर तुम्ही कोणत्याही रविवारी पुष्य नक्षत्रात कुशमूल घेऊन ते गंगेच्या पाण्याने धुवा. यानंतर घरातील मंदिरात ठेवा आणि त्याची देवाप्रमाणे पूजा करा. त्यानंतर ते लाल कपड्यात गुंडाळून तिजोरीत किंवा संपत्तीच्या ठिकाणी ठेवा. असे केल्याने देवी लक्ष्मीची तुमच्यावर कृपा असेल.

दक्षिणावर्ती शंख

शंखातील दक्षिणवर्ती शंखाला पूजेत विशेष महत्त्व आहे. पुराणातही दक्षिणावर्ती शंखाचा उल्लेख आहे. अशा स्थितीत धार्मिक मान्यतांनुसार ज्या घरात दक्षिणावर्ती शंख ठेवला जातो त्या घरात कोणत्याही प्रकारची नकारात्मक ऊर्जा प्रवेश करु शकत नाही आणि देवी लक्ष्मीचा आशीर्वाद सदैव राहतो. म्हणून, घरामध्ये दक्षिणावर्ती शंख ठेवावा. हा शंख तुम्ही तुमच्या पूजेच्या ठिकाणी ठेवावा, यामुळे घरात ऐश्वर्य आणि समृद्धी येईल.

श्रीयंत्राची प्रतिष्ठापना

इतकेच नव्हे तर लक्ष्मी देवीची कृपा मिळविण्यासाठी श्री यंत्राच्या स्थापनेलाही धार्मिक मान्यतांमध्ये विशेष महत्त्व देण्यात आले आहे. घरामध्ये श्रीयंत्राची स्थापना करुन त्याची नियमित पूजा केल्यास लक्ष्मीची कृपा प्राप्त होते, असे म्हटले जाते. असे म्हणतात की या यंत्राच्या स्थापनेने घरातील सर्व समस्या दूर होतात आणि जीवनात ऐश्वर्य आणि सुखाचा वास राहतो. पण, या यंत्राचे काही नियम आहेत, ज्यांचे पालन करणे देखील आवश्यक आहे.

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

संबंधित बातम्या :

Diwali 2021 : दिवाळीला अष्टलक्ष्मी साधना केल्यास पैशाशी संबंधित प्रत्येक इच्छा होईल पूर्ण

Diwali 2021 : दिवाळीला देवी लक्ष्मीसोबत भगवान विष्णूची पूजा का केली जात नाही? जाणून घ्या यामागचे कारण

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI