शिवलिंग आणि ज्योतिर्लिंग यामध्ये काय अंतर? जाणून घ्या एका क्लिकवर
Shivalinga and Jyotirlinga Difference : शिवलिंग आणि ज्योतिर्लिंग यामध्ये काय अंतर आहे? तुम्हाला माहिती आहे का? देशात 12 ज्योतिर्लिंग आहे. काय आहे दोघांमधील फरक?

चार धाम यात्रेसोबतच अनेक जण नर्मदा परिक्रमा आणि 12 ज्योतिर्लिंगाची यात्रा करतात. शांती, श्रद्धेसाठी अनेक भाविक 12 ज्योतिर्लिंगाची यात्रा करतात. प्रत्येक ज्योतिर्लिंगाची एक कथा आहे. एक महत्त्व आहे. जर एखादी व्यक्ती रोज शिवलिंगावर जलाभिषेक करत असेल तर भगवान शिवाची त्याच्यावर कृपा असते. पण ज्योतिर्लिंग आणि शिवलिंगमध्ये काय फरक असतो हे तुम्हाला माहिती आहे का? देशातील कोणत्या ठिकाणी ज्योतिर्लिंग आहेत?
ज्योतिर्लिंगाचे महत्त्व
शिव महापुराणानुसार, भगवान शिव जिथे जिथे ज्योति रुपात स्वत: प्रकट झाले, त्या ठिकाणांना ज्योतिर्लिंग म्हटले जाते. देशातील विविध भागात ज्योतिर्लिंग आहेत. या 12 ठिकाणी स्वतः भगवान शंकर प्रकट झाल्याची मान्यता आहे.
- सोमनाथ, गुजरात
- मल्लिकार्जुन, आंध्र प्रदेश
- महाकालेश्वर, मध्य प्रदेश
- ओंकारेश्वर, मध्य प्रदेश
- त्र्यंबकेश्वर, नाशिक, महाराष्ट्र
- घृष्णेश्वर, छत्रपती संभाजीनगर, महाराष्ट्र
- भीमाशंकर, पुणे, महाराष्ट्र
- परळी वैजनाथ, बीड, महाराष्ट्र
- औंढा नागनाथ, हिंगोली, महाराष्ट्र
- काशी विश्वनाथ, उत्तर प्रदेश
- केदारनाथ, उत्तराखंड
- रामेश्वरम, तामिळनाडू
शिवलिंगाचा अर्थ काय?
शिवलिंग पण भगवान शंकराचे एक प्रतिक आहे. हे भगवान शंकराचे प्रतिकात्मक रुप मानण्यात येते. शिवलिंग हे निराकार असल्याचे मानण्यात येते. शिवलिंगाची स्थापना मनुष्यानेच केली आहे. मंदिरच नाही तर घरात सुद्धा शिवलिंगाची स्थापना करण्यात येते. शिवलिंगाचे पण अनेक रुप असतात. भक्त त्याची श्रद्धा, भक्तीनुसार, त्याची पूजा अर्चना करू शकतो. शिवलिंग हे पारद आणि अंडाकृती रुपातील असतात. शिवलिंगाचे एकूण 6 रुप असतात.
ज्योतिर्लिंग दर्शनाने पुण्य लाभते
अशी मान्यता आहे की, जी व्यक्ती 12 ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेते, त्यावर महादेवाची नेहमी कृपा असते. तर अशा व्यक्तीचे पाप दूर होतो. ती व्यक्ती पाप मुक्त होते अशी मान्यता आहे. ही व्यक्ती मोक्षाला प्राप्त होते. जीवित असतानाच त्या व्यक्तीला सुख, शांती आणि समृद्धी मिळते. या व्यक्तीकडे धन-धान्याची कमी नसते.
ही विविध धार्मिक ग्रंथाआधारे दिलेली माहिती. याविषयीची अधिक माहितीसाठी तज्ज्ञांचे मत घ्या. टीव्ही 9 मराठी दाव्याची पुष्टी करत नाही.
