मनुष्याचा सर्वात मोठा रोग आणि सर्वात मोठे सुख काय? जाणून घ्या चाणक्य निती

माणसाचा सर्वात मोठा शत्रू म्हणजे त्याचा लोभ. लोभी माणसाला बरेच काही मिळू शकते, परंतु त्याची इच्छा कधीच संपत नाही. तो इतरांच्या गोष्टींकडे वाईट नजर ठेवतो आणि त्या गोष्टी स्वत:कडे घेण्याचा प्रयत्न करतो.

मनुष्याचा सर्वात मोठा रोग आणि सर्वात मोठे सुख काय? जाणून घ्या चाणक्य निती
मनुष्याचा सर्वात मोठा रोग आणि सर्वात मोठे सुख काय? जाणून घ्या चाणक्य निती

मुंबई : कौटिल्य आणि विष्णुगुप्त यांच्या नावाने परिचित आचार्य चाणक्यच्या बुद्धिमत्तेची ताकद त्यांचे शत्रूही मान्य करीत असत. आचार्य हे केवळ सर्व विषयांचे जाणकार नव्हते, तर ते एक सक्षम गुरु, मार्गदर्शक आणि रणनीतिकार देखील होते. त्यांनी नंदा राजवंशाचा अंत कसा केला आणि एका सामान्य मुलाला सम्राट कसा बनविला, यावरुन त्यांच्या क्षमतेचा अंदाज येतो. आचार्य हे विलक्षण व्यक्तिमत्त्व होते. आयुष्यात घेतलेले अनुभव आणि लोकहित लक्षात घेऊन त्यांनी संदेश दिले आहेत. त्यांचे शब्द आजही तंतोतंत खरे ठरत असल्याचे सिद्ध होत आहे. चला तर मग आपण याठिकाणी जाणून घेऊया की आचार्य चाणक्य यांनी चाणक्य नितीमध्ये सर्वात मोठा आनंद, तपस्या, रोग आणि धर्म कशाला मानले आहे? (What is the greatest disease and the greatest happiness of man, know Chanakya strategies)

1. आचार्य चाणक्य यांनी समाधानाला सर्वात मोठा आनंद मानला आहे. या जगात व्यक्तीने कितीही काहीही मिळवले तरी त्या व्यक्तीचे मन कधीच समाधानी होत नाही. म्हणूनच सर्व काही असूनही, तो खूप विचलित राहतो. आचार्य चाणक्य यांचा असा विश्वास होता की ज्या व्यक्तीकडे समाधान आहे, ती व्यक्ती जगातील सर्वात आनंदी आहे. कारण माणसाची इच्छा हाच त्या व्यक्तीचा सर्वात मोठा शत्रू आहे. अशी व्यक्ती दुसर्याचा आनंद पाहिल्यानंतरही तिच्या मनात मत्सर वाटू लागते आणि अस्वस्थ होते.

2. आचार्य चाणक्य हे शांततेला सर्वात मोठे तप मानायचे. त्यांचा असा विश्वास होता की काही लोकांमध्ये जगातील सर्व सुखसोयी आहेत, परंतु तरीही त्यांना शांतता नाही. जेव्हा एखादी व्यक्ती आपल्या मनावर नियंत्रण ठेवते, तेव्हाच तिला शांती मिळते. ज्याला जगात शांती मिळाली आहे, त्याचे जीवन यशस्वी झाले आहे हेच तुम्हाला तुमच्या निरिक्षणातूनही दिसून येईल.

3. माणसाचा सर्वात मोठा शत्रू म्हणजे त्याचा लोभ. लोभी माणसाला बरेच काही मिळू शकते, परंतु त्याची इच्छा कधीच संपत नाही. तो इतरांच्या गोष्टींकडे वाईट नजर ठेवतो आणि त्या गोष्टी स्वत:कडे घेण्याचा प्रयत्न करतो. अशा व्यक्तीला समाधान किंवा शांती नसते. म्हणूनच जगातील सर्वात मोठा शत्रू हा लोभ आहे. ज्याने लोभावर विजय मिळविला आहे, त्याने आयुष्याची अर्धी लढाई जिंकली, असे म्हटले जाते.

4. इतरांबद्दल करुणा, दयेचा भाव असणे हा सर्वात मोठा धर्म आहे. मानवी रुपात जर आपल्याकडे दयेची भावना नसेल तर आपण एखाद्या प्राण्यासारखे आहोत, कारण देवाने मानवालाच दयेच्या दृष्टीने परिपूर्ण बनवले आहे, जेणकरून मानव एकमेकांप्रती दयेने वागू शकेल. माणूस इतरांना मदत करु शकेल. म्हणूनच आचार्य चाणक्य हे दयेलाच सर्वात मोठा धर्म मानायचे. (What is the greatest disease and the greatest happiness of man, know Chanakya strategies)

इतर बातम्या

अशा पंडितांकडून कधीही पूजा, श्राद्ध करून घेऊ नका; जाणून घ्या गरुड पुराणामध्ये काय म्हटलेय?

अब्जावधींचा रिव्हेन्यू, कोट्यवधींचा नफा, राज कुंद्राच्या कंपनीला भविष्यात तब्बल इतका नफा?

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI