अशा पंडितांकडून कधीही पूजा, श्राद्ध करून घेऊ नका; जाणून घ्या गरुड पुराणामध्ये काय म्हटलेय?

धर्मग्रंथात पंडित किंवा ब्राह्मण म्हणजे एक साधे जीवन जगणारी, सर्वांचे भले चिंतणारी आणि धर्माच्या मार्गावर चालणारी व्यक्ती असल्याचे नमूद केले आहे. पण आजकाल लोक स्वत:च्या मार्गाने संभ्रमित झाले आहेत.

अशा पंडितांकडून कधीही पूजा, श्राद्ध करून घेऊ नका; जाणून घ्या गरुड पुराणामध्ये काय म्हटलेय?
गरुड पुराणात धनाचा संबंध स्वच्छतेशी सांगताना सांगण्यात आले आहे की, जर तुम्हाला माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर राहावी असे वाटत असेल तर घरासोबतच शारीरिक स्वच्छतेकडेही पूर्ण लक्ष द्या. जिथे घाण असते तिथे माता लक्ष्मी वास करत नाही. हे जरी शास्त्रोक्त पद्धतीने बघितले तरी ते अगदी बरोबर असल्याचे सिद्ध होते कारण जिथे घाण असते तिथे रोग आणि नकारात्मकता असते. अशा ठिकाणी पैसा पाण्यासारखा वाया जातो आणि त्या व्यक्तीला शारीरिक, मानसिक आणि आर्थिक तिन्ही प्रकारे त्रास होतो.
Follow us
| Updated on: Jul 27, 2021 | 3:31 PM

मुंबई : घरात सुख आणि शांती राखण्यासाठी गरुड पुराणात पूजा, यज्ञ, हवन, श्राद्ध इत्यादी आवश्यक असल्याचे म्हटले आहे. याशिवाय विशिष्ट इच्छापूर्तीसाठी पूजेमध्ये विशेष साहित्याचा उल्लेखही केला आहे. परंतु कोणत्याही प्रकारच्या उपासनेसाठी कुशल व योग्य पंडिताचीही गरज आहे. पंडित अनुभवी असेल तर तुमची पूजा यशस्वी होते, अन्यथा तुमच्यामार्फत करण्यात आलेली सर्व कामे व्यर्थ मानली जातात. (Never do pooja, shraddha from such Pandits; Know what is said in Garuda Purana)

धर्मग्रंथात पंडित किंवा ब्राह्मण म्हणजे एक साधे जीवन जगणारी, सर्वांचे भले चिंतणारी आणि धर्माच्या मार्गावर चालणारी व्यक्ती असल्याचे नमूद केले आहे. पण आजकाल लोक स्वत:च्या मार्गाने संभ्रमित झाले आहेत. वास्तविक, गरुड पुराणात अपात्र लोकांना पूजा न करण्यास सांगितले गेले आहे. गरुड पुराणामध्ये नेमक्या कोणत्या प्रकारच्या लोकांना किंवा पंडितांना पूजा, यज्ञ आणि श्राद्ध वगैरे न करण्यास सांगितले गेले आहे, ते आपण याठिकाणी सविस्तरपणे जाणून घेऊया.

– जे पंडित जादूटोणा वगैरे करतात, त्यांनी कधीही यज्ञ, पूजा आणि श्राद्ध करू नये अन्यथा पूर्वजांना त्रास सहन करावा लागतो.

– लोभी पंडित तसेच ज्यांना वेदांचे ज्ञान नाह, त्यांच्यामार्फत केले गेलेली उपासना आणि यज्ञ व्यर्थ मानले जाते. अशा परिस्थितीत तुमच्या मनोकामना पूर्ण करता येणार नाहीत. म्हणून अशी कामे करण्यासाठी लोभी आणि अज्ञानी पंडितांची मदत घेऊ नका.

– काना, मुका, मुर्ख तसेच संतप्त होणाऱ्या पंडितांनीही पूजा आणि श्राद्ध करू नये.

– चुकीच्या लोकांच्या सहवासात असलेल्या पंडितांनी चुकूनही पूजा करु नये.

– एखाद्या परस्त्रिशी संबंध ठेवणार्या, महिलेला वश झालेल्या आणि इतरांच्या बायकांवर वाईट नजर ठेवणाऱ्या पंडितांमार्फत पूजा करून घेऊ नये. त्यांच्यामार्फत पूजा करणे हे पाप मानले जाते.

– इतरांचा द्वेष करणारे आणि वाईट कर्म करणाऱ्या पंडितांनी केलेली उपासना कधीही यशस्वी ठरत नाही. म्हणून असे पंडित कधीही निवडू नका.

– दुसऱ्यांचे पैसे चोरतात, खोटे बोलतात, हिंसाचार करतात, त्या पंडित किंवा ब्राह्मणांद्वारे पूजा करून घेऊ नका. त्यांच्याकडून पूजा करून घेतल्यास पंडित किंवा ब्राम्हणांनी केलेल्या चुकांचे तुम्हीसुद्धा भागीदार ठरू शकता.

– सोन्याचे दागिने विकणाऱ्या पंडितांनाही यज्ञ आणि पूजा करण्यासाठी बोलवू नये. अशा पूजेतून फलप्राप्ती होत नाही.

– निंदा, चुगली तसेच मादक पदार्थांच्या आहारी गेलेल्या ब्राह्मण किंवा पंडितांना पूजा, यज्ञ किंवा श्राद्ध करण्यास कधीही बोलवू नये.

– जे पंडित बोकडांचे पालन करतात किंवा जे चित्रकार, चिकित्सक आणि ज्योतिषी आहेत, अशा चार प्रकारच्या पंडितांकडून पूजा करून घेऊ नका. त्यांच्यामार्फत केल्या जाणाऱ्या पूजेचा काही फायदा होत नाही. (Never do pooja, shraddha from such Pandits; Know what is said in Garuda Purana)

इतर बातम्या

उद्धव ठाकरे म्हणाले, ‘वाढदिवसाची भेट काय देणार?’, भास्कर जाधवांकडून ‘स्वच्छ-सुंदर’ उत्तर!

वाशी न्यायालयात 1 ऑगस्टला ई-लोक अदालत, डिजिटल माध्यमातून होणार केसेसचा निपटारा

Non Stop LIVE Update
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.