काळा रंग अशुभ, तरीही मग सौभाग्याचं लेणं असलेल्या मंगळसूत्रातील काळे मणी का असतात शुभ? जाणून घ्या
मंगळसूत्र हे विवाहित महिलांच्या सोळा अलंकारांपैकी एक मानले जाते आणि हिंदू धर्मात त्याचे विशेष महत्त्व आहे. धार्मिक श्रद्धेनुसार काळा रंग अशुभ मानला जातो. पण अनेकांना प्रश्न पडतो की जर काळा रंग अशुभ मानला जातो तर मंगळसूत्रातील काळे मणी का असतात शुभ? चला याबद्दल जाणून घेऊयात.

हिंदू मान्यतेनुसार विवाहित महिलेच्या गळ्यात असलेल्या मंगळसुत्रातील काळे मणी हे तिच्या सौभाग्याचं लेणं असते. कारण मंगळसुत्र हे स्त्रीच्या 16 अलंकारांपैकी एक आहे आणि म्हणूनच धार्मिक शास्त्रांमध्ये त्याचे विशेष महत्त्व आहे. धार्मिक श्रद्धेनुसार मंगळसूत्र विवाहित महिलांच्या वैवाहिक आनंदाचे रक्षण करते. मंगळसुत्रात काळे मणी असणे हे केवळ एक परंपरा नसून ते एक सरंक्षणारचे प्रतीक देखील आहे. पण त्याच बरोबर हिंदू धर्मात काळा रंग सामान्यत: दुर्दैव आणि दु:खाचे प्रतिक मानले जाते असाही एक समज आहे. यामुळे प्रश्न निर्माण होतो की काळा रंग शुभ मानला जात नाही तर मंगळसूत्रातील काळे मणी शुभ का असतात काळ्या मण्यांना इतके विशेष स्थान का दिले जाते आणि त्यांचे महत्त्व काय आहे? चला या लेखात हे जाणून घेऊयात.
मंगळसूत्रातील काळ्या मण्यांचे महत्त्व काय आहे?
धार्मिक मान्यतेनुसार मंगळसूत्रातील काळे मणी वाईट नजर आणि नकारात्मक उर्जेपासून संरक्षण करण्यासाठी महत्त्वाचे मानले जातात. ज्यामुळे वैवाहिक जीवनात आनंद येतो. तर हे मंगळसुत्र पती-पत्नीमधील शक्ती आणि संतुलन राखण्याचे, नाते मजबूत करण्याचे आणि पतीच्या आरोग्याचे रक्षण करण्याचे प्रतीक देखील आहेत. शिवाय काळे मणी देवी शक्तीचे प्रतिनिधित्व करतात आणि विवाह स्थिर करतात.
असे मानले जाते की मंगळसूत्राचे काळे मणी वाईट आत्म्यांना आणि नकारात्मक उर्जेपासून दूर ठेवण्यासाठी संरक्षक कवच म्हणून काम करतात.
हिंदू मान्यतेनुसार असे मानले जाते की मंगळसूत्राचे काळे मणी वाईट नजरेपासून संरक्षण करतात आणि पती-पत्नीमध्ये शांती आणि प्रेम राखतात.
मंगळसूत्रातील काळे मणी देवी शक्तीचे प्रतिनिधित्व करतात, जी शक्ती आणि संरक्षणाचे प्रतीक मानली जाते.
धार्मिक मान्यतेनुसार मंगळसूत्रातील काळे मणी पतीच्या आरोग्याचे रक्षण करतात आणि तणाव कमी करण्यास मदत करतात.
सोन्याच्या मंगळसूत्रात काळे मणी असण्याचे कारण म्हणजे काळा रंग नकारात्मक लहरी शोषून घेतो, ज्यामुळे लग्नातील कोणतेही संकट व नुकसानीपासून संरक्षण होते.
असे म्हटले जाते की मंगळसूत्रातील काळे मणी शनि ग्रहाचे प्रतीक मानले जातात आणि हे मणी पती-पत्नीवरील शनीच्या अडथळ्यांना स्वतःवर घेतात, ज्यामुळे पतीच्या जीवनात आनंद राहतो.
( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)
