Premanand Maharaj : पत्नी खोटारडी, धोका देणारी असली तर करायचं काय ? प्रेमानंद महाराजांनी थेट सांगितलं..
प्रेमानंद महाराजांचे उपदेश आणि प्रवचने लोकांच्या जीवनाला नवीन दिशा देतात. अलिकडेच एका व्यक्तीने प्रेमानंद महाराजांना विचारले की जर एखाद्याची पत्नी कठोर शब्द बोलली किंवा तिने फसवणूक केली तर अशा वेळी काय करावे ? यावर प्रेमानंद महाराजांनी काय सल्ला दिला ते जाणून घेऊया.

वृंदावनमधील प्रसिद्ध संत आणि गुरु प्रेमानंदजी महाराज हे नेहमीच त्यांचे विचार आणि उपदेशांमुळे चर्चेत असतात. ते त्यांच्या ज्ञानाचा उपयोग करून लाखो लोकांच्या जीवनाला दिशा देतात. त्यांची शिकवण अनेकदा सोशल मीडियावर व्हायरल होते, ज्यापासून लोक प्रेरणा घेतात. एखाद्याची पत्नी जर खोटं बोलायला लागली किंवा छळ करत असेल तर अशा वेळी काय करावं, कसं वागावं हे प्रेमानंद महाराज यांनी नुकतंच सांगितलं.
प्रेमानंद महाराजांना सवाल
एका भक्ताने प्रेमानंद महाराजांना विचारलं की पत्नी जर खूप खोटं बोलत असेल, कटू बोलत असेल, त्रास देत असेल किंवा त्यांना साथ देत नसेल तर अशा परिस्थितीत काय करावं? या प्रश्नाचं उत्तर देताना प्रेमानंद महाराज म्हणाले की जर तुमची पत्नी तुमच्याशी खोटं बोलत असेल किंवा फसवणूक करत असेल तर, अशा परिस्थितीत (तुम्ही) तिला अधिक प्रेम दिलं पाहिजे.
प्रत्येक परिस्थितीत निभवा कर्तव्य
प्रेमानंद महाराज म्हणाले , “पती म्हणून तुमचे कर्तव्य आहे की, पत्नीवर प्रेम करणे आणि त्यांची काळजी घेणं आणि तुम्ही ती जबाबदारी पार पाडली पाहिजे. जर तुमची पत्नी तिचे कर्तव्य विसरून तुम्हाला वेदना देत असेल, कठोर शब्द बोलत असेल आणि संकटे आणत असेल तर ते सहन करा आणि तुमच्या प्रेमात अंतर आणू देऊ नका. तुम्ही तुमची कर्तव्यं नीट पार पाडली पाहिजेत. पत्नीची कर्तव्ये काय आहेत ते देव पाहून घेईल.” असं त्यांनी सांगितलं.
पत्नीमध्ये देव असतो, त्यामुळे तिला कधी विरोध करू नका. एक पती म्हणून, तिला सल्ला द्या, पण जर ती ऐकत नसेल तर तिच्यावर रागावण्याऐवजी तुम्ही शांत राहिलं पाहिजे. कारण तुमचे कर्म तुमच्यासोबत आहेत आणि तिचे कर्म तिच्यासोबत असतं असंही त्यांनी सांगितलं.
प्रेमानंद महाराजांनी दिला सल्ला
जर तुमची पत्नी तुम्हाला सोडून गेली तर ते ठीक आहे, पण कधीही तुमच्या पत्नीला सोडून देऊ नका किंवा विरोध करू नका. प्रेमानंद महाराज म्हणाले, “जर आपण सहन करायला शिकलो तर आपण आपल्या कुटुंबाला वाचवू शकतो, स्वतःला वाचवू शकतो आणि मोठ्या संकटांना तोंड देऊ शकतो. आजकाल सहनशीलता खूप कमी झाली आहे, ज्यामुळे लोक अगदी छोट्याशा गोष्टीवरही रागावतात. पण असं होऊ नये; आपण स्वतःमध्ये सहनशीलता आणली पाहिजे” असा सल्ला त्यांनी तिला.
( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)
