AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Premanand Maharaj Net Worth : विराट -अनुष्का पोहोचले ज्यांच्या दरबारी, त्या प्रेमानंद महाराजांची संपत्ती किती ?

अध्यात्मिक गुरू प्रेमानंद महाराज हे नेहमी चर्चेत असतात. ते सध्या देशातील सर्वात प्रसिद्ध गुरू आहे. फक्त भारतातच नव्हे तर जगभरात त्यांचे लाखो भक्त आहेत. त्यांचा उपेदश, मार्गदर्शन ऐकणं लोकांना खूप आवडतं. सोशल मीडियाच्या काळात त्यांची लोकप्रियता खूप वाढली आहे. क्रिकेटर विराट कोहली - अभिनेत्री अनुष्का शर्मा हेही अनेकवेळा त्यांच्या भेटीसाठी, दर्शनासाठी जातात.

Premanand Maharaj Net Worth : विराट -अनुष्का पोहोचले ज्यांच्या दरबारी, त्या प्रेमानंद महाराजांची संपत्ती किती ?
| Updated on: Feb 07, 2025 | 3:10 PM
Share

Premanand Maharaj Net Worth : अध्यात्मिक गुरू प्रेमानंद महाराज हे नेहमी चर्चेत असतात. ते सध्या देशातील सर्वात प्रसिद्ध गुरू आहे. फक्त भारतातच नव्हे तर जगभरात त्यांचे लाखो भक्त आहेत. त्यांचा उपेदश, मार्गदर्शन ऐकणं लोकांना खूप आवडतं. सोशल मीडियाच्या काळात त्यांची लोकप्रियता खूप वाढली आहे. त्यांच्याबद्दल जास्तीत जास्त माहिती लोकांना जाणून घ्यायची असते. ते त्यांच्यासंदर्भात  विविध प्रश्न विचारून जाणून घेण्याचा प्रयत्न करत असतात. क्रिकेटर विराट कोहली – अभिनेत्री अनुष्का शर्मा हे जोडपंही अनेकवेळा त्यांच्या भेटीसाठी, दर्शनासाठी जात असतं.

प्रेमानंद महाराज यांच्याबद्दल विशेषत: त्यांच्या मालमत्तेबाबत अनेक चर्चा सुरू आहेत. पण प्रत्यक्षात त्यांची काही मालमत्ता आहे का? यावर खुद्द प्रेमानंदजी महाराजांनी खुलेपणाने उत्तर दिले आहे.

एका व्यक्तीने प्रेमानंद महाराज यांना विचारलं की त्यांच्याकडे काही खासगी मालमत्ता आहे का ? त्यावर त्यांनी उत्तर दिलं की त्यांच्याकडे कोणतीही खासगी संपत्ती नाही. त्यांच्या नावे ना बँक अकाऊंट आहे किंवा कोणतीही अचल संपत्ती ( जमीन, घर, फ्लॅट) असं काहीच नाहीये. ते पूर्णपणे तपस्वी जीवन जगतात आणि त्यांच्याकडे कोणतीही भौतिक संपत्ती नसते. त्यांनी स्पष्टपणे हेही सांगितलं की, कोणी त्यांच्याकडे 10 रुपये मागितले तरी ते देण्यास त्यांच्याकडे नाही. त्यांचे जीवन त्याग आणि आध्यात्मिक साधनेवर केंद्रित आहे आणि सांसारिक संपत्तीवर नाही, हे त्यांच्या विधानावरून स्पष्ट होतं.

कुठे राहतात प्रेमानंद महाराज ?

प्रेमानंद महाराज कोणत्याही खाजगी घरात राहत नाहीत. ते एका भक्ताच्या फ्लॅटमध्ये राहतात, जिथे त्याच्या राहणीमानाच्या आणि अन्नाच्या सर्व गरजांची काळजी त्याचे अनुयायी घेतात. वीजबिलही तेच लोक भरतात. प्रेमानंद महाराज यांनी कोणत्याही प्रकारची भौतिक संपत्ती आपल्या नावावर ठेवली नसल्याचेही यातून स्पष्ट झाले आहे.

प्रेमानंद महाराज यांच्याकडे कोणती कार आहे ?

प्रेमानंद जी महाराज हे अनेकवेळा ऑडी कारमध्ये दिसले आहे, मात्र ही त्यांची वैयक्तिक कार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. ही कार त्यांच्या कारसेवकांची आहे, जे त्याचा प्रवासासाठी वापर करतात. प्रेमानंद जी महाराज तपस्व्यासारखं जीवन जगतात आणि त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारची मालमत्ता नाही.

Follow Us
पुण्यात अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट? राजकीय वर्तुळात चर्चां
पुण्यात अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण!
आंबेगावात कामगारांचं बचावकार्य सुरु असतानाच भाजप नेत्यांकडून धक्कादायक
Solapur : आंबेगावात कामगारांचं बचावकार्य सुरु असतानाच भाजप नेत्यांकडून श्रद्धांजलीच्या पोस्ट
कर्जतमध्ये टोरेंट प्रकल्पावरून संघर्षाची ठिणगी! 226 शेतकऱ्यांना...
कर्जतमध्ये टोरेंट प्रकल्पावरून संघर्षाची ठिणगी! 226 शेतकऱ्यांना भूसंपादनाच्या नोटिसा; संजय राऊतांचा इशारा
टायगर श्रॉफ प्रकरणाला नवं वळण; गणेश लांडगेच्या कुटुंबीयांचा खुलासा
टायगर श्रॉफ प्रकरणाला नवं वळण; गणेश लांडगेच्या कुटुंबीयांचा मोठा खुलासा, म्हणाले...
महाराष्ट्र एपस्टीन फाईल्सवरून वाद पेटला! दिग्दर्शक स्वरूप सावंतांनी...
महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स' चित्रपटावरून वाद पेटला! दिग्दर्शक स्वरूप सावंतांनी अखेर मौन सोडलं, थेट केलं मोठं विधान...
अर्शदीप, सिराज अन् अक्षरची कमाल! भारताने न्यूझीलंडविरुद्ध 22 धावांनी..
IND vs NZ: अर्शदीप, सिराज अन् अक्षरची कमाल! भारताने न्यूझीलंडविरुद्ध 22 धावांनी सामना जिंकला
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि शरद पवार एकाच मंचावर? कारण काय?
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि शरद पवार एकाच मंचावर? अजित पवारांच्या पुतळ्याच्या अनावरण सोहळ्यात शरद पवारांना निमंत्रण
कर्जाचे हप्ते थकल्याने मायक्रो फायनान्स कंपनीने शेतमजुराचे घर सील...
कर्जाचे हप्ते थकल्याने मायक्रो फायनान्स कंपनीने शेतमजुराचे घर सील, दुष्काळी परिस्थितीमुळे जीवन विस्कळीत
500 कोटींच्या ऑडिओ क्लिपवरून मनोज जरांगे आक्रमक; थेट बड्या नेत्यांना इ
Manoj Jarange Patil : 500 कोटींच्या ऑडिओ क्लिपवरून मनोज जरांगे आक्रमक; थेट बड्या नेत्यांना इशारा
खासदार शोधा रे, शोधणाऱ्याला बक्षीस... रवी राणा असं का म्हणाले?
खासदार शोधा रे, शोधणाऱ्याला बक्षीस... रवी राणा असं का म्हणाले? अमरावतीतील राजकाणात मोठ्या घडामोडी