Planets related donation : सुख प्राप्तीसाठी नवग्रहांप्रमाणे दान करा आणि चिंतामुक्त व्हा

| Updated on: Dec 02, 2021 | 7:00 AM

हिंदू धर्मात दानाला विषेश महत्त्व प्राप्त झाले आहे. जीवनातील संकटे दूर करून सुख प्राप्तीसाठी दान हे अत्यंत प्रभावी मानले जाते. दान केल्याने मनोकामना तर पूर्ण होतातच शिवाय पुण्य फळाची प्राप्ती होते.

Planets related donation : सुख प्राप्तीसाठी नवग्रहांप्रमाणे दान करा आणि चिंतामुक्त व्हा
daan
Follow us on

मुंबई : हिंदू धर्मात दानाला विषेश महत्त्व प्राप्त झाले आहे. जीवनातील संकटे दूर करून सुख प्राप्तीसाठी दान हे अत्यंत प्रभावी मानले जाते. दान केल्याने मनोकामना तर पूर्ण होतातच शिवाय पुण्य फळाची प्राप्ती होते. नवग्रहांशी संबंधित सर्व दोष आणि पापांपासून मुक्त होण्यासाठी दान हा एक अतिशय प्रभावी मार्ग आहे. चला तर मग जाणून घेऊया, कोणत्या ग्रहाचा त्रास दूर करण्यासाठी काय दान करावे.

रवि
ज्योतिषशास्त्रात सूर्य या ग्रहाला अत्यंत महत्त्व प्राप्त आहे. कुंडलीत सूर्याचे शुभ लाभ मिळण्यासाठी आणि त्याच्याशी संबंधित दोष दूर करण्यासाठी रविवारी गहू, तांबे, तूप, सोने आणि गूळ यांचे दान करावे.

चंद्र
ज्योतिषशास्त्रात चंद्र हा मनाचा कारक मानला जातो. अशा स्थितीत कुंडलीतील चंद्र ग्रह बलवान होण्यासाठी तांदूळ, साखर, पांढरे वस्त्र, चांदी इत्यादी पांढर्‍या वस्तूंचे सोमवारी दान करावे.

मंगळ
ज्योतिषशास्त्रात मंगळ हा महत्त्वाचा ग्रह मानला जातो. कुंडलीतील मंगळाची अशुभता दूर करण्यासाठी मंगळवारी गहू, मसूर, लाल वस्त्र आणि गुळाचे दान करावे.

बुध
ज्योतिषशास्त्रात बुध हा बुद्धीचा कारक मानला जातो. बुध ग्रहाशी संबंधित दोष दूर करण्यासाठी बुधवारी मूग, हिरव्या रंगाचे कपडे आणि कापूर इत्यादींचे दान करावे.

गुरु
ज्योतिष शास्त्रात देवगुरु बृहस्पतीला सौभाग्याचा कारक मानले जाते. अशा स्थितीत गुरूशी संबंधित त्रास दूर करण्यासाठी हरभरा डाळ, पिवळा रंग, पिवळी हळद, पिवळी मिठाई आणि शक्य असल्यास सोन्याचे दान करावे.

शुक्र
कुंडलीतील शुक्र ग्रहाशी संबंधित त्रास दूर करण्यासाठी आणि त्याचे शुभफळ प्राप्त करण्यासाठी शुक्रवारी चांदी, तांदूळ, दूध, अत्तर इत्यादींचे दान करा.

शनि
शनि ग्रहाशी संबंधित त्रास दूर करण्यासाठी आणि त्याचे शुभफळ प्राप्त करण्यासाठी शनिवारी तीळ, तेल, काळे कपडे, काळे बूट, काळी घोंगडी इत्यादी दान करावे.

राहू
जर राहु तुमच्या जीवनात अवरोधक म्हणून काम करत असेल तर शनिवारी निळ्या रंगाचे कपडे, मोहरी, उडीद डाळ इत्यादींचे दान करा आणि त्यामुळे होणारा त्रास दूर करा.

केतू
केतूचा त्रास दूर करण्यासाठी सतंजा, तीळ आणि लोकरीचे कपडे दान करा

इतर बातम्या

चमत्कारिक तुळशीचे पाणी, नोकरी-व्यवसायात प्रगती, आजारातून मुक्त होण्यास होईल मदत

Ketu Temple | आश्चर्य..! या मंदिरात चढवलेलं दूध निळं पडतं, जाणून घ्या केरळातील या रहस्यमयी मंदिराबाबत