Ketu Temple | आश्चर्य..! या मंदिरात चढवलेलं दूध निळं पडतं, जाणून घ्या केरळातील या रहस्यमयी मंदिराबाबत

भारतातील मंदिरांचा इतिहास खूप जुना आहे. भारतात अनेक पौराणिक मंदिरं आहेत. तर, अनेक अशीही मंदिरे आहेत जिथे काही रहस्यमयी घटना घडतात, जे पाहून लोक आश्चर्यचकित होतात. झारखंड राज्यातील बैद्यनाथ शिव मंदिरही त्यापैकीच एक आहे. हे मंदिर स्वत: भगवान विश्वकर्मा यांनी यांनी बांधले होते, असं मानलं जातं.

Ketu Temple | आश्चर्य..! या मंदिरात चढवलेलं दूध निळं पडतं, जाणून घ्या केरळातील या रहस्यमयी मंदिराबाबत
Ketu Temple

मुंबई : भारतातील मंदिरांचा (Indian Temple) इतिहास खूप जुना आहे. भारतात अनेक पौराणिक मंदिरं आहेत. तर, अनेक अशीही मंदिरे आहेत जिथे काही रहस्यमयी घटना घडतात, जे पाहून लोक आश्चर्यचकित होतात. झारखंड राज्यातील बैद्यनाथ शिव मंदिरही त्यापैकीच एक आहे. हे मंदिर स्वत: भगवान विश्वकर्मा यांनी यांनी बांधले होते, असं मानलं जातं.

अशीच रहस्यमय कथा दक्षिण भारतातील (South India) एका मंदिराची आहे. हे मंदिर केतू देवाला (Ketu Temple) समर्पित आहे. या मंदिरात दूध अर्पण केल्याने त्याचा रंग बदलतो, असं म्हणतात. या मंदिराबाबत संपूर्ण माहिती जाणून घेऊया –

केरळातील केतू मंदिर

हे मंदिर केरळमधील कावेरी नदीच्या काठावर आहे. कीजापेरुमपल्लम गावात असलेले हे मंदिर नागनाथस्वामी किंवा केति स्थळ म्हणून ओळखले जाते. या मंदिराचे मुख्य दैवत भगवान शिव आहे. याशिवाय येथे राहू आणि केतूच्या मूर्तीही स्थापित केलेल्या आहेत. या मंदिरात राहू देवाला दूध अर्पण केले जाते. केतू दोषाने पीडित असलेले लोक जेव्हा राहुला दूध अर्पण करतात तेव्हा त्या दुधाचा रंग निळा होतो, अशी मान्यता आहे.

पौराणिक कथा काय?

पौराणिक कथेनुसार, ऋषींच्या शापातून मुक्त होण्यासाठी केतूने शिवाला प्रसन्न करण्यासाठी या मंदिरात पूजा करण्यास सुरुवात केली. शिवरात्रीच्या दिवशी भगवान शंकराने केतूला दर्शन दिले आणि त्यासोबतच केतू शापातून मुक्त झाला, असे म्हणतात. केतूला सापांची देवता देखील म्हटले जाते. कारण, त्याचे डोके माणसाचे असते आणि धड सापाचे असते.

ज्योतिषशास्त्रात राहु आणि केतू यांचे छाया ग्रह म्हणून वर्णन केले आहे. राहू आणि केतू यांनाही नऊ ग्रहांमध्ये स्थान दिले आहे. याशिवाय, नऊ ग्रहांमध्ये गुरु, शनि, शुक्र, चंद्र, बुध, मंगळ आणि सूर्य यांचाही समावेश आहे. या ग्रहांचा स्वतःचा वेगळा स्वभाव आहे. ज्याच्या आधारे ते व्यक्तीवर प्रभाव टाकतात.

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

संबंधित बातम्या :

Benefits of tilak : पूजेच्या टिळ्याने दूर होतील तुमची सर्व संकटे आणि पूर्ण होतील मनोकामना, जाणून घ्या कसे?

Utpanna Ekadashi 2021 | या एकादशीचे महत्त्व आणि पूजा करण्याची पद्धत जाणून घ्या एका क्लिकवर

Published On - 12:21 pm, Tue, 30 November 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI