AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

चाणक्य सांगतात, मित्र आणि नातेवाईकांना पैसे देऊच नका, कारण…, आजच व्हा सावध

मित्र आणि कुटुंबियांसोबत असले की, एक सरक्षिततेची भावना मनात असते. पण त्यांच्यासोबत राहताना देखील काही गोष्टींचा विचार करण्याचा सल्ला आचार्य चाणक्य देतात. ते म्हणतात नात्यात पैशांचा व्यवहार आणूच नका... त्याचे कारण आहे.. तर जाणून घ्या आचार्य चाणक्य काय म्हणतात.

चाणक्य सांगतात, मित्र आणि नातेवाईकांना पैसे देऊच नका, कारण..., आजच व्हा सावध
Chanakya Niti
| Updated on: Oct 07, 2026 | 3:12 PM
Share

आचार्य चाणक्य हे प्राचीन भारतातील एक महान विचारवंत, अर्थशास्त्रज्ञ आणि मुत्सद्दी म्हणून ओळखले जातात. त्यांच्याशी संबंधित ‘चाणक्य नीती’मध्ये जीवन, वर्तन, संपत्ती आणि नातेसंबंधांविषयी अनेक धोरणांचा उल्लेख आहे. कोणत्याही नात्यात पैशाच्या बाबतीत सावधगिरी बाळगण्याचा सल्ला अचार्य चाणक्य यांनी दिला आहे. विशेषतः मित्र किंवा नातेवाईकाला आर्थिक मदत करताना काही गोष्टी लक्षात ठेवल्यास नात्यांमधील अनावश्यक तणाव टाळता येतो. त्यामुळे चाणक्य म्हणतात, संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतरच समोरच्याला पैशांची मदत करा..

चाणक्य म्हणतात, गरजूंना मदत करा, पण कमी अपेक्षा ठेवा. चाणक्य नीतीनुसार, जर तुमच्याकडे गरजेपेक्षा जास्त संपत्ती असेल आणि तुम्ही कोणाला आर्थिक मदत करत असाल, तर मदत केल्यानंतर वारंवार पैसे परत मिळण्याची अपेक्षा करु नका. विशेषतः जर झालेल्या रकमेच्या नुकसानीचा तुमच्या आर्थिक परिस्थितीवर मोठा परिणाम होत नसेल, तर मदत करताना पैसे परत मिळण्याची अपेक्षा ठेवल्यास नात्यात तणाव निर्माण होऊ शकतो.

इतर वादांमध्ये पैशांचा उल्लेख करू नका. जर तुम्ही एखाद्या मित्राला किंवा नातेवाईकाला आर्थिक मदत केली असेल आणि भविष्यात त्यांच्यासोबत दुसऱ्या एखाद्या मुद्द्यावरून वाद झाला, तर तुम्ही दिलेल्या आर्थिक मदतीचा वारंवार उल्लेख करणे योग्य नाही. ‘मी तुम्हाला पैसे दिले’ असे म्हणण्याने नात्यातील दरी वाढू शकते. त्यामुळे, उपकार म्हणून केलेल्या मदतीची वारंवार आठवण करून देण्याऐवजी नात्याला महत्त्व देणं उचित आहे.

पैसे देताना तारखा नक्की लक्षात ठेवा. जर एखाद्या व्यक्तीला कर्ज म्हणून पैसे दिले जात असतील, तर त्या व्यवहाराशी संबंधित तारखा स्पष्ट ठेवणं महत्त्वाचं आहे. पैसे दिल्याची तारीख आणि ते परत करण्याची तारीख यांची नोंद ठेवल्यास भविष्यात गैरसमज टाळता येतात. या बाबतीत दोन्ही पक्षांमध्ये स्पष्टता असणे अधिक योग्य मानलं जातं.

नातेसंबंध आणि पैसा यांच्यात संतुलन आवश्यक आहे. पैशांच्या व्यवहारांमुळे जवळच्या नात्यांमध्येही अनेकदा गैरसमज निर्माण होऊ शकतात. त्यामुळे, कोणालाही आर्थिक मदत करण्यापूर्वी, आपली क्षमता, आवश्यक रक्कम आणि परतफेडीच्या अटी यांबद्दल स्पष्टता असणे महत्त्वाचे आहे. चाणक्य नीतीशी संबंधित या वचनांचा मुख्य उद्देश आर्थिक व्यवहारांमध्ये सावधगिरी बाळगणे आणि नातेसंबंधांमध्ये संयम राखणे हा आहे.

(डिस्क्लेमर: सदर लेखातील माहिती केवळ ज्योतिषशास्त्रीय गृहीतके आणि उपलब्ध माहितीवर आधारित आहे. आम्ही यातील तथ्यांची किंवा दाव्यांची पुष्टी करत नाही. अंधश्रद्धेला प्रोत्साहन देणे हा आमचा हेतू नाही.)

Follow Us
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात तपासला वेग; अल्टो कार जप्त, गाडीत सापडला...
Pradeep Purnekar : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात तपासला वेग; पप्पू शिंदेने दिलेली अल्टो कार जप्त, गाडीत सापडला...
दुष्काळाची झळ! छत्रपती संभाजीनगरातील 150 वीटभट्ट्या बंद, हजारो मजुर...
दुष्काळाची झळ! छत्रपती संभाजीनगरातील 150 वीटभट्ट्या बंद, हजारो मजुरांवर उपासमारीची वेळ
माझी नार्को टेस्ट करा, तुम्हाला सगळं...; शिवराज मोरे असं का म्हणाले?
Shivraj More : माझी नार्को टेस्ट करा, तुम्हाला सगळं...; शिवराज मोरे असं का म्हणाले?
धाराशिवमध्ये चाऱ्याचा प्रश्न गंभीर, दूध उत्पादन निम्म्यावर; शेतकरी...
धाराशिवमध्ये चाऱ्याचा प्रश्न गंभीर, दूध उत्पादन निम्म्यावर; शेतकरी संकटात
80 तास झाले, तरी मला अडकवण्याचे प्रयत्न सुरूच; शिवराज मोरे....
Shivraj More : 80 तास झाले, तरी मला अडकवण्याचे प्रयत्न सुरूच; MPSC कार्यकर्ता शिवराज मोरे यांचा खळबळजनक दावा
MPSC आंदोलनात नेमकं काय घडतंय? नाईट लाईफ राडा, मद्यपान अन्... नवनाथ बन
MPSC आंदोलनात नेमकं काय घडतंय? नाईट लाईफ राडा, मद्यपान अन्... नवनाथ बन यांचा आरोपांनी खळबळ
याला गुंडगिरी म्हणत असाल तर...; नवनाथ बन यांच्या आरोपांवर शिवराज मोरे
Shivraj More : MPSC Students Protest : याला गुंडगिरी म्हणत असाल तर...; नवनाथ बन यांच्या आरोपांवर शिवराज मोरे यांचा पलटवार, नेमकं प्रकरण काय?
दोन तास विद्यार्थ्यांना ताटकळत ठेवलं, अखेर परीक्षा रद्द, रोहित पवार...
दोन तास विद्यार्थ्यांना ताटकळत ठेवलं, अखेर परीक्षा रद्द, रोहित पवार म्हणाले...
महाज्योती परीक्षा केंद्रावर मोठा गोंधळ, संगणकच नाहीत...
महाज्योती परीक्षा केंद्रावर मोठा गोंधळ, संगणकच नाहीत... विद्यार्थिनींच्या संतापानंतर परिक्षाच रद्द
MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला वेगळं वळण; रोहित पवारांनी केले गंभीर
MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला वेगळं वळण; रोहित पवारांनी केले गंभीर आरोप