रात्री केसं कापू नये असे जुने लोकं का सांगायचे? हे आहे धार्मिक आणि वैज्ञानिक कारण

नखे आणि केस कापणे, झाडू मारणे आणि इतर अनेक गोष्टी रात्रीच्या वेळी केल्यास जुने लोकं अजूनही टोकतात.

रात्री केसं कापू नये असे जुने लोकं का सांगायचे? हे आहे धार्मिक आणि वैज्ञानिक कारण
केशकर्तन Image Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Nov 10, 2022 | 2:34 PM

मुंबई,  हिंदू धर्मात अनेक प्रथा आणि परंपरा (Hindu Customs and Traditions) आहेत. या प्रथा वर्षानुवर्षे सुरू आहेत. यामध्ये अशा अनेक गोष्टी आहेत, ज्यांचा उल्लेख शास्त्रात आहे. ज्यांना या प्रथा माहीत आहेत. त्यांना त्यामागील कारण माहित नाही, परंतु तरीही या नियमांचे पालन करतात. नखे आणि केस कापणे, झाडू मारणे आणि इतर अनेक गोष्टी रात्रीच्या वेळी केल्यास जुने लोकं अजूनही टोकतात. यामागे प्रत्येकजण वेगवेगळी कारणे सांगतात. ग्रामीण भागात वडीलधाऱ्यांच्या या सल्ल्याचे पालन करणारे अनेक जण आहेत.  या मागचे कारण जाणून घेऊया

वैज्ञानिक कारण

शास्त्रीय दृष्टीकोनातून पाहिले तर रात्री केस न कापण्याचे कारण म्हणजे रात्री केस इकडे तिकडे उडतात. काही वेळा अन्नात केस जाण्याची शक्यता असते. त्यामुळे आजारी पडण्याची भीती आहे. याशिवाय केसांतून घाण आणि बॅक्टेरिया पसरण्याची भीती असते. त्यामुळे रात्री केस कापण्यास मनाई केली जाते.

हे सुद्धा वाचा

धार्मिक कारणे

हिंदू धर्मात सूर्योदय आणि सूर्यास्ताला खूप महत्त्व दिले जाते. दिवसाची वेळ कोणत्याही कामासाठी अनुकूल मानली जाते. सूर्यास्तानंतर केस किंवा नखे ​​कापू नयेत हा जुना नियम आहे. ज्यावर आजही लोक विश्वास ठेवतात. वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार रात्री केस कापणे अशुभ मानले जाते. असे मानले जाते की संध्याकाळी लक्ष्मी घरात वास करते. सुख-समृद्धी आणि ऐश्वर्य मिळावे यासाठी महालक्ष्मी रात्री घरी राहते. त्यामुळे रात्री केस न कापण्याचा सल्ला दिला जातो. दुसऱ्या दृष्टिकोनातून पाहिल्यास पूर्वीच्या काळी वीज नसल्याने केसं कापताना इजा होण्याची शक्यता होती. यामुळेदेखील रात्री केसं कापण्यास मनाई केली जात असे.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Non Stop LIVE Update
बारामतीत मतदानाच्या आदल्या रात्री..अमोल कोल्हेंचं निवडणूक आयोगाला पत्र
बारामतीत मतदानाच्या आदल्या रात्री..अमोल कोल्हेंचं निवडणूक आयोगाला पत्र.
तर धनुष्यबाणावर विरोधात निवडणूक लढवणार, किरण सामंत यांचा इशारा कुणाला?
तर धनुष्यबाणावर विरोधात निवडणूक लढवणार, किरण सामंत यांचा इशारा कुणाला?.
ठाकरेंवर मानसिक परिणाम, त्यांना.., भाजपच्या बड्या नेत्याचा हल्लाबोल
ठाकरेंवर मानसिक परिणाम, त्यांना.., भाजपच्या बड्या नेत्याचा हल्लाबोल.
लोकसभा निवडणुकीत केजरीवालांना दिलासा, तिहार तुरुंगातून येणार बाहेर
लोकसभा निवडणुकीत केजरीवालांना दिलासा, तिहार तुरुंगातून येणार बाहेर.
मोदींच्या ऑफरवर शरद पवारांचं उत्तर, म्हणाले, ... हे माझं स्पष्ट मत
मोदींच्या ऑफरवर शरद पवारांचं उत्तर, म्हणाले, ... हे माझं स्पष्ट मत.
सगळी स्वप्न पूर्ण होतील, फक्त... मोदींची ठाकरे-पवारांना भर सभेतून ऑफर
सगळी स्वप्न पूर्ण होतील, फक्त... मोदींची ठाकरे-पवारांना भर सभेतून ऑफर.
... तर तुम्हीच औरंगजेबाचे वंशज, संजय राऊतांची मोदींवर घणाघाती टीका
... तर तुम्हीच औरंगजेबाचे वंशज, संजय राऊतांची मोदींवर घणाघाती टीका.
प्रियंका चतुर्वेदींनी केलेल्या 'त्या' टीकेवर मुख्यमंत्री म्हणाले.....
प्रियंका चतुर्वेदींनी केलेल्या 'त्या' टीकेवर मुख्यमंत्री म्हणाले......
नकली संतान... मोदींच्या टीकेवर ठाकरे म्हणाले, बेअकली माणसा तेव्हा लाज
नकली संतान... मोदींच्या टीकेवर ठाकरे म्हणाले, बेअकली माणसा तेव्हा लाज.
ब्रेक घेतोय... कोल्हेंचा 5 वर्ष अभिनयातून संन्यास, का घेतला निर्णय?
ब्रेक घेतोय... कोल्हेंचा 5 वर्ष अभिनयातून संन्यास, का घेतला निर्णय?.